गोष्ट बेंगलोरच्या उत्सवाची…

कोणतेही शहर हे एका रात्रीत घडत नसते. शहरातील रस्ते, इमारती, पुतळे इतकेच काही शहराची ओळख घडवत नसतात, तर त्या शहरात घडणार्‍या सांस्कृतिक गोष्टीदेखील तितक्याच महत्त्वाच्या असतात.  त्यामुळेच जयपूरसारखे शहर आता फक्त हवामहालामुळे नव्हे तर तिथल्या लिटरेचर फेस्टिव्हलमुळेदेखील ओळखले जाते. दर दोन वर्षांनी भरणारे कोची बिएन्नेल हेतर जगभरातील कला रसिकांचे हक्काचे ठिकाण. तसेच महत्त्व आहे मुंबईच्या काळा घोडा फेस्टिव्हलचे. जगभरात असे अनेक फेस्टिव्हल भरत असतात, फक्त … Continue reading गोष्ट बेंगलोरच्या उत्सवाची…

बेंगलोर डायरी १२

    लग्न करून पंधरा वर्षांपूर्वी मी बेंगलोरमध्ये आले तेव्हा कन्नड आडनाव सोडले तर माझा आणि कन्नडचा काहीच संबंध नव्हता. हे शहर किती मोठे आहे याची जाणीव ही नव्हती. भरपूर तलाव, हिरवळ असलेले हे गाव मला आवडले होते. आम्ही राहतो तो भाग उपनगर आहे – खरे बेंगलोर नाही हेही माहीत होते; पण तरीही या उपनगरातून बेंगलोरच्या सगळ्या भागांत जाण्यासाठी बस आहे हे सुखसुद्धा मी अनुभवले. मेट्रोचा या … Continue reading बेंगलोर डायरी १२

बेंगलोर डायरी ११

  कोणतेही शहर परिचयाचे करून घ्यायचे असेल तर चालत ते शहर पाहावे. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन नक्की सापडते. काही दिवसांपूर्वी मी अशीच बेंगलोरमध्ये चालत असताना एम जी रोडच्या बाजूला अचानक एक पुतळा दिसला. हातात पुस्तक घेतलेला हा पुतळा कोणाचा म्हणून कुतूहलाने त्या पुतळ्याजवळ गेले आणि खरोखरीच आश्चर्यचकित करणारी माहिती तिथे होती. तो पुतळा होता रेव्हरंड फर्डीनंड कित्तेल यांचा. १८३२ साली जर्मनीत जन्मलेले कित्तेल धर्मोपदेशक म्हणून १८५३ … Continue reading बेंगलोर डायरी ११

बेंगलोर डायरी : १०

    जेव्हा तुम्ही रेल्वेने बेंगलोरला उतरता तेव्हा तुम्ही क्रांतिवीर संगोळी रायण्णा स्थानकावर उतरता. आपण त्या नावाकडे फारसे लक्ष न देता बेंगलोर स्टेशन म्हणत ते नाव अगदी कानामागे टाकून पुढे जातो. मुळात आपल्याकडे स्टेशनला, विमानतळांना, गावांना दिली जाणारे नावं हा एक वेगळाच विषय आहे. अर्थात अनेकदा त्यामागे विशिष्ट स्मृती जागवणे हा हेतू असतोच; पण त्याचबरोबर त्या प्रदेशाची स्थानिक अस्मिता जोपासणे हे महत्त्वाचे कारणदेखील असते. विशिष्ट नाव … Continue reading बेंगलोर डायरी : १०

बेंगलोर डायरी :९

बेंगलोर हे एक स्वप्न आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही – म्हणजे हैद्राबादमध्ये कितीही चांगल्या आयटी कंपन्या का असेनात किंवा चेन्नई भारतातले प्रमुख शहर का असेना किंवा ‘गॉड’स ओन कंट्री’ म्हणून ओळखले जाणारे केरळ कितीही सुंदर का असेना; तरी या सगळ्या भागांतल्या लोकांची सुप्त इच्छा असते बेंगलोरला जाण्याची – भले प्रत्येकाची कारणे वेगळी असोत; पण बेंगलोरला आमचे नातेवाईक आहेत, घर आहे किंवा आम्ही … Continue reading बेंगलोर डायरी :९

