पुस्तक परीक्षण : आशावाद जागवणाऱ्या… लढायला बळ देणाऱ्या… बाभळीच्या बाया!

साप्ताहिक साधनेत मागील वर्षी वनश्री वनकर यांची झरी-जामनीतील स्त्रिया ही लेखमाला अधूनमधून वाचत होतो. वाचलेला प्रत्येक लेख मनाचा ठाव घेत होता. काहीतरी सकस, अर्थपूर्ण, आशावादी लेखन हाती लागल्याचा आनंद मिळत होता. लेखावरच्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया ही लेखमाला नक्कीच गाजणार याची साक्ष देत होत्या. तेव्हापासून या लेखमालेचे लवकरच पुस्तक येणार आहे याचीही चाहूल लागली होती. त्यामुळे कधी एकदा हे पुस्तक प्रकाशित होतेय आणि कधी आपण वाचतोय अशी … Continue reading पुस्तक परीक्षण : आशावाद जागवणाऱ्या… लढायला बळ देणाऱ्या… बाभळीच्या बाया!

हृदयाची फाळणी :  भारताची फाळणी आणि महात्मा गांधीजी

भारताच्या फाळणीचा इतिहास हा केवळ भूगोलाच्या नकाशावर ओढलेल्या रेषांचा इतिहास नाही;  तर तो मानवी संवेदना, विश्वास  आणि स्वप्नांच्या   बघता- बघता झालेल्या धुळधाणीचा इतिहास आहे. महात्मा गांधींच्या सहवासात वाढलेले आणि गांधीविचारांचे थोर भाष्यकार नारायणभाई देसाई यांनी लिहिलेल्या ‘जिगरना चिरा’ या मूळ गुजराती पुस्तकाचा ‘हृदयाची फाळणी’ या नावाने डॉ. विश्वास पाटील यांनी केलेला मराठी अनुवाद, फाळणीच्या जखमांकडे पाहण्याचा एक नवा आणि अंतर्मुख करणारा दृष्टिकोण देतो.हे पुस्तक … Continue reading हृदयाची फाळणी :  भारताची फाळणी आणि महात्मा गांधीजी

पाय फुटलेला व्यासंग

   फोडणीतली राई तडतडताना पाहून मीनाला फुटणाऱ्या लाह्यांची आठवण येते. लाह्यांवरून पॉपकॉर्न, तिथून  मॉलमधली पॉपकॉर्न  खाणारी, केस निळे रंगवलेली बाई असा राई ते बाई मनप्रवास घडतो. हे मानसशास्त्रीय विचार-साखळीचं एक उदाहरण आहे. ‘काट्याच्या अणीवर वसली तीन गावे,’ म्हणून सुरू केलेली विचारसाखळी संत ज्ञानेश्वर प्रारब्ध, संचित आणि क्रियमाणाच्या बुक्क्यांपर्यंत नेऊन सद्गुरूच्या पायीं पोचवतात. प्रत्येकाच्या मनातल्या  विचारांची भ्रमण-साखळी वेगवेगळी असते.  डॉ.आनंद जोशींनी लिहिलेलं, ‘ऑर्वेलच्या अवतीभोवती’ हे पद्मगंधा … Continue reading पाय फुटलेला व्यासंग

पुस्तक परीक्षण : फेब्रुवारी २०२६ 

नात्यांचा पैस कवेत घेणारे काव्य म्हणजे : ‘एक नातं असंही’ हा कवितासंग्रह    मानवी जीवन आणि नातं हे अविभाज्य घटक आहेत. एकाशिवाय दुसऱ्याचा विचारही शक्‍य नाही. ‘नातं हेच जीवन’ असं म्हणूनच म्हटलं जातं. साहित्यसृष्टीत नातं हा शब्द केवळ दोन व्यक्तींमधील रक्तसंबंध किंवा सामाजिक नातेसंबंधांपुरता मर्यादित नाही; तर व्यक्तीचे भावविश्व,आत्मसंवाद, जगण्याची तत्त्वे, वेदना- आनंद यांचा परस्परांतील अदृश्य धागा यांनाही ते व्यापून आहे. ‘एक नातं असंही’ हा डिंपल … Continue reading पुस्तक परीक्षण : फेब्रुवारी २०२६ 

 पुस्तक परीक्षण : जानेवारी २०२६

 श्रेष्ठ नाटककाराची सार्थ ओळख शेक्सपिअर आणि त्याचा नाट्यसंसार                           ‘शेक्सपिअर आणि त्याचा नाट्यसंसार’ हे प्रदीप कुलकर्णी लिखित पुस्तक, मुंबईच्या मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची वेधक आणि सविस्तर प्रस्तावना लाभली आहे. त्यांच्या मते शेक्सपिअरचे महत्त्व जगातील तमाम सुसंस्कृत समाजाने अतिशय प्रगल्भपणे स्वीकारले आहे. शेक्सपिअरची अनेक वचने, सुभाषिते झाली आहेत. जगातील जवळजवळ सर्व भाषांमध्ये शेक्सपिअरची नाटके भाषांतरित झाली आहेत. कुमार … Continue reading  पुस्तक परीक्षण : जानेवारी २०२६

