मी, बाबा आणि रॅशनॅलिटी 

अनंत माधव लिमये (१३.१.१९३४-८.२.२०२०) B.E.(Civil)यशवंत बर्वे आणि सतीश मराठे यांच्याबरोबर अनेक रस्ते, पूल आणि धरणांची निर्मिती. अलीकडे  त्याच्या मजबूतीसाठी चर्चेत आलेल्या पुण्यातील चांदणी चौकातील पुलाची निर्मिती. हा पूल पाडण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त कष्ट पडले होते. सुरेश बापट यांच्याबरोबर expansion type foundation bolts चा कारखाना सुरू केला. Shakti fasteners या नावाने हा ब्रॅंड सुप्रसिद्ध झाला.  त्यांच्या अभियांत्रिकी कौशल्याबरोबरच  ते एक विवेकवादी म्हणून  प्रसिद्ध होते. याबाबतच्या त्यांच्या आठवणी, … Continue reading मी, बाबा आणि रॅशनॅलिटी 

 संस्मरणीय व्यक्तिविशेष! अनंतराव लिमये 

अनंत लिमये हे पेशाने सिव्हिल इंजिनियर होते.  त्यांनी ६० च्या दशकापासून पुढे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागासाठी कंत्राटी पद्धतीने बरीच कामे केली.पंढरपूरचा नवीन पूल त्यांच्याच कारकिर्दीत झाला.कामानिमित्त ते रत्नागिरीत असताना लेखक श्याम जोगळेकर यांचे कुटुंब त्यांच्या शेजारी राहायचे.  पुढे अनंतराव व श्याम जोगळेकर या दोघांनीही अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी काम केले.  त्यामुळे पुन्हा एकदा ते दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. लेखाच्या निमित्ताने या स्नेहाला उजाळा देत अनंतरावांच्या आगळ्यावेगळ्या … Continue reading  संस्मरणीय व्यक्तिविशेष! अनंतराव लिमये 

अखेरचा हा तुला दंडवत

दोनच दिवसांपूर्वी लातूरच्या पॅथाॅलाॅजीच्या राज्य परिषदेत नेहमीप्रमाणेच सर्वांना मोहवून टाकणारे ‘सर्जिकल पॅथाॅलाॅजी’ या विषयावरचे अस्खलित व्याख्यान देणार्‍या डाॅ.अनिता बोर्जेस यांचे हृदयविकाराने निधन झाल्याचे अनपेक्षित वृत्त आले व मन एकदम गलबलून गेले. कसा विश्वास ठेवायचा या दुःखद  वृत्तावर? त्यांच्याबद्दल अत्यंत आदर बाळगणार्‍या व्यक्तींच्या शोकसंदेशांची मालिका गेले दोन दिवस अव्याहत सुरू आहे. त्यामुळे या अविश्वसनीय दुःखद घटनेवर विश्वास ठेवणे क्रमप्राप्त झाले. सहजपणे न पचवता येणारे हे दुःखद … Continue reading अखेरचा हा तुला दंडवत

माझे पहिले चाहते प्राध्यापक ए.व्ही.आरोसकर 

प्राध्यापक आरोसकर मला पहिल्यांदा भेटले ते साधारण १९७९-८० च्या सुमारास. तेव्हा माझ्या कविता मासिकांतून प्रकाशित होऊ लागल्या होत्या – किर्लोस्कर, स्त्री, राजस, हंस आणि एखाद् दुसरी कविता सत्यकथेतदेखील! हंसमध्ये तेव्हा जवळ जवळ दर महिन्याला माझी एखादी कविता प्रसिद्ध होत होती. त्यांतली एक कविता आरोसकरांना आवडली आणि ते थेट आमच्या घरी आले. ते टिळक अध्यापक महाविद्यालयात प्राध्यापक होते आणि तिथेच माझी आईही प्राध्यापिका होती. आल्या आल्याच … Continue reading माझे पहिले चाहते प्राध्यापक ए.व्ही.आरोसकर 

आनंदाचा धबधबा – अनंत भावे

अनंत भावे पहिल्यांदा भेटले ते दूरदर्शनच्या पडद्यावर. दूरदर्शनवर तेव्हा ते आठवड्यातून तीन दिवस बातमीपत्र वाचून दाखवायचे काम करत. गोरापान तेजस्वी चेहरा आणि मधमाश्यांच्या पोळ्यासारखी दिसणारी दाढी (तेव्हा ती काळी होती!). डोक्यावरचे केस मागे जाऊ लागले होते. आपल्या भेदक आवाजात, सुस्पष्ट, अचूक उच्चारांत ते बातम्या देत असत. ते स्वतः अभिनेतेही असल्यामुळे बातमीतला भाव त्यांच्या आवाजातही येत असे. मग तेव्हाच केव्हातरी त्यांची मुलांसाठीची पुस्तकेही हाती आली. ती … Continue reading आनंदाचा धबधबा – अनंत भावे

