जगभरातील चित्रपटांचा उत्सव पिफ  २०२६

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने २०२६ मध्ये २४ वर्षे पूर्ण केली. नुकताच हा महोत्सव पुण्यात १५ ते २२ जानेवारी या आठवड्यात थाटामाटात पार पडला. या महोत्सवात १०३ देशांतले १३० चित्रपट दाखवले गेले. स्पर्धा विभागात आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि मराठी चित्रपट या दोन्हीसाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रतिष्ठेचे पुरस्कार दिले गेले. पुरस्कारांचे परीक्षक म्हणून जगभरातील चित्रपट क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती आलेल्या होत्या. स्पर्धेच्या निवड समितीने आलेल्या चित्रपटांतून १४ चित्रपट जागतिक चित्रपट … Continue reading जगभरातील चित्रपटांचा उत्सव पिफ  २०२६

माझे पहिले चाहते प्राध्यापक ए.व्ही.आरोसकर 

प्राध्यापक आरोसकर मला पहिल्यांदा भेटले ते साधारण १९७९-८० च्या सुमारास. तेव्हा माझ्या कविता मासिकांतून प्रकाशित होऊ लागल्या होत्या – किर्लोस्कर, स्त्री, राजस, हंस आणि एखाद् दुसरी कविता सत्यकथेतदेखील! हंसमध्ये तेव्हा जवळ जवळ दर महिन्याला माझी एखादी कविता प्रसिद्ध होत होती. त्यांतली एक कविता आरोसकरांना आवडली आणि ते थेट आमच्या घरी आले. ते टिळक अध्यापक महाविद्यालयात प्राध्यापक होते आणि तिथेच माझी आईही प्राध्यापिका होती. आल्या आल्याच … Continue reading माझे पहिले चाहते प्राध्यापक ए.व्ही.आरोसकर 

आनंदाचा धबधबा – अनंत भावे

अनंत भावे पहिल्यांदा भेटले ते दूरदर्शनच्या पडद्यावर. दूरदर्शनवर तेव्हा ते आठवड्यातून तीन दिवस बातमीपत्र वाचून दाखवायचे काम करत. गोरापान तेजस्वी चेहरा आणि मधमाश्यांच्या पोळ्यासारखी दिसणारी दाढी (तेव्हा ती काळी होती!). डोक्यावरचे केस मागे जाऊ लागले होते. आपल्या भेदक आवाजात, सुस्पष्ट, अचूक उच्चारांत ते बातम्या देत असत. ते स्वतः अभिनेतेही असल्यामुळे बातमीतला भाव त्यांच्या आवाजातही येत असे. मग तेव्हाच केव्हातरी त्यांची मुलांसाठीची पुस्तकेही हाती आली. ती … Continue reading आनंदाचा धबधबा – अनंत भावे

मोठी माणसे : १० 

कुसुमाग्रज : वि.वा. शिरवाडकर मागचा लेखांक मी शंकर वैद्यांवर लिहिला होता. शंकर वैद्य स्वतःच्या कविता ग्रंथरूपाने संपादित करण्याबाबत उदासीन होते; पण इतर मोठ्या कवींच्या कवितांच्या संपादनाचे काम त्यांनी साकल्याने केले. त्यांतले मुख्य होते कुसुमाग्रज. आजचा लेखांक आहे त्या कुसुमाग्रजांवर. कुसुमाग्रज हे नाव शालेय वयातच पाठ्यपुस्तकांतील कवितांमुळे ओळखीचे झाले होते. नंतर त्यांच्या कविता नियतकालिकांतून आणि संग्रहांतून भेटीस येत राहिल्या. वि. वा. शिरवाडकर या नावाने त्यांनी लिहिलेली … Continue reading मोठी माणसे : १० 

मोठी माणसे ९ : शंकर वैद्य 

शंकर वैद्यांशी माझी ओळख व्हायला कारणीभूत झाला तो महाराष्ट्र टाइम्स (मटा) ने १९७५-७६ मध्ये चालवलेला मासिक काव्यस्पर्धेचा उपक्रम. पहिल्याच मासिक स्पर्धेचे परीक्षक होते मंगेश पाडगांवकर आणि स्पर्धेसाठी आलेल्या ५००० कवितांतून पाडगांवकरांनी मी पाठवलेल्या ‘होड्या’ कवितेची पहिल्या क्रमांकाने निवड केली आणि तिचे भरभरून कौतुक केले. त्यानंतरच्या मासिक स्पर्धेसाठी दर महिन्याला एखादा नामवंत साहित्यिक असायचा. शांता शेळके, रमेश तेंडुलकर, नारायण सुर्वे आणि शंकर वैद्यही परीक्षक होऊन गेले. … Continue reading मोठी माणसे ९ : शंकर वैद्य 

