नोव्हेंबर २०२३

मुखपृष्ठाविषयी – नोव्हेंबर २०२३

 यावेळचे मुखपृष्ठ कलाकार आहेत  दत्तात्रेय  फडके. व्यवसायाने ते शरीरविकृतीशास्त्रज्ञ (पॅथॉलॉजिस्ट) आहेत. सूक्ष्मदर्शी यंत्राखाली वेगवेगळे आकार पाहणे, त्यांच्यातील रंगसंगती पाहणे  व त्यातून निदान करणे हे या शास्त्राचे वैशिष्ट्य आहे.  फडक्यांची नजर सूक्ष्मदर्शी यंत्रातून बाहेर आली आणि आपला परिसर न्याहाळताना  त्यातील वेगवेगळे आकार आणि  रंगसंगती यांतही रमून गेली.  त्यातून एक ‘कोलाज आर्टिस्ट’  अर्थात तुकड्यांतून सौंदर्य निर्माण करणारा… Continue reading मुखपृष्ठाविषयी – नोव्हेंबर २०२३

संपादकीय – वेध भवितव्याचा

दैव जाणिले कुणी?  अर्थात भविष्याच्या पोटात काय दडले आहे हे जाणणे अशक्यप्राय आहे असे जुने जाणते वेळोवेळी सांगत असतात; तरीही जिज्ञासा आपल्याला काही गप्प बसू देत नाही.  वर्तमानापेक्षा भविष्य अधिक सुखकारक असण्याची आशा हा माणसाला वर्तमान सोसण्याची ताकद देणारा एक महत्त्वाचा स्रोत आहे.       एका मराठी चित्रवाहिनीवर भविष्याचे मंथन/ सूचन  करणारा एक कार्यक्रम होतो. तो बराच… Continue reading संपादकीय – वेध भवितव्याचा

दिवाळी शुभेच्छा !! 

रांगोळी रेखाटन व छायाचित्र : शुभांगी जोशी  आनंदाची दिवाळी | घरी बोलवा वनमाळी | घालीते मी रांगोळी | गोविंद गोविंद ॥धृ॥ घरी आले देव | त्यांच्या चरणी ठेवा भाव | मुखी म्हणा रामशिव | होईल आनंद ॥१॥ सर्व साक्षी ईश्वर | त्याला करी नमस्कार | करोनिया मन स्थिर | आनंदी आनंद ॥२॥| दासी नामयाची जनी… Continue reading दिवाळी शुभेच्छा !! 

गाण्यांमागची गोष्ट

मानसशास्त्राचा अभ्यास करताना, ‘जोहारी विंडो’ नावाची संकल्पना शिकवतात. जसे खिडकीचे चार भाग असतात तसे चार कप्प्यांमध्ये व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये विभागलेली असतात. पहिला कप्पा आहे अशा क्षमता-कमतरतांचा ज्या व्यक्तीला स्वतःलाही ठाऊक असतात आणि इतरांनाही. म्हणजे रुग्णांचे निदान करून उपचार करण्याची माझी क्षमता किंवा कोणतेही वाहन चालवता न येणे ही कमतरता मला आणि जगाला ज्ञात आहे. काही गुणदोष… Continue reading गाण्यांमागची गोष्ट

कविता: चांदरात… भर दिवसाची.

काळ्याशार म्हशींचा रस्ता ओलांडत चाललेला तांडा. मागे तंबाखू मळत जगावर थुंकणारा त्यांचा राखणदार. दोन्ही बाजूला लागलेल्या वाहनांच्या रांगा. वाहनांचा व त्यांच्या मालकांचा वांझोटा कोलाहल.  रस्ता दुभाजकाच्या दोन्ही बाजूला छाटणी करून टाकलेल्या फांद्या. उघडे पडलेले झेंडे व बोडका झालेला रस्ता. रस्त्याकडेच्या मद्यालयासमोरचा  तो तळीरामांचा जथा  उलट्या दिशेने धूळ उडवीत येणाऱ्या त्यांच्या बेदरकार गाड्या. आपल्या महान नैतिक… Continue reading कविता: चांदरात… भर दिवसाची.

