आंदोलन हस्तांचे व मनाचे 

एका स्नेहसंमेलनात मला एक ओळखीचा मुलगा भेटला.  “काय म्हणताय? किती दिवसांनी भेटतोय आपण!” असं म्हणत त्याने हात पुढे केला. मी त्याच्याशी हस्तांदोलन केलं. त्याच्या हाताची पकड अगदी सैल होती. तेवढ्यात माझा नवरा आला आणि त्या मुलाने त्याच्याशीही हस्तांदोलन केलं. या वेळी मात्र ती पकड अगदी घट्ट, आत्मविश्वासपूर्ण होती. तो फरक इतका स्पष्ट होता, की मला तो जवळजवळ विनोदी वाटला. दुसऱ्या वेळी मला याच्या अगदी उलट … Continue reading आंदोलन हस्तांचे व मनाचे 

नावात काय आहे? 

एकदा दुपारच्या उन्हात, भर तीन वाजता माझी आत्तेबहीण वाण्याच्या दुकानात गेली. तिने चांगल्यातली बिस्किटं (क्रॅकजॅक!) घेतली. पैसे देत असताना तिला एक मैत्रीण भेटली.  ‘उन्हाची कुठे आलीस बिस्किटं घ्यायला?’ ‘अगं, आमच्या जोबीसाठी.’ ‘अय्या, तुम्ही कुत्रा कधी घेतला?’ —— चांगल्यातली बिस्किटं (क्रॅकजॅक!) खाणारी, कुत्रा नाही ती – जोबी – म्हणजे मी.  नाव निवडताना माझ्या आईवडिलांनी जोडाक्षरांनी ठासून भरलेलं ‘ज्योत्स्ना’ हे नाव ठेवलं खरं, पण मी अमेरिकेत पाळणाघरात … Continue reading नावात काय आहे? 

   अडुळसा : महत्त्वाची आयुर्वेदिक वनस्पती 

  अडुळसा ही आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. अडुळशाचं रोपटं तीन  साडेतीन  फुटांचं असतं. हे  रोपटं दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात  पांढऱ्याशुभ्र फुलांनी बहरून येतं. पानं लांबट, निमुळत्या आकाराची. पानांचा रंग हिरव्यापेक्षा पोपटी रंगाकडे झुकणारा. पानं  अगदी जमिनीलगतच्या  खोडापासून ते अगदी वरपर्यंत दिसतात. त्यामुळे पानांनी बहरलेल्या रोपट्याचा  आकार दुरून साधारण  त्रिकोणी  वाटतो. वर्षभरात या रोपट्याकडे फार लक्ष जात नाही; परंतु जानेवारीच्या शेवटास हे झाड हिरव्या रंगाच्या  कळ्यांनी … Continue reading    अडुळसा : महत्त्वाची आयुर्वेदिक वनस्पती 

आर्किटेक्चरचा वेगळा प्रवास : प्रॉडक्शन डिझाइन आणि थीम्ड एंटरटेनमेंट

लहानपणापासून असलेली चित्रकलेची आवड, जागा आणि रचना याबद्दलची उत्सुकता यामुळे मी आर्किटेक्चर हे शिक्षणाचे क्षेत्र निवडले आणि भारतात आर्किटेक्चरची पदवी पूर्ण केली. आर्किटेक्चर शिकताना केवळ इमारती कशा उभ्या राहतात हेच शिकवले जात नाही, तर माणूस आणि स्पेस यांच्यातील नातं समजून घ्यायला शिकवलं जातं. एखादी जागा माणसाला कशी वाटते, तो त्या जागेत कसा वावरतो, त्या जागेचा अनुभव त्याच्या भावनांवर कसा परिणाम करतो हे सगळं आर्किटेक्चरचं खरं … Continue reading आर्किटेक्चरचा वेगळा प्रवास : प्रॉडक्शन डिझाइन आणि थीम्ड एंटरटेनमेंट

धर्म नावाची मजेशीर गोष्ट

समाज कुटुंबाचा बनलेला असतो. ही कुटुंबे वेगवेगळे धर्म बाळगून असतात.  कुटुंबात  जन्म झाला, की आपण त्या कुटुंबाच्या धर्माचे बनून जातो.  कुटुंब हिंदू असेल तर आपण आपसूक हिंदू म्हणून ओळखले जातो. एवढ्यावर संपत नाही. ज्या धर्मात जन्म झालाय त्या धर्माचा अभिमान बाळगण्याची पद्धत असते. त्या पद्धतीनुसार आपण जन्माने प्राप्त झालेल्या धर्माचा अभिमान बाळगायला लागतो. एकप्रकारची सक्तीच असते ती. कोणी विचारत नाही, ‘तू ज्याबद्दल अभिमान बाळगतो आहेस … Continue reading धर्म नावाची मजेशीर गोष्ट