मोठी माणसे ८ : दिलीप पुरुषोत्तम चित्रे 

   दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे नाव मी प्रथम सत्यकथेच्या (किंवा मौजेच्या) १९६४ च्या दिवाळी अंकात वाचले. मला वाटते, ‘आणि गुरुदत्त मेलेला आढळतो’ अशी त्यांची कविता होती. कविता पूर्ण आकळण्याचे माझे वय नव्हते; पण ही कविता अंकातील इतर कवितांपेक्षा वेगळी होती आणि म्हणूनच माझ्या लक्षात राहिली. ही कविता केवळ त्या अंकातल्या इतर कवितांपेक्षा वेगळी होती असे नाही.  आज विचार करता असे वाटते की, ही कविता स्वतः दिलीप … Continue reading मोठी माणसे ८ : दिलीप पुरुषोत्तम चित्रे 

मोठी माणसे ७ : आनंद यादव 

मला वाटतं, साधारण १९७९ च्या सुमाराला महाराष्ट्र सरकारने नवीन लेखकांच्या पुस्तकांना उत्तेजन मिळावे म्हणून नवलेखक उत्तेजन अनुदान योजना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा (म.रा.सा.सं.मं.) तर्फे सुरू केली होती. तेव्हा माझ्या कविता नियतकालिकांतून प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या .त्याबरोबरच मी मोठ्या कवींच्या कवितांची विडंबनेही करू लागलो होतो . आपणही या योजनेसाठी अर्ज करावा असे मला वाटले . तेव्हा माझ्या कविता प्रसिद्ध करणाऱ्यांपैकी मुख्य होते राजस मासिकाचे संपादक … Continue reading मोठी माणसे ७ : आनंद यादव 

मोठी माणसे ६

रा.ग. जाधव  १९९५ हे वर्ष. त्यापूर्वी रा.ग.जाधवांचे समीक्षात्मक लेखन नियतकालिकांतून वाचले होते. पुस्तके मुळातून वाचली नव्हती; पण त्यांची वाखणणी ऐकून होतो. माझा ‘मनातले घर’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आणि तो देण्यासाठी मी अनुराधा पोतदारांकडे त्यांच्या घरी गेलो होतो. तिथे रा.ग. जाधव पहिल्यांदा भेटले. मी त्यांनाही माझे ‘मनातले घर’ दिले. त्या वेळी जाधवांच्या प्रकृतीच्या काही तक्रारी उद्भवल्या होत्या. अनुराधाबाई जाधवांना प्रकृतीची काळजी घ्यायला सांगत होत्या. अनुराधाबाईंचा … Continue reading मोठी माणसे ६

मोठी माणसे ५

बाळ गाडगीळ    बाळ गाडगीळ यांचे विनोदी लेखन मी लहानपणापासून वाचत आलो होतो. मला त्यांचे विडंबनपर लेखन विशेष आवडत होते; विशेषतः ‘अखेर पडदा पडला, एकच प्याला पण कोण?’  वगैरे नाटकांचे विडंबन करणारे लेखन; पण प्रत्यक्ष भेट बरीच उशिरा झाली. तसा मी १९६५ ते १९६७ पर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयात होतो. तेव्हा ते तिथे उपप्राचार्य होते, अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. ‘रसिक मंडळ’ असे काहीतरी मंडळही ते चालवीत होते; पण गाडगीळ … Continue reading मोठी माणसे ५

मोठी माणसे ४ :विद्या बाळ

 विद्याताईंशी माझा संबंध आला तो किर्लोस्करचे तेव्हाचे कार्यकारी संपादक ह.मो.मराठे यांच्यामार्फत. मी आयआयटीत असल्यापासून कविता लिहू लागलो होतो. सुट्टीत मी पुण्यात आलेलो असताना मराठे यांच्याकडे काही कविता दिल्या. माझी प्रकाशित झालेली पहिली कविता ‘मला एकदा पंख फुटले होते’ त्यांनीच  किर्लोस्करच्या एका अंकात छापली. त्यानंतर हळूहळू मराठ्यांकडे माझ्या कविता देऊ लागलो. मी कूर्मगतीने कविता लिहीत होतो आणि त्या अधून मधून किर्लोस्कर मध्ये येऊ लागल्या. त्यातलीच एक … Continue reading मोठी माणसे ४ :विद्या बाळ