तथ्यज पुस्तकांची शोधयात्रा

कार्ल सेगन यांची ‘कॉसमॉस’ ही मालिका नितांतसुंदर आहे. या मालिकेतील अनेक दृश्यं अविस्मरणीय आहेत. या मालिकेतील माझ्या मनावर प्रभाव पाडलेला एक प्रसंग आठवतो. या दृश्यात एक मोठं वाचनालय दाखवलं आहे. वाचनालयातील प्रत्येक मजल्यावर भिंतींलगत पुस्तकांनी गच्च भरलेली कपाटे ठेवलेली आहेत. कार्ल सेगन त्या पुस्तकांच्या कपाटांकडे निर्देश करून म्हणतात, ‘अशी कल्पना करा, की तुम्ही दर आठवड्याला एक पुस्तक वाचता. या गतीने जर तुम्ही आयुष्यभर पुस्तके वाचली … Continue reading तथ्यज पुस्तकांची शोधयात्रा

अतुलनीय मोहिमेचा श्रीगणेशा : 2

मराठी समानार्थ लघु शब्दकोश : खंड एक – प्राणिजगत संपादक : सुहास अनंत रानडे ….. मराठी भाषेला ‘अभिजात’ असा दर्जा मिळून एक वर्ष उलटून गेले; मात्र, यातून काय काय करायचे, याचा काहीही आराखडा अद्याप अमलात आलेला नाही. मराठी साहित्य आणि संस्कृती विषयक, भाषा, कोश किंवा इतरही आनुषंगिक कामे करणारी मंडळे, विभाग महाराष्ट्रात आहेत. राज्यात साहित्य संस्था आहेत. दरवर्षी राज्यात होणाऱ्या शंभरांहून अधिक साहित्य संमेलनांचा एकूण … Continue reading अतुलनीय मोहिमेचा श्रीगणेशा : 2

नाडकर्णी सर नसताना…

     १५ मे. बातमी आली, डॉक्टर आनंद नाडकर्णी गेले. आम्ही सगळे कुटुंबीय तेव्हा भूतानला फिरायला गेलो होतो. त्या संध्याकाळी फोबजीका इथल्या हॉटेलवर पोचलो. नेट मिळालं आणि बातमी कळली. आम्ही सगळेच सुन्न झालो. खोलीच्या तावदानातून बाहेरची दरी दिसत होती. हळूहळू काळोख होत होता. आम्ही बसून होतो. अधूनमधून सगळ्यांच्याच डोळ्यांतून पाणी येत होतं. इतकं, घरातलं कोणीतरी गेल्यासारखं, आधार कोसळून पडल्याचं दुःख होण्यासारखं त्यांचं-आमचं काय नातं होतं? मी काही … Continue reading नाडकर्णी सर नसताना…

पुस्तक परिचय : रंगसम्राट रघुवीर मुळगांवकर यांचे चरित्र

  गेल्या महिन्यात आमचे मित्र व जयहिंद प्रकाशनाचे हेमंत रायकर यांचा फोन आला. ते म्हणाले, “गोव्याचे श्री.परेश प्रभू हे रंगसम्राट मुळगांवकर यांचे चरित्र लिहीत आहेत. गेली चार वर्षे ते त्याच्यावर काम करीत आहेत. आपण मुळगांवकरांचे एक भक्त व व्यासंगी असल्यामुळे मी आपला नंबर त्यांना दिला आहे.”  त्यापाठोपाठ दहा मिनिटांतच श्री.प्रभूंचा मला फोन आला. सध्या मी अशा प्रकारे कोणाला माहिती वगैरे देण्याच्या भानगडीत पडत नाही; पण … Continue reading पुस्तक परिचय : रंगसम्राट रघुवीर मुळगांवकर यांचे चरित्र

अधिक महिना 

अधिक महिना हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. पुरुषोत्तम म्हणजे विष्णू. चालू वर्षी – शके १९४८  (इ.स.२०२६ ) –  हा मान ज्येष्ठ महिन्याला मिळाला आहे. रविवार १७ मे ते सोमवार १५ जून  २०२६ हा कालावधी अधिक ज्येष्ठ महिना म्हणून ओळखला जाईल. दरवर्षी येणाऱ्या – म्हणजे निज ज्येष्ठ महिन्याचा कालावधी मंगळवार १६ जून ते  १४ जुलै २०२६ असा असेल. सण, उत्सव, विशेष दिन इत्यादी निज महिन्यात … Continue reading अधिक महिना 

पठण, वाचन आणि कुतूहल : ज्ञानसाधनेचा बदलता प्रवास

नवीन पिढीमध्ये इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोबाईल, टॅबलेट, संगणक आणि AI आधारित साधने आज दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत. माहिती काही सेकंदांत उपलब्ध झाली आहे. प्रश्न विचारताच उत्तर मिळत आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची चिंता सतत व्यक्त केली जात आहे; ती म्हणजे नव्या पिढीमध्ये ‘वाचनसंस्कृती’चा होत असलेला ऱ्हास! अनेकांना असं वाटतं, की वाचन कमी झालं, तर ज्ञानही … Continue reading पठण, वाचन आणि कुतूहल : ज्ञानसाधनेचा बदलता प्रवास

जगभरातील चित्रपटांचा उत्सव पिफ  २०२६

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने २०२६ मध्ये २४ वर्षे पूर्ण केली. नुकताच हा महोत्सव पुण्यात १५ ते २२ जानेवारी या आठवड्यात थाटामाटात पार पडला. या महोत्सवात १०३ देशांतले १३० चित्रपट दाखवले गेले. स्पर्धा विभागात आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि मराठी चित्रपट या दोन्हीसाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रतिष्ठेचे पुरस्कार दिले गेले. पुरस्कारांचे परीक्षक म्हणून जगभरातील चित्रपट क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती आलेल्या होत्या. स्पर्धेच्या निवड समितीने आलेल्या चित्रपटांतून १४ चित्रपट जागतिक चित्रपट … Continue reading जगभरातील चित्रपटांचा उत्सव पिफ  २०२६

अरविंद पाटकर

विषय आणि लेखक निवडणारा, शोधणारा कार्यकर्ता     माझ्या आयुष्यात काही विलक्षण योगायोग आहेत. महाराष्ट्रातील साहित्यिक जीवनात राजहंस प्रकाशन आणि मनोविकास प्रकाशन या सुवर्णमुद्रा आहेत. अनुक्रमे दिलीप माजगावकर आणि अरविंद पाटकर या दोन धडपडणाऱ्या तरुणांनी अथक प्रयत्नांतून त्या उभ्या केल्या आहेत. माझ्या आयुष्यातील विलक्षण योगायोग हा, की या दोघांच्याही पहिल्या धडपडीच्या वाटचालीत जवळचा मित्र म्हणून मी त्यांच्याबरोबर होतो – त्या धडपडीच्या कालखंडाला ते दोघेही ‘धडपणे पडत पुन्हा … Continue reading अरविंद पाटकर

अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(८) 

आकाशवाणीचं हे ….                                              ‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च।                                               वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’ (उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.) भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली.  भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे आहेत त्यांमध्ये आकाशवाणी ऐकणे हे एक महत्त्वाचे लक्षण म्हणावे लागेल.  … Continue reading अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(८)