मोठी माणसे : १० 

कुसुमाग्रज : वि.वा. शिरवाडकर मागचा लेखांक मी शंकर वैद्यांवर लिहिला होता. शंकर वैद्य स्वतःच्या कविता ग्रंथरूपाने संपादित करण्याबाबत उदासीन होते; पण इतर मोठ्या कवींच्या कवितांच्या संपादनाचे काम त्यांनी साकल्याने केले. त्यांतले मुख्य होते कुसुमाग्रज. आजचा लेखांक आहे त्या कुसुमाग्रजांवर. कुसुमाग्रज हे नाव शालेय वयातच पाठ्यपुस्तकांतील कवितांमुळे ओळखीचे झाले होते. नंतर त्यांच्या कविता नियतकालिकांतून आणि संग्रहांतून भेटीस येत राहिल्या. वि. वा. शिरवाडकर या नावाने त्यांनी लिहिलेली … Continue reading मोठी माणसे : १० 

यास्मिन शेख : चिरतरुण वैयायोगिनी

     मराठीप्रेमाचा मूर्तिमंत आविष्कार असे ज्यांचे वर्णन करता येईल त्या प्रा. यास्मिन शेख २१ जून २०२४ रोजी वयाची नव्व्याण्णव वर्षे पूर्ण करून शंभराव्या वर्षांत पदार्पण करत आहेत ही सर्वच मराठीप्रेमींसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या नव्वदीनिमित्त २०१५ साली त्यांचा एक अनौपचारिक खासगी सत्कारसमारंभ त्यांच्या दोन्ही मुलींनी योजला होता. त्यात अंतर्नादच्या वतीने शेखबाईंचा सत्कार करताना साताऱ्याहून नव्वद कंदी पेढ्यांचा हार घेऊन खास आलेले डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर म्हणाले … Continue reading यास्मिन शेख : चिरतरुण वैयायोगिनी

मोठी माणसे ८ : दिलीप पुरुषोत्तम चित्रे 

   दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे नाव मी प्रथम सत्यकथेच्या (किंवा मौजेच्या) १९६४ च्या दिवाळी अंकात वाचले. मला वाटते, ‘आणि गुरुदत्त मेलेला आढळतो’ अशी त्यांची कविता होती. कविता पूर्ण आकळण्याचे माझे वय नव्हते; पण ही कविता अंकातील इतर कवितांपेक्षा वेगळी होती आणि म्हणूनच माझ्या लक्षात राहिली. ही कविता केवळ त्या अंकातल्या इतर कवितांपेक्षा वेगळी होती असे नाही.  आज विचार करता असे वाटते की, ही कविता स्वतः दिलीप … Continue reading मोठी माणसे ८ : दिलीप पुरुषोत्तम चित्रे 

मोठी माणसे ६

रा.ग. जाधव  १९९५ हे वर्ष. त्यापूर्वी रा.ग.जाधवांचे समीक्षात्मक लेखन नियतकालिकांतून वाचले होते. पुस्तके मुळातून वाचली नव्हती; पण त्यांची वाखणणी ऐकून होतो. माझा ‘मनातले घर’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आणि तो देण्यासाठी मी अनुराधा पोतदारांकडे त्यांच्या घरी गेलो होतो. तिथे रा.ग. जाधव पहिल्यांदा भेटले. मी त्यांनाही माझे ‘मनातले घर’ दिले. त्या वेळी जाधवांच्या प्रकृतीच्या काही तक्रारी उद्भवल्या होत्या. अनुराधाबाई जाधवांना प्रकृतीची काळजी घ्यायला सांगत होत्या. अनुराधाबाईंचा … Continue reading मोठी माणसे ६

मोठी माणसे ५

बाळ गाडगीळ    बाळ गाडगीळ यांचे विनोदी लेखन मी लहानपणापासून वाचत आलो होतो. मला त्यांचे विडंबनपर लेखन विशेष आवडत होते; विशेषतः ‘अखेर पडदा पडला, एकच प्याला पण कोण?’  वगैरे नाटकांचे विडंबन करणारे लेखन; पण प्रत्यक्ष भेट बरीच उशिरा झाली. तसा मी १९६५ ते १९६७ पर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयात होतो. तेव्हा ते तिथे उपप्राचार्य होते, अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. ‘रसिक मंडळ’ असे काहीतरी मंडळही ते चालवीत होते; पण गाडगीळ … Continue reading मोठी माणसे ५