वाल्मीकीयरामायणाचे उत्तरकांड

भारतीय जनमानसावरचे रामकथेचे गारुड केवळ असामान्य आहे. कितीही वेळा वाचली, पाहिली, तरी मन भरत नाही, अशी ही कथा. त्यामुळे अनेक लेखकांकडून तिच्याविषयी लिहिणे हे घडत आलेले आहेच. आजही तिच्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेबद्दल लिहिले जाते. ती कथा आपल्या भाषेत लिहिणे, एवढेच नव्हे तर आपल्या मनाप्रमाणे तिच्यात काही बदल करून लिहिणे, शिवाय तिच्यात अन्य कथा रचून मिसळणे वा घुसडणे हेही घडत आले आहे. त्यामुळेच, रामायणांची संख्या तीनशे आहे, … Continue reading  वाल्मीकीयरामायणाचे उत्तरकांड

 रघुवंशातील राजेशाही

मानवाच्या इतिहासातली पहिली राज्यव्यवस्था बहुधा राजेशाही ही असावी. विविध कुले (clans) आपले शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी सर्वांत शक्तिशाली माणसाला नायक म्हणून निवडत असतील. त्या बदल्यात ती त्याला मान व खंडणीसारखे धन देत असावीत. हा नायकच पुढे राजा होत गेला असेल, असा तर्क करता येतो. भारतवर्षात तर ‘ना विष्णुः पृथिवीपतिः’ असे म्हणून राजाला पूजनीय मानले गेले होते. हजारो वर्षे अनेक प्रदेशांत ती स्वीकारली गेली होती. मात्र गेल्या … Continue reading  रघुवंशातील राजेशाही

वाल्मीकीय रामायणातील पावसाळा  

आषाढाच्या पहिल्या दिवशी सर्वच वाचकांना, रसिकांना कालिदासाची आठवण येते. वाचने, व्याख्याने वगैरेंनी कालिदासदिन साजरा केला जातो. पावसाच्या धारा पाहताना मेघदूताची आठवण न होणारा रसिक विरळाच! पण केवळ रसिकराज कालिदासच नव्हे तर अंगावर वारुळ निर्माण होईपर्यंत तपश्चर्या करणारे ऋषी वाल्मीकीसुद्धा पावसाच्या धारांनी आनंदविभोर होतात, हे पाहून अंतःकरण भरून येते. कालिदासाने त्याच्या आधीच्या काळातले सर्व वाङ्मय वाचलेले आहे, हे त्याची ग्रंथसंपदा वाचताना जाणवत असतेच. रामायणात ‘कुमारसंभव’ असा … Continue reading वाल्मीकीय रामायणातील पावसाळा