झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.९

  पंढरपूर  मिरजचे ब्रॉड गेजमध्ये कसे रूपांतर झाले झाले ते गेल्या लेखात आपण पाहिले.  परिणामतः आता थेट मुंबई-पंढरपूर गाडी सुरू  झाली आणि ‘पांडुरंग प्रसन्न झाला’ असे वारकरी म्हणू लागले. मग सोलापूर मंडळ खऱ्या अर्थाने  पूर्णपणे ब्रॉडगेज झाले. काही वारकऱ्यांचा रोष  आम्हांला पत्करावा लागला पण तो भाग वेगळाच; कारण पंढरपूर-मिरजमधील छोटी-छोटी स्टेशने बंद झाली. काही मोजकीच स्टेशने शिल्लक राहिली. चालायचेच! हळूहळू तो  विरोध मावळला. एकंदरीत काय? … Continue reading झुकझुक आगीनगाडी : लेख क्र.९

झुकझुक आगीनगाडी: ८  

पंढरपूर – मिरजचे आता ब्रॉड गेजमध्ये  रूपांतर होणार म्हणून काही दिवसांनी आम्ही सर्व खातेप्रमुख   पंढरपूर-मिरज विभागात  गेलो; कारण आता तो मार्ग मीटर – गेजच्या ऐवजी ब्रॉड गेजमध्ये (सोप्या भाषेत मार्गाचे विस्तारण होणार)  रूपांतरित   होणार होता. आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या विभागाची उपकरणे, यंत्रे काढणार होतो. ती आमची मीटर गेजवरील शेवटची यात्रा होणार होती आणि तो रेल्वे मार्ग बंद होणार होता. या मार्गावरील झालेले वारकर्‍यांचे … Continue reading झुकझुक आगीनगाडी: ८  

झुकझुक आगीनगाडी: भाग ७

माझा रेल्वेतील दिनक्रम व्यवस्थित चालू होता. हळूहळू, अनेक मुलींचे पालक मला एक योग्य स्थळ म्हणून पाहू लागले. ही कुजबुज माझ्या आईच्या कानावर पडू लागली आणि तिच्यातील वरमाई जागी झाली. अर्थात मुलाचे लग्न व्हावे आणि सुनेचे मुख पाहावे, ही तिची स्वाभाविकच इच्छा होती. माझेही लग्नाचे वय झाल्यामुळे मी फारसे आढेवेढे न घेता लग्नासाठी होकार दिला. मुलाच्या लग्नाची मोहीम फत्ते करण्यासाठी ती जोरात कामाला लागली. २७ स्थळे … Continue reading झुकझुक आगीनगाडी: भाग ७

 झुकझुक आगीनगाडी :  लेख क्र.६ 

माझे सोलापूर आणि रेल्वे आता तांत्रिकदृष्ट्या मी बराच सक्षम झालो होतो. एक उत्तम संकेत आणि दूरसंचार रेल्वे अभियंता म्हणून मी सरावलेला म्हणण्यापेक्षा, रेल्वेच्या प्रत्येक कामाला ‘रुळावलेला’ झालो होतो असे म्हणायला हरकत नाही. कोणतेही काम सराव झाल्याखेरीज आणि आपल्याला काय-काय करायचे आहे व कसे करायचे आहे  याचे थोडक्यात पूर्वनियोजन असल्याशिवाय उत्तम पद्धतीने अमलात आणता येत नाही, मग ते क्षेत्र कोणतेही असो. माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर आणखीन एक … Continue reading  झुकझुक आगीनगाडी :  लेख क्र.६ 

झुकझुक आगीनगाडी: (५) 

माझे   सोलापूर आणि रेल्वे    अशा अनेक सुधारणा करत करत मी सोलापूरच्या बदलीसाठी वाट पाहत होतो आणि तो एक दिवस आला.  सोलापूर हे मध्य रेल्वेचे दक्षिण आणि उत्तर जोडणारे म्हणून आणि पेट्रोल/ डिझेल/मालवाहतूक आणि सिमेंटसाठीचे प्रसिद्ध असे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे इथे सर्वच खात्यांवर इतर ठिकाणी असलेल्या खात्यांपेक्षा जरा जास्तीची  जबाबदारी असते; त्यामुळे दळण-वळण ठप्प होणे परवडणारे नव्हते. या गोष्टीचा मला चांगलाच फायदा झाला. कामाचा … Continue reading झुकझुक आगीनगाडी: (५) 