पुस्तक परीक्षण – डिसेंबर  २०२५

  दूरदृष्टीचा, समाजहितैषी     – :  र.धों.कर्वे  : – ‘ समाजस्वास्थ्य’कार, संततिनियमनाचे आद्य पुरस्कर्ते, र. धों.कर्वे, हे डॉ.अनंत देशमुख यांचे पुस्तक संधिकाल प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये अनंत देशमुख यांनी र.धों.कर्वे यांच्या, त्यांनी लिहिलेल्या तीन चरित्रांचे, अन्य उपलब्ध तीन चरित्रांशी तुलना करून, सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. या पुस्तकात एकूण अठरा प्रकरणे आहेत. शेवटी रघुनाथ कर्वे यांचा जीवनपट सविस्तरपणे  उलगडला आहे.  सूची आणि संदर्भग्रंथ यांची उपयुक्त माहिती … Continue reading पुस्तक परीक्षण – डिसेंबर  २०२५

पुस्तक परीक्षण : कार्यकर्ता ,एका राजाची अद्भुत गोष्ट. 

कार्यकर्ता :  लोकसाधनेचं  उत्तुंग स्वप्न साकार करणाऱ्या डॉ. राजा दांडेकर यांची आत्मकथा.  लेखक :  सुमेध वडावाला( रिसबूड) उन्मेष प्रकाशन पहिली आवृत्ती एक जून २०२५  मूल्य पाचशे रुपये.    आत्मकथा हा केवळ एका व्यक्तीच्या आयुष्याचा वृत्तांत नसून, तो मानवी अनुभवांचा, संघर्षांचा आणि त्यातून साधलेल्या प्रगतीचा एक आरसा असतो. हे आत्मकथन सुमेध वडावाला यांनी शब्दबद्ध केले आहे.  आत्मकथन कोकणातल्या एका कार्यकर्त्याची वाटचाल सांगणारे आहे.  वडावाला यांनी त्यांच्या लिखाणातून … Continue reading पुस्तक परीक्षण : कार्यकर्ता ,एका राजाची अद्भुत गोष्ट. 

पुस्तक परीक्षण : द लायब्ररी

‘द लायब्ररी’त जाच ‘चुकलीमाकली पुस्तकप्रेमी माणसं पुस्तकांच्या दुकानात, स्टॉलवर किंवा लायब्ररीत सापडतात,’ अशा अर्थाची एक जपानी म्हण आहे म्हणे! त्यातली वास्तव-अवास्तव बाजू सोडून द्या आणि मूळ मुद्दा लक्षात घ्या. अनेकदा पुस्तक-वाचन आवडणारी माणसं लायब्ररीत जातात, तिथंच पडीक असतात किंवा पुस्तकांचा महिनाभर पुरेल इतका साठा घेऊन घरी येतात. ग्रंथालयांचे साधी, फक्त संदर्भाचे, दोन्ही मिळून, घरातले असे आणि एवढेच प्रकार वाचकांना माहिती असतात. पण त्या पलीकडं जाऊन … Continue reading पुस्तक परीक्षण : द लायब्ररी

पुस्तक परीक्षण : अभिषेकी

  चरित्र लेखन ही एक कला असून यात एका प्रकारे चरित्र लेखकाचा कस लागतो. चरित्र नायकाला सादर करीत असताना सत्यनिष्ठा आणि निष्पक्षपातीपणा किती पाळला गेला आहे त्यावर चरित्र चांगले झाले आहे की नाही ते ठरते. एखाद्या व्यक्तीच्या खासगी व सार्वजनिक आयुष्याचे सादरीकरण करणे ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट असते. या प्रक्रियेत अनेक धोके दडलेले असतात.  चरित्र नायकाचे दैवतीकरण करणे,  त्याच्या आयुष्याबद्दलची माहिती चुकीची किंवा अपुरी सादर … Continue reading पुस्तक परीक्षण : अभिषेकी

पुस्तक परीक्षण: प्रा महालनोबिस नावाची संस्था

सांप्रत काळात तीन प्रकारे आधुनिक भारताच्या इतिहासाची मांडणी होताना दिसते. पहिले म्हणजे नेहरू व गांधी नावाचे व घराण्याचे खलनायकीकरण, दुसरे याच विचाराचे पुढचे पाऊल म्हणजे २०१४ पर्यंत या दोघांनी व काँग्रेसने देशाचे अपरिमित  नुकसान केले व तिसरे म्हणजे खऱ्या विकासाला देशात सुरुवात २०१४  नंतरच झाली असा भाबडा किंवा खरा विश्वास असणाऱ्यांनी नक्की वाचलेच पाहिजे असे पुस्तक म्हणजे प्रा. निखिल मेनन यांचे “Planning Democracy : How … Continue reading पुस्तक परीक्षण: प्रा महालनोबिस नावाची संस्था