झुकझुक आगीनगाडी : लेख क्र. १९

पाहुणचार    मध्यरेल्वेच्या सोलापूर मंडळामध्ये अनेक धार्मिक व इतर पर्यटन स्थळे आहेत. उदा. शिर्डीचे साईबाबा, पंढरपूरचे श्रीविठ्ठल मंदिर, नळदुर्ग किल्ला व तेथील ‘नर-मादी’ धबधबा, तुळजापूर, गाणगापूर, भिगवणजवळील फ्लेमिंगो अभयारण्य, सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर, दत्त चौकातील चर्च, तसेच कलबुर्गी (गुलबर्गा) येथील मशीद आणि मंदिरे. ज्या वेळी एखाद्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी तपासणीसाठी येतात, त्या वेळी त्यांचे देवदर्शन आणि त्यातही फुकटचे व्ही.आय.पी. दर्शन व त्यांची सरबराई करणे म्हणजे सोलापूरमधील … Continue reading झुकझुक आगीनगाडी : लेख क्र. १९

झुकझुक आगीनगाडी :१८  

मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडल (कार्यक्षेत्र : वाडी—ते दौंड, दौंड ते मनमाड, लातूर ते कूर्डवाडी ते मिरज) मध्ये अतिवेगाने खूपच सुधारणा  होत होत्या आणि त्यासुद्धा माझ्या कार्यकाळातच होत होत्या. त्यामुळे मी जास्तच तंत्रस्नेही होऊ लागलो. आम्हां इंजीनियर लोकांना Android सारखे कायम अपडेट राहवेच लागते. “बदला, नाहीतर नष्ट व्हा!” ‘मला माहीत नाही, येत नाही’ अशा सबबी  अजिबात  चालत नाहीत. ह्यासाठी रेल्वे प्रशासन  आमच्यावर नवनवीन तंत्रज्ञान शिकवण्यासाठी खूप … Continue reading झुकझुक आगीनगाडी :१८  

झुकझुक आगीनगाडी  : १७

रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये समन्वय असावा आणि रेल्वेतील आंतरविभागीय कारभार  सुरळीत चालावा  याकरता प्रत्येक  विभागाची  एक संहिता असते आणि वेळोवेळी त्यामध्ये सुधारणा होत असतात. ह्या लहान मोठ्या  सुधारणांची अंमलबजावणी योग्य वेळी आणि योग्य कालमर्यादेत  होते की नाही याकरता अतिउच्चस्तरीय बैठका होतात  आणि त्या सुधारणांची अंमलबजावणी झाली की नाही  याची त्या  ठिकाणी तपासणी केली जाते. अशा अतिउच्चस्तरीय  तपासण्यांमध्ये त्या रेल्वे प्रभागातील त्या-त्या विभागाचे, महाव्यवस्थापक दर्जाचे अधिकारी आणि … Continue reading झुकझुक आगीनगाडी  : १७

झुकझुक आगीनगाडी : १६ 

रेल्वेमध्ये  आणि रेल्वे परिसरात प्रवाशांना जितक्या सोई दिल्या जातात त्यापेक्षा अधिक सोई कोणत्याही  वाहतूक व्यवस्थेत दिल्या जात असतील असे मला तरी वाटत नाही. उदा. स्टेशनवरील फुकट Wi-Fi, सर्व प्रकारच्या उद्घोषणा, डिजिटल घड्याळे, प्रतीक्षागृह, स्नानगृहे, शौचालये, वेगवेगळी Apps, घरात बसून आरक्षण इ. अर्थात, प्रसंगी या सोई-सुविधांचा दर्जा  कमी जास्त होत असेलही.  मुंबईमध्ये मी रेल्वे  आणि  रेल्वे परिसर येथेच राहणारे लोक पाहिलेत, ते फक्त आठवडा किंवा १५ … Continue reading झुकझुक आगीनगाडी : १६ 

झुकझुक आगीनगाडी(१५) :  पुनश्च सोलापूर

कोकण रेल्वेत सुरुवातीपासूनच OFC तंत्र होते. मी तिथे उपकरण बदलणे, OFC Cable आणि उपकरणांतील  त्रुटी काढणे आणि पूर्ण कोकण रेल्वे भारतीय रेल्वेच्या दळणवळण नकाशावर (NMS) आणणे एवढेच, पण ३ ते ४ महिने चालणारे क्लिष्ट आणि जिकीरीचे  काम करत होतो; कारण  हे सर्व काम मला तेथील चालू असलेली सिग्नल आणि दूरसंचार प्रणाली  बंद न करता करायचे होते.   ‘कोणतेही काम जितके क्लिष्ट असेल  तिकका त्याचा तो अनुभव … Continue reading झुकझुक आगीनगाडी(१५) :  पुनश्च सोलापूर

झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.१४        

——————————————————————————————– श्री. जॉर्ज मैथ्यू फर्नांडीस  (३जून १९३० – २९ जानेवारी २०१९ ) कोकणकिनारी मंगलोर येथे जन्म झालेले समाजवादी नेते. मंगलोर येथील वाहतूकक्षेत्रात कामगार नेते होते, तेव्हापासून, ‘मुंबईला रेल्वेने कसे जाता येईल?’ हाच विचार त्यांच्या मनात घोळत असे.  रेल्वेमंत्री असताना त्यांची नजर ३० जून १९९० रोजी सरकारी सेवेतून निवृत्त होणाऱ्या ई. श्रीधरन (अभियांत्रिकी सदस्य, रेल्वे बोर्ड )  यांच्याकडे गेली आणि त्यांनी श्रीधरन यांना  कोंकण रेल्वेबद्दल सांगितले.  … Continue reading झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.१४        

झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.१३  

लेखमाला सुरू  होऊन एक वर्ष झाले. हा लेख आणि पुढील लेख हे कोकण रेल्वे आणि इ . श्रीधरन यांच्याबद्दल आहेत. कोकण रेल्वेमध्ये विशेष नियुक्ती म्हणून मी तीन महिने होतो. माझ्या कामाबरोबर मी उत्सुकतेने इतर खात्यांची कामे पाहत होतो. त्यामध्ये स्थानकाची रचना, वापर केले गेलेले रूळ, त्यांचे वजन, बलास्ट (रुळाच्या खाली घालतात ती खडी आणि तिचा आकार) आमच्या आणि इतर खात्यांशी निगडित उपकरणे, तिकिटाचे दर, प्रवाशांना … Continue reading झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.१३  

झुकझुक आगीनगाडी :१२

‘कोकण रेलटेल प्रोजेक्ट’ संपवून मी सोलापुरला परत आलो. इथेसुद्धा  आता  सोलापूर ते वाडी दरम्यान असलेल्या भागात  ६०% केबल टाकून झाली होती. उरलेली केबल  टाकणे आणि केबलची जोडणी इत्यादी  छोटी मोठी कामे बाकी  होती. हैदराबादच्या एका कंपनीला हे कंत्राट  मिळाले होते. केबलची जोडणी करणारा मुलगा पोरसवदा होता पण त्याचे केबल जोडण्याचे कौशल्य खूपच उत्तम होते. OFC चे तंत्रज्ञान त्याला काहीच माहिती नव्हते. पण केबलची जोडणी यांत्रिक … Continue reading झुकझुक आगीनगाडी :१२

झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.११ 

माझा कोकण दौरा छान चालला होता. नवीन रेल्वे मार्ग, नवा निसर्ग. रेल्वेचे तेच  नियम; पण वेगळ्या पद्धतीची ‘अंमलबजावणी’ पाहत होतो. एक-एक स्टेशन कार्यान्वित करत करत मी उडुपीला पोहोचलो. संध्याकाळी काम झाल्यावर तेथील कृष्णमंदिरात जाऊन आलो. खूपच छान आणि प्रसन्न आहे. प्रसाद म्हणून पुजाऱ्याने मला मूर्तीवर लावलेल्या हळद आणि  चंदनाच्या लेपाचा छोटासा गोळा आणि त्याच रंगाचा  पेढा दिला. मी चुकून लेपाचा गोळा प्रसाद समजून तोंडात टाकला. … Continue reading झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.११ 

झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.१०

माझ्या कामाची व्याप्ती वाढतच  होती. अधूनमधून मला कोकण रेल्वेलासुद्धा जावे लागायचे. त्या ठिकाणी आधीच OFC Cable घातली होती. नवीन उपकरणे बसवण्यासाठी मला  कोकण रेल्वेला जाण्याचा आदेश  नवी दिल्लीहून  निघाला. आता मी थेट  रेल्वे मंत्रालयाच्या अधीन होतो; कारण सोलापूर परिक्षेत्रात  पुणे ते वाडी   ह्या भागात  फक्त केबल  घालण्याचेच काम होते. बाकीचे सोपस्कार म्हणजे – केबल तपासणे, जोडणे, उपकरणे लावणे आणि ती कार्यान्वित करणे इ. कामे  … Continue reading झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.१०