पुस्तक परीक्षण : आशावाद जागवणाऱ्या… लढायला बळ देणाऱ्या… बाभळीच्या बाया!

साप्ताहिक साधनेत मागील वर्षी वनश्री वनकर यांची झरी-जामनीतील स्त्रिया ही लेखमाला अधूनमधून वाचत होतो. वाचलेला प्रत्येक लेख मनाचा ठाव घेत होता. काहीतरी सकस, अर्थपूर्ण, आशावादी लेखन हाती लागल्याचा आनंद मिळत होता. लेखावरच्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया ही लेखमाला नक्कीच गाजणार याची साक्ष देत होत्या. तेव्हापासून या लेखमालेचे लवकरच पुस्तक येणार आहे याचीही चाहूल लागली होती. त्यामुळे कधी एकदा हे पुस्तक प्रकाशित होतेय आणि कधी आपण वाचतोय अशी … Continue reading पुस्तक परीक्षण : आशावाद जागवणाऱ्या… लढायला बळ देणाऱ्या… बाभळीच्या बाया!

अभिवाचन : एक कविता 

The Recipe by T. P. Kailasam A bit of bone, a bit of skin, A toothless smile, a sunken chin, Two flapping ears, two kindly eyes, A spirit that can scale the skies; A yard of cloth, a stick in hand, To walk the length of motherland; A cup of goat’s milk, dates and grain, A heart that feels another’s pain; A soul attuned to … Continue reading अभिवाचन : एक कविता 

प्रतिसाद : रविकिरण मंडळ

ई अंतर्नाद ऑगस्ट २६ मधला  अरुण कानेटकर यांचा रविकिरण मंडळावरील लेख  वाचला. मराठी साहित्याच्या इतिहासात काही चळवळींचे महत्त्व त्यांच्या तत्कालीन लोकप्रियतेपेक्षा त्यांनी पुढील साहित्याला दिलेल्या दिशेमुळे ठरते. रविकिरण मंडळ ही अशीच एक महत्त्वाची साहित्यिक घटना होती.  हा लेख या जुन्या काव्यपरंपरेकडे पुन्हा वळून पाहण्याची संधी देतो. लेखाची सुरुवातच कवी गिरीश यांच्या ‘मराठी नाट्यछटा’ या पुस्तकातील ‘We are seven’ या उल्लेखाने आणि सहकाऱ्यांना केलेल्या अर्पणाने होते. … Continue reading प्रतिसाद : रविकिरण मंडळ

पुनरपि जननं : भाग १९ 

अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली  ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.  ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे : हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे … Continue reading पुनरपि जननं : भाग १९ 

झुकझुक आगीनगाडी : लेख क्र. १९

पाहुणचार    मध्यरेल्वेच्या सोलापूर मंडळामध्ये अनेक धार्मिक व इतर पर्यटन स्थळे आहेत. उदा. शिर्डीचे साईबाबा, पंढरपूरचे श्रीविठ्ठल मंदिर, नळदुर्ग किल्ला व तेथील ‘नर-मादी’ धबधबा, तुळजापूर, गाणगापूर, भिगवणजवळील फ्लेमिंगो अभयारण्य, सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर, दत्त चौकातील चर्च, तसेच कलबुर्गी (गुलबर्गा) येथील मशीद आणि मंदिरे. ज्या वेळी एखाद्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी तपासणीसाठी येतात, त्या वेळी त्यांचे देवदर्शन आणि त्यातही फुकटचे व्ही.आय.पी. दर्शन व त्यांची सरबराई करणे म्हणजे सोलापूरमधील … Continue reading झुकझुक आगीनगाडी : लेख क्र. १९