The POTUS is on the move !! (१)

२०२४  हे वर्ष जागतिक लोकशाही करिता खूप महत्त्वाचे वर्ष आहे.  जगातली सर्वात मोठी लोकशाही समजली जाणारा भारत आणि सर्वात जुन्या लोकशाहींपैकी एक अमेरिका यांच्यात अत्यंत महत्त्वाच्या अशा निवडणुका होत आहेत.  भारतातील संसदीय लोकशाही व त्याची निवडणूक प्रक्रिया याबाबत आपल्याला बऱ्यापैकी माहित असते. परंतु अमेरिकन अध्यक्षपद निवडणूक प्रक्रिया ही काहीशी जटील आहे.  या लेखमालिकेद्वारा ती प्रक्रिया… Continue reading The POTUS is on the move !! (१)

संत पंत तंत काव्यविषयक लेखमाला भाग तिसरा

संतकवी एकनाथ मुक्ताफळालागीं सागरीं |  बुड्या देती नानापरी | तें सापडल्या घरींच्या विहिरीं | जो अव्हेरी तो मूर्ख | तैशी संस्कृत व्याख्यान आटाटी | अतिकष्टें परमार्थी भेटी | तें जोडल्या मराठीसाठीं | उपेक्षादृष्टी न करावी || घरच्या विहिरीतले सहज मिळणारे मोती अव्हेरून समुद्रात बुड्या मारून आटापिटा करून तसेच मोती कशाला शोधायचे? तसंच किचकट वाटणाऱ्या संस्कृतातलं… Continue reading संत पंत तंत काव्यविषयक लेखमाला भाग तिसरा

‘चले जाव’चा लढा : आजच्या संदर्भात

८ ऑगस्ट १९४२. मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन चालू होते. या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यानंतर वल्लभभाई पटेल बोलले आणि त्यांच्यानंतर जवाहरलाल नेहरू यांचे ओजस्वी भाषण झाले. एव्हाना सूर्यास्त झाला होता. संतापाने थरथरत असलेले नेहरू म्हणाले,  “आज आम्ही सारे पाश तोडून अखेरच्या युद्धाला तयार झालो आहोत. या… Continue reading ‘चले जाव’चा लढा : आजच्या संदर्भात

निरागसतेची दुसरी बाजू!

फेसबुकवर विविध प्रकारच्या विषयांच्या पोस्ट्सची गर्दी असते. हिंदी भाषेतले पाच-सहा दोस्त आहेत.  त्यांच्यामार्फत येणार्‍या पोस्ट्सची हिंदी भाषा आणि  मांडणी नेहमीच्या मजकुरापेक्षा वेगळी असते. अशीच एक पोस्ट एकदा वाचण्यात आली. वर-खाली वेगवेगळ्या विषयांच्या पोस्ट्सची दाटी, वेगवेगळे विषय – कधी प्रस्तुत कधी अप्रस्तुत. आपली ती घाई – धांदलीत गर्दीतून फिरावे तशी, स्क्रोल करीत फिरण्याची.  अशाच गडबडीत एक… Continue reading निरागसतेची दुसरी बाजू!

मोठी माणसे २

श्री. पु. भागवत    श्रीपुंच्या बाबतीत  ;श्री.पु.’ एवढी आद्याक्षरेसुद्धा त्यांचे नाव (श्री. पु. भागवत) आपल्या मनात उमटवण्यास पुरेशी आहेत; जसे ‘पु. ल.’ हे शब्द.   शिवाय हे   वर्ष श्रीपुंचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांचे येथे स्मरण करणे औचित्यपूर्णही होईल. श्रीपुंची आणि माझी पहिली भेट डिसेंबर १९८१ मध्ये मुंबईत झालेल्या ‘स्वाभिमान साहित्य संमेलना’त झाली. त्याआधीपासूनच माझ्या मनात… Continue reading मोठी माणसे २

ये है बॉंबे मेरी जान … भाग १

मुंबई टू बॉम्बैम् टू बॉम्बे टू मुंबई  (अर्थात बृहन्मुंबई परिसराचा इतिहास) या लेखाचे शीर्षक वाचून जरा आश्चर्य वाटेल; परंतु ही सर्व ‘मुंबई’ या शहरावर सत्ता गाजविणाऱ्या निरनिराळ्या राजवटींत प्रचलित असलेली मुंबई शहराचीच नावे आहेत हे आपल्या नक्कीच लक्षात येईल. ‘महाम्बाई’ हे मुंबईची ग्रामदेवता मुम्बादेवीचे मूळ नाव. या महा अम्बा आई याचे बोली भाषेतील रूपांतर किंवा… Continue reading ये है बॉंबे मेरी जान … भाग १