चित्रकथा : कच्छ पुनश्च

 माझी कच्छला जाण्याची ही  तिसरी वेळ. ‘कच्छ देखा, मगर बहोत कुछ नहीं देखा.’  असा अनुभव आला. सुरुवात झाली ती एका स्वप्नाने. ३४ कि.मी.चा एकेरी, अरुंद, सरळ, समांतर, एकही वळण नसणारा, खाचखळगे नसलेला ‘Road to the Heaven.’  ह्या रस्त्यावर मनसोक्त फिरायचे – हात लांब केले तर जणू हाताला अथांग मीठसागर लागेल! त्या मीठसागरात उगवता, मावळता सूर्य बघायचा. रात्री चंद्राच्या शीतलतेत चमचमणारे ‘मीठ-हिरे’ डोळ्यांनी मनसोक्त वेचायचे.  पण … Continue reading चित्रकथा : कच्छ पुनश्च

दिलासा 

उमा बेडेकर, वय वर्षे ८५ यांनी, १४/०८/२००० ते १९/०८ /२००० या कालावधीत केलेल्या एका प्रवासाचे हे वर्णन आहे. पंचवीस वर्षांपूर्वी लिहिलेला हा लेख आहे. प्रवास साधाच, अक्कलकोट- पंढरपूर-तुळजापूर वगैरे असा आहे; पण लेखामध्ये जे जुन्या मराठी सांस्कृतिक वळणांचे उल्लेख आहेत, ते वाचनीय आहेत. उमाताई अगदी लहानपणी लग्न होऊन गुजरातमध्ये स्थायिक झाल्या. तिथल्या शाळांमध्ये त्यांनी चित्रकला आणि हिंदी शिकवले पण तरीही त्यांची मराठीशी नाळ जोडलेली राहिली. … Continue reading दिलासा 

शब्दांविना संवाद, डोळे बोलतात सारे… 

काही दिवसांपूर्वीचा  ‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्याना’मधील हा विलक्षण अनुभव – अनुभव म्हणण्यापेक्षा एक अनुभूती असे म्हणू या हवे तर…  नशीब म्हणा, योगायोग म्हणा, की काहीही असो, मला जंगलात किंवा सातारा शहराच्या आसपास, अगदी माझ्या घराच्या दारातदेखील  बिबट्याचे दर्शन पुष्कळ वेळा झाले आहे. प्रत्येक जंगल सफारीमध्येतर मला हमखास व्याघ्रदर्शन होणार हे नक्की असते.  बिबट्या पुष्कळ वेळा मला अगदी निकट दर्शन देऊन गेला आहे. वाघ मात्र तसा … Continue reading शब्दांविना संवाद, डोळे बोलतात सारे… 

अर्धसत्य

सगळा जन्म शिकण्यात अन् शिकविण्यात गेला. आता खोल विचार केल्यावर लक्षात येते, की आपल्याला नेहमी अर्धसत्य शिकवले गेले. आपणही तोच कित्ता गिरवत अर्धसत्य शिकवले; कारण सगळे शिकवणे हे परीक्षेसाठी होते. शिकण्यासाठी, ज्ञान संपादन करण्यासाठी नव्हते. बरे, परीक्षा म्हणजे तरी काय… तर ठरावीक प्रश्नांची ठरावीक वेळात ठरावीक उत्तरे लिहिणे, अन् मोबदल्यात अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळवणे! आधी अर्धसत्य कसे ते समजून घेऊ. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज १८० … Continue reading अर्धसत्य

रमणीय आनंदवनाच्या सावल्या…

एके काळी मुंबईत अत्यंत शांत, वनराईने नटलेल्या, मोठी मैदाने असणाऱ्या, विहिरींचे मुबलक व शुद्ध पाणी वापरणाऱ्या, मुलांना सुरपारंब्या खेळता येणाऱ्या, घराच्या आवारातच विस्तृत मैदान आणि शाळाही असणाऱ्या, चार पावलांवर सुरेख मंदिर असणाऱ्या आणि वनराईने नटलेल्या अशा अनेक वसाहती होत्या. आता त्यांतल्या एकेक स्मृतिशेष होत आहेत; पण ज्या काही मोजक्या टिकून आहेत, त्यांतली एक आहे जोगेश्वरीची ही सरस्वती बाग. यंदा या सोसायटीच्या स्थापनेला बरोबर शंभर वर्षे … Continue reading रमणीय आनंदवनाच्या सावल्या…