झुकझुक आगीनगाडी : ४

माझे सोलापूर आणि रेल्वे. सर्व सोपस्कार आटपून मी सोलापूर मंडळ (Division) कार्यालयात रुजू झालो. मला आता हिंदी बोलण्याची चांगलीच सवय झाली होती. येथील सर्व स्टाफ मला बाहेरचाच समजत होता. सोलापूर हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे मंडल (Division) असल्यामुळे इथल्या कामाची व्याप्ती चांगलीच मोठी होती. माझ्या वरिष्ठांनी मला सोलापूरची माहिती घ्यायला सांगितली. सोलापुरातील उपकरणे इतरांच्या तुलनेत जराशी वेगळीच (आय. टी. आय. ITI बेंगलुरू आणि अमेरिकन कंपनीची  होती … Continue reading झुकझुक आगीनगाडी : ४

झुकझुक आगीनगाडी : ३

प्रशिक्षणादरम्यान माणसे  व यंत्रे यांचे खूप वेगवेगळे अनुभव आले. हे अनुभव दैनंदिन जीवनातसुद्धा खूप उपयुक्त ठरले.  Classroom आणि Field चे सर्व ट्रेनिंग झाल्यावर आमची  वर्यताक्रम ठरविण्यासाठी साठी नाममात्र परीक्षा झाली. माझ्या दुर्दैवाने त्या वेळी महाराष्ट्रात मुंबई, नागपूर,भुसावळ आणि सोलापूर या ठिकाणी माझ्या पदाची रिक्त जागाच नव्हती. त्यामुळे  मला जबलपूर मंडलमधील NKJ ( New Katni Junction) या ठिकाणी रुजू व्हावे लागले. आता मी शिकाऊ उमेदवार नव्हतो; … Continue reading झुकझुक आगीनगाडी : ३

झुकझुक आगीनगाडी  : लेख क्र.२ 

   रेल्वेमध्ये नोकर भरतीचे विविध प्रकार आहेत : १ रेल्वे भरती मंडळ (RRB) / भारतीय प्रशासनिक सेवा (UPSC)  यांच्याद्वारे  २ कला/खेळ  विशेष प्रावीण्यप्राप्त खेळाडूंची थेट भरती   ३ अनुकंपा तत्त्वावर भरती    ४ SCOUTआणि GUIDE यांत प्रावीण्य मिळवलेल्या मुलांना प्रवेश  ५ इतर सक्षम अधिकारान्वये जेव्हा  सरळ क्र. १ द्वारे भरती होते तेव्हा पात्र उमेदवाराला  त्या खात्याबद्दल काही महिने/वर्षे  प्रशिक्षण  दिले जाते आणि मगच खातेनिहाय परत परीक्षा घेऊन … Continue reading झुकझुक आगीनगाडी  : लेख क्र.२ 

झुक झुक अगीनगाडी… १ 

भारतीय रेल्वे ही केवळ वाहतुकीचे एक  साधनमात्र  नसून ती भारताची जीवनवाहिनी आहे. जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यापैकी  एक असलेली भारतीय रेल्वे, दररोज कोट्यवधी प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवते. ही रेल्वे केवळ लोकांसाठीच नाही, तर  भारतीय अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाची आहे. मालवाहतुकीतही  रेल्वेचा मोठा वाटा आहे, ज्यामुळे देशाच्या विकासाला चालना मिळते. भारतीय रेल्वेचा इतिहास १६०  वर्षांहून अधिक जुना आहे. तेव्हापासून, आजपर्यंत तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे रेल्वेने अनेक बदल पाहिले आहेत. … Continue reading झुक झुक अगीनगाडी… १