बेंगलोर डायरी ८

माझे एक शेजारी त्यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी म्हणून घरी आले; तेव्हा घरी पाहुणे आलेले होते. पत्रिका देताना ते शेजारी, आलेल्या पाहुण्यांकडे बघून म्हणाले, ‘तुम्ही पण नक्की या.’ लग्न होऊन मला काहीच महिने झाले होते; त्यामुळे RSVP देण्याच्या काळात असे घरी आलेल्या पाहुण्यांनादेखील घेऊन या म्हणणारे मला वेगळेच वाटले. हे  तोंडदेखले असेल असेही एकदा मनात आले; पण मग आमच्या लग्नाचे फोटो दाखवताना नवरा, सासू काही … Continue reading बेंगलोर डायरी ८

बेंगलोर डायरी ७

   फळांचा राजा आंब्याला म्हणतात आणि आंब्यांचा राजा हापूस.  आंबा म्हणजे फक्त हापूस या माझ्या समजाला मोठा छेद गेला बेंगलोरला आल्यावर. इथे हापूसच्या झगमगाटात इतर आंबे लपून जात नाहीत. येथील प्रसिद्ध बदामी म्हणजेच  कर्नाटक हापूससुद्धा जरा इतर आंब्यांना दबूनच असतो. इथे मोठा मान असतो तो बैंगनपल्ली या आंध्र प्रदेशातील आंब्यांना, त्यानंतर रसपुरी या नावातूनच रस गळणाऱ्या आंब्याला, त्यानंतर बदामीबरोबरचा मान असतो तो सिंदूरा या आंब्याचा! सीझन … Continue reading बेंगलोर डायरी ७

बेंगलोर डायरी ६ 

क्रिकेट आणि चित्रपट या भारताला जोडून ठेवणाऱ्या दोन गोष्टी आहेत. चित्रपट समजण्यासाठी प्रत्येक वेळी भाषा ओळखीची असावी लागतेच  असे नाही तर अनेकदा चित्रभाषा सगळी बंधने तोडून माणसांना जोडतात. दक्षिण भारतीय असे वर्णन केले जाते तेव्हा या दक्षिण भारतात पाच वेगवेगळी राज्ये आहेत आणि त्यांच्या चार भाषा, वेगळी संस्कृती आहे याचा थोडासा विसरच पडतो. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ. खासकरून दाक्षिणात्य चित्रपट असे म्हणताना सब … Continue reading बेंगलोर डायरी ६ 

बेंगलोर डायरी ५

एखादे शहर सांस्कृतिकदृष्ट्या किती सजग आहे हे बघायचे असेल तर त्या शहरात असणारी संग्रहालये, नाट्यगृहे, सभागृहे बघितली पाहिजेत असे कुठेतरी वाचले होते. बेंगलोर शहरात बघायला काय आहे याची यादी देताना जुन्या गोष्टींबरोबरच नव्याने आलेली काही ठिकाणे म्हणजे संग्रहालये; त्यामुळे ही बेंगलोर डायरी फक्त बेंगलोरमधील नानाविध प्रकारच्या संग्रहालयांबद्दल.      बेंगलोर शहर तसे जुने आहे आणि तसे जुने नाही – म्हणजे मागील एका लेखात म्हणल्याप्रमाणे या शहराचा इतिहास … Continue reading बेंगलोर डायरी ५

बेंगलोर डायरी ४ 

 प्रत्येक शहराचे असे एक अंतरंग असते. मूळ शहर हळू हळू वाढत जाते; पण तरी त्या मूळ भागाचा स्वतःचा असा एक अभिमान असतो. मुळात प्राचीन काळात कोणतेही गाव शहर वसत होते ते पाण्याच्या उपलब्धतेवरून! आता त्यात वाहतूक, नोकरी-व्यवसायाच्या संधी अशा अनेक गोष्टींची भर पडली आहे. मुंबईमध्ये रेल्वे लाईनवरून जागेचा अभिमान बाळगला जातो, पुण्यात तोच पेठा आणि इतर भाग किंवा नदीच्या या भागातले आणि नदीपलीकडचे असे म्हटले … Continue reading बेंगलोर डायरी ४