चिमा

सांबाराव, तुम्हांला ढोरं राखायला गुरखी पाहिजे होता नव्हं? ह्यो बघा ह्यो पोरगा. चुनचुनीत हाय. कामं बी आक्शी चटाचटा करतंय पोरगं. घ्या ठिऊन याला. कोंडराव मामाच्या बोलण्याचा विचार करत सांबारावांनी ८/९ वर्षांच्या त्या काळ्या-सावळ्या मुलाकडे निरखून पाहिलं. पोरगं काटक होतं. नजर स्वच्छ होती.  “काय नाव रे तुझं?”  “चिमा,” मुलाने उत्तर दिलं. सांबारावांना मुलगा आवडला. ठेवून घेतला.… Continue reading चिमा

कामशेत  (२)

वैद्यक शास्त्रातील पदवी मिळाल्यानंतर(MBBS) ग्रामीण व शहरी भागातील सरकारी दवाखान्यांमध्ये एक वर्ष सेवा द्यावी लागते. अशा सेवेची सुरुवात करताना एका नवशिक्याला आलेले हे अनुभव –  संपादक.  शेवटी सवय झालीये म्हणायचं इथली! रेल्वेलाइनच्या दोन बाजूला रांगेत पसरलेलं हे गाव – छोटी छोटी घरं, बाजारपेठ, थोडी दूरवर असलेली धनिकांची फार्महाउसेस आणि चिक्कार रासवटपणा! लोकलच्या वेळा सोडल्या तर… Continue reading कामशेत  (२)

बोल माधवी : एक पुनरावलोकन

आज जरा सर्वांची डोकी खाणार आहे.मंडळी खालील लेखावर आपले विचार अवश्य नोंदवा. नुकताच  कुठल्यातरी संदर्भात आसावरी काकडेंचा उल्लेख होता, तेव्हा त्यांचा बराच गाजलेला ‘बोल माधवी’ हा चंद्रप्रकाश  देवलांच्या मूळ हिंदी पुस्तकाचा अनुवाद परत एकदा पाहावासा वाटला. १९९८मध्ये देवलांना या पुस्तकासाठी राजस्थान साहित्य अकादमीचा ‘मीरा’ पुरस्कार मिळाला होता. त्याचा आसावरी काकडेंनी २००४ मध्ये केलेला मराठी अनुवादही… Continue reading बोल माधवी : एक पुनरावलोकन

रियाज

       वाईवरून पाचगणीकडे निघालो की वळणावळणाचा पसरणी घाट सुरू होतो. या घाटातून प्रवास करताना आजही मी भारावून जातो. मनातल्या मनात कितीतरी आठवणी जपल्यायत या घाटाने.  बारावी सायन्स शिकत असताना पास काढलेला असायचा. रोज पाचगणी – वाई  एसटीने प्रवास करायला लागायचा. हॅरिसन फॉली (थापा पॉईंट) संपला की पांडवगड, मांढरदेवीचा डोंगर आणि मग पसरणी, एकसर, कुसगाव  अशा… Continue reading रियाज

Thanks Obama

थँक्स, ओबामा (माय होपी, चेंजी व्हाईट हाउस यीअर्स – अ स्पीच राईटर्स मेम्वार) – डेव्हिड लिट प्रकाशक – एको ३२० पाने  किंमत – रु.४०९  किंडल – रु.३८८   डेव्हिड लिट या अमेरिकन राजकीय नेत्यांसाठी भाषणे लिहून देणाऱ्या लेखकाने, ‘थँक्स, ओबामा’ या आपल्या पहिल्याच पुस्तकात त्याच्या व्हाईट हाउसमधल्या चार वर्षांच्या कारकिर्दीतल्या आठवणी सांगितल्या आहेत. वयाच्या चोविसाव्या वर्षी… Continue reading Thanks Obama

एक क्रांती अशीही 

जगभरात डिजिटल पेमेंट नेटवर्क सुविधा पुरवणारी बलाढ्य नावं म्हणजे व्हिसा, मास्टरकार्ड आणि अमेक्स. आपल्याकडे माहिती तंत्रज्ञान तसेच बँकिंग क्षेत्रातील घडलेल्या क्रांतीमुळे एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या साधनांचा संचार आपल्या दैनंदिन जीवनातदेखील लीलया झाला. त्याचबरोबर व्हिसा, मास्टरकार्ड, अमेक्स ही नावंदेखील आपल्या पाकिटात अलगद विराजमान होऊ लागली. या कार्ड्सच्या भारतातील बाजारपेठेचा जवळपास ९०% हिस्सा हा व्हिसा… Continue reading एक क्रांती अशीही 

उच्च शिक्षणाचा गाभा भाग ३ – कृत्रिम बुद्धिमत्तेचा धमाका!

 अलीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स – एआय – AI) ह्याचं नाव जगभर दुमदुमत आहे. चॅट जीपीटी किंवा जीपीटी-४ असे काही प्रोग्रॅम्स एआय प्रणालीच्या अग्रस्थानी आहेत. गूगलनेही स्वतःची एआय प्रणाली – गूगल बार्ड – आणली आहे. त्यामुळे सगळीकडे एआय भला की बुरा – हिरो की व्हिलन – हवा की नको असे वाद पेटायला लागले आहेत. अगदी… Continue reading उच्च शिक्षणाचा गाभा भाग ३ – कृत्रिम बुद्धिमत्तेचा धमाका!

अभिवाचन :‘नव्या जगाची सुरुवात’ – नोव्हेंबर २०२३

‘ सामाजिक संस्कारांची पखरण करणारी बोधमालिका’ असे ज्या उपक्रमाचे सार्थ वर्णन केले गेले व ज्याने  संपादक भानू काळे यांना भरीव समाधान मिळवून दिले अशी ‘नव्या जगाची सुरवात’  ही  ‘अंतर्नाद’मध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात मालिका.” Be the Change You Want “ असे वाचकांना हसत खेळत सोप्या शब्दात व नित्याच्या अनुभवांमधून सांगणारी ही मालिका खूप गाजली.  या लिखाणाचे… Continue reading अभिवाचन :‘नव्या जगाची सुरुवात’ – नोव्हेंबर २०२३

स्वागत – आठवणी व संस्मरणे 

 चूल-मूल, रांधा-वाढा, व्रतवैकल्ये,  पाहुणे- रावळे अशा चौकटीत घट्ट बसेल अशी स्त्री म्हणजे आदर्श स्त्री असं मानलं जाणारा  काळ! पतिसेवा म्हणजे पत्नीधर्माचा कळसबिंदू! ‘स्व’ ची जाणीव, स्त्रीस्वातंत्र्य पारंपरिक समाजाच्या  गळी उतरवणं ही फार दूरची गोष्ट! याच काळात  धर्म, जातपात या शब्दांशी  दूरान्वयानेही संबंध नसलेल्या सुशिक्षित, पुरोगामी घराण्यात जनाक्का शिंदे  यांचा जन्म झाला.  महर्षी वि. रा. शिंदे… Continue reading स्वागत – आठवणी व संस्मरणे 

बेंगलोर डायरी

एखादे गाव आपसूक आपल्या ओंजळीत येऊन पडते आणि आपल्याही नकळत आपण त्या गावावर प्रेम करायला लागतो. १४  वर्षांपूर्वी असेच बेंगलोर माझ्या वाट्याला आले आणि आता ते माझे गाव झाले आहे; इतके जास्त प्रेमाचे की मला बेंगलोरचा जाज्वल्य अभिमान वाटतो. माझ्या या शहराच्या अस्मिता अतिशय अणकुचीदार आहेत. मुळात हे सगळे केव्हा होते; जेव्हा आपली नाळ त्या… Continue reading बेंगलोर डायरी

उच्च शिक्षण ,संशोधन काही प्रश्न काही उत्तरे…

गेले दोन अडीच महिने माझे मुलाकडे – नेदरलँड येथे – वास्तव्य होते. या काळात एकूणच युरोपियन,पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीचा अभ्यास केला. चर्चेतून त्याच्या व्यवस्थेचे वेगळेपण जाणून घेतले.माझा मुलगा आशिष याला अमेरिकेतील अनेक विद्यापीठांचा  अनुभव आहे; माहिती आहे; शिवाय श्यानान ल्याब, सॅमसंग, फिलिप्स रिसर्च, एन पी एक्स सेमी कंडक्टर अशा संशोधन संस्थांत  त्याने काम केले आहे. त्याच्या नावावर… Continue reading उच्च शिक्षण ,संशोधन काही प्रश्न काही उत्तरे…

महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

श्रेयनामावली

 मार्गदर्शक: भानू काळे

 संपादक: अनिल जोशी

 व्याकरण सल्लागार: सुषमा जोशी

 व्यवस्थापन मंडळ: अजित  कानिटकर, अनिल शिदोरे, उमाकांत घाटे, स्नेहा अवसरीकर 

तंत्र साहाय्य: मिहिर जोशी, स्नेहल आपटे

Author

Leave a Reply