अभिवाचन : एक कविता 

The Recipe

by T. P. Kailasam

A bit of bone, a bit of skin,

A toothless smile, a sunken chin,

Two flapping ears, two kindly eyes,

A spirit that can scale the skies;

A yard of cloth, a stick in hand,

To walk the length of motherland;

A cup of goat’s milk, dates and grain,

A heart that feels another’s pain;

A soul attuned to truth and peace,

Whose silent prayers never cease;

Boil these in trials, bake with care,

In jail and fast and constant prayer,

And lo! The recipe divine

That shaped this saint of yours and mine!

या कवितेचे देवदत्त दाभोलकर यांनी मराठीत केलेले  भाषांतर : 

एक मूठभर अस्थि असाव्या

एक मूठभर अस्थि  असाव्या 

अंजलिभरही रक्त नसावे 

उसळत प्रेमाचे शतसागर विशाल निर्मल हृदय असावे

कुठे मुखावर कानी डोळी सुंदरतेची साक्ष नसावी 

परंतु ओठावर बालांची स्मिते निरागस सदा वसावी

वाणीच्या ऋजु माधुर्याने

 फिके पडावे मधुचे सागर 

कर्तृत्वाने खुजे दिसावे हिमालयाचे गौरीशंकर

मानवतेचे पुसीत अश्रू पावन ते नित पाय फिरावे 

एक असावी काठी हाती एक वस्त्रही पुरे नसावे

सांभाळुनि ही निज अवधाने 

घडीव जा जी घडेल प्रतिमा 

आणि मुशीतुनि बापूजींची मंगलमूर्ती ओती ब्रह्मा

१९६०

पूर्व प्रसिद्धी : कवितासंग्रह : आर्त : भाव-अभाव विश्वांचे 

या कवितेचे दत्तप्रसाद दाभोळकर यांनी केलेले अभिवाचन :

Author

Leave a Reply