ज्ञानपीठ पुरस्कार लेख ७

महादेवी वर्मा : विसाव्या शतकातील सर्वाधिक प्रभावशाली हिंदी लेखिका १९८१ मध्ये अमृता प्रीतम यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कारानंतर पुढल्याच वर्षी तो सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिका महादेवी वर्मा यांना मिळावा ही गोष्ट दोन कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरते : एक म्हणजे स्त्रीलेखिकांना हा पुरस्कार लागोपाठ दोन वर्षी मिळणे आणि दुसरे म्हणजे  अमृता प्रीतम यांनीदेखील हिंदीमध्ये विपुल प्रमाणात लिहिले आहे.  हिंदी भाषा : इतिहास, वर्तमान, साहित्य आणि साहित्यिक  महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून … Continue reading ज्ञानपीठ पुरस्कार लेख ७

रविकिरण मंडळाची कविता

‘How many are you then, said I, if they two are in heaven? Quick was the little maid’s reply, oh master! We are seven.’ ‘मराठी नाट्यछटा’ या छोटेखानी पुस्तकाच्या प्रारंभी कवी गिरीश यांनी  उद्धृत केलेल्या या ओळी रविकिरण मंडळाच्या सदस्यांची स्मृती जागवतात. त्यांनी अर्पणपत्रिकेत लिहिलंय, ‘या करुण सुंदर ओळींची यथार्थ  स्मृति करून देणाऱ्या माझ्या प्रिय सहकाऱ्यांना!’    तीस वर्षांपूर्वी साहित्य अकादमीतर्फे ‘रविकिरण मंडळाची निवडक कविता’ हा … Continue reading रविकिरण मंडळाची कविता

 वाल्मीकीयरामायणाचे उत्तरकांड

भारतीय जनमानसावरचे रामकथेचे गारुड केवळ असामान्य आहे. कितीही वेळा वाचली, पाहिली, तरी मन भरत नाही, अशी ही कथा. त्यामुळे अनेक लेखकांकडून तिच्याविषयी लिहिणे हे घडत आलेले आहेच. आजही तिच्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेबद्दल लिहिले जाते. ती कथा आपल्या भाषेत लिहिणे, एवढेच नव्हे तर आपल्या मनाप्रमाणे तिच्यात काही बदल करून लिहिणे, शिवाय तिच्यात अन्य कथा रचून मिसळणे वा घुसडणे हेही घडत आले आहे. त्यामुळेच, रामायणांची संख्या तीनशे आहे, … Continue reading  वाल्मीकीयरामायणाचे उत्तरकांड

मोरोपंत भाग ३ : बालमंत्ररामायण

रामाविषयीची भक्ती व्यक्त करण्यासाठी १९०० कडव्यांचं मंत्ररामायण लिहूनही मोरोपंतांचं समाधान झालं नाही. कॅलिडोस्कोपमधून  विविध कोनांतून वेगवेगळ्या आकृती निरखाव्यात तसं मोरोपंत वेगवेगळ्या कोनांतून रामायण निरखत होते. मंत्ररामायणाप्रमाणे बालमंत्ररामायणातही श्रीरामाचा जप त्यांनी गुंफला आहे.   बालमंत्ररामायण हे  रामाच्या लहानपणीचे वर्णन नसून ते केवळ ३९ कडव्यांचे लहानसे रामायण आहे म्हणून या काव्याला बालमंत्ररामायण संबोधले आहे.  मंत्ररामायण आणि बालमंत्रारामायण यांत सुरुवातीच्या ९ व्या ओळीत कथेत  फरक दिसतो.  मंत्ररामायणात पुत्रप्राप्तीसाठी … Continue reading मोरोपंत भाग ३ : बालमंत्ररामायण

आगामी – भारत भ्रमण : एक कोलाज

आपल्या भारत  देशात असलेली थक्क करून सोडणारी विविधता आणि त्या विविधतेला बांधून ठेवणारी एकता यांचे अनुभव शब्दबद्ध करीत आहेत अंतर्नादकार भानू काळे.   भारतभर प्रवास करून सिद्ध झालेला हा वेगळा अनुभव पुस्तक रूपात लवकरच येत आहे.  “Many pieces, One picture.” Continue reading आगामी – भारत भ्रमण : एक कोलाज