मुखपृष्ठाविषयी : जून २०२५
गुलमोहर : हिरवाईचा सदिच्छा दूत या वेळच्या मुखपृष्ठछायाचित्रकार आहेत मुंबई येथील राधिका कुंटे. या छायाचित्राविषयी त्या म्हणतात : ‘गुलमोहर अगर तुम्हारा नाम होता’ हे सत्तरीच्या दशकातलं किशोरकुमार यांनी गायलेले गाणे कानावर पडले आणि गुलमोहराचे माहात्म्य आठवायला लागले… म्हटले तर हे एकदम बिनधास्त झाड. आपल्या घराजवळ, हायवेला, यायच्या-जायच्या रस्त्यांवर, बस-ट्रेनमधून, टॅक्सीतून, मित्रमंडळींच्या, नातलगांच्या घरांतून किंवा घराजवळ असे बऱ्याच ठिकाणी दिसणारे. म्हटले तर ओळखीचे – म्हटले तर … Continue reading मुखपृष्ठाविषयी : जून २०२५
