पुस्तक परीक्षण : आशावाद जागवणाऱ्या… लढायला बळ देणाऱ्या… बाभळीच्या बाया!

साप्ताहिक साधनेत मागील वर्षी वनश्री वनकर यांची झरी-जामनीतील स्त्रिया ही लेखमाला अधूनमधून वाचत होतो. वाचलेला प्रत्येक लेख मनाचा ठाव घेत होता. काहीतरी सकस, अर्थपूर्ण, आशावादी लेखन हाती लागल्याचा आनंद मिळत होता. लेखावरच्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया ही लेखमाला नक्कीच गाजणार याची साक्ष देत होत्या. तेव्हापासून या लेखमालेचे लवकरच पुस्तक येणार आहे याचीही चाहूल लागली होती. त्यामुळे कधी एकदा हे पुस्तक प्रकाशित होतेय आणि कधी आपण वाचतोय अशी … Continue reading पुस्तक परीक्षण : आशावाद जागवणाऱ्या… लढायला बळ देणाऱ्या… बाभळीच्या बाया!

वाचन संस्कार संवर्धन : अस्वस्थतेकडून आश्वस्ततेकडे 

 साताऱ्यात असताना कॉलेजच्या वार्षिक अंकासाठी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची मुलाखत घेतली. मुलाखत खूप चांगली झाली. पुढे विद्यापीठाने या मुलाखतीला पारितोषिक देऊन सन्मानित केले. ही मुलाखत घेत असताना डॉक्टरांच्या वागण्याबोलण्यातील, राहणीमानातील साधेपणा खूप भावला. त्यांच्या कामाचे मोठेपण लक्षात आले. या भारावलेपणातच माझ्याकडून एकही रुपया न घेता त्यांनी मला साधनेचा वर्गणीदार करून घेतले. पुढे मी हमीद सरांमार्फत  साधनेकडे  ही वर्गणी दिली. त्यामुळे आजही जेव्हा जेव्हा साधनेचा अंक घरी … Continue reading वाचन संस्कार संवर्धन : अस्वस्थतेकडून आश्वस्ततेकडे