मुखपृष्ठ जुलै २०२६ :

मी छायाचित्रे घडवतो. शहरात राहतो खरा मी, पण जंगलातून फिरण्याची सदैव ओढ लागलेली असते. स्वच्छ हवा, मनमोहक निसर्गदर्शन, वैविध्यपूर्ण प्राणिपक्षिदर्शन या साऱ्यांमुळे मन कसे प्रसन्न, आनंदी होते. फोटोग्राफीची आवड आणि काहीसे कौशल्य आहे आणि अत्याधुनिक चांगले कॅमेरे माझ्याकडे आहेत, त्यामुळे मग छायाचित्रे घडवतो. माझ्या गुरूने मला अनेकदा सांगितले आहे, “फोटो काढायचे नाहीत, घडवायचे!” त्या सूचनेनुसार मी फोटो घडवत असतो. काय आहे ना, आजकाल कोणत्याही प्राण्याचे, … Continue reading मुखपृष्ठ जुलै २०२६ :

मुखपृष्ठ:  एप्रिल २०२६ :  चैत्रांगण

रांगोळी : सौ. शुभांगी जोशी  चैत्र महिना सुरू झाला आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जाणारा  हा महिना सुरू झाला, की ‘चैत्रांगण’ अपरिहार्यपणे आठवते.   चैत्रांगणाचा उगम  हा लोकसंस्कृतीत  आहे.  विविध शुभचिन्हांनी नटलेली रांगोळी  चैत्र महिन्यात काढली जाते. आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणजे ही रांगोळी असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. ही माझी अत्यंत आवडती रांगोळी. या रांगोळीत  एकूण किती चिन्हे असावीत   याचा काही निश्चित … Continue reading मुखपृष्ठ:  एप्रिल २०२६ :  चैत्रांगण

मुखपृष्ठ :  मार्च  २०२६ 

नवरंग : इंडियन पिट्टा  छायाचित्र : किशोर चोळकर  नवरंग (Indian Pitta) हा पक्षी त्याच्या अंगावरील नऊ सुंदर रंगांमुळे ओळखला जातो, म्हणूनच याला ‘नवरंग’ असे सार्थ नाव दिले गेले आहे. हा पक्षी दोन शिट्ट्या मारल्यासारखा ‘व्हिट-टीयू’ असा आवाज काढतो. पहाटे आणि सायंकाळी याचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. हा एक ‘स्थानिक स्थलांतरित’ (Local Migrant) पक्षी आहे. तो भारताच्या बाहेर जात नाही, तर देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात … Continue reading मुखपृष्ठ :  मार्च  २०२६ 

 मुखपृष्ठ : फेब्रुवारी २०२६ 

रांगोळी : शुभांगी जोशी  रांगोळी : भारतातील हिंदू समाजात रूढ असलेला एक पारंपरिक कलाप्रकार. पांढरी भुकटी किंवा पूड यांचा उपयोग करून जमिनीवर हाताने काढलेला आकृतिबंध म्हणजे रांगोळी होय.मंगलसमारंभ, पूजा, कुलाचार, कुलधर्म, संस्कारविधी, व्रतवैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडित आहे. ती राजस्थानात ‘मांडणा,’ सौराष्ट्रात ‘सथ्या,’ मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात ‘चौकपूरना,’ किंवा ‘सोनारख्ना,’ आंध्र प्रदेशात ‘मुग्गू,’, बिहारमध्ये ‘अरिपण’ अथवा ‘अयपन,’ तमिळनाडूमध्ये ‘कोलम,’ केरळात ‘पुविडल,’ ओरिसात ‘झुंटी,’ … Continue reading  मुखपृष्ठ : फेब्रुवारी २०२६ 

मुखपृष्ठ :  जानेवारी २०२६

प्रकाशाचे आणि लाटेचे नाते हा फोटोग्राफ माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, हे नाते आणि भावना टिपायचा. केप कॉडचा नॉसेट समुद्र किनारा अतिशय  सुंदर आणि मनमोहक आहे. हा फोटो त्याच ठिकणी सूर्योदयाच्या  वेळी थंडीच्या मोसमात काढलेला आहे. सकाळची सोनेरी किरणे लाटांवर पसरून लाटा खूपच सुंदर दिसत होत्या. हे फक्त एक क्लिक नाहीये; तर लाटांचे स्वरूप आणि सौंदर्य कॅमेऱ्यात  चित्ररूपात  बद्ध करण्याचे एक तंत्र आहे.  एक लाट, … Continue reading मुखपृष्ठ :  जानेवारी २०२६

मुखपृष्ठाविषयी : डिसेंबर २०२५ 

“The maple wears a gayer scarf, The field a scarlet gown.” – Emily Dickinson छायाचित्र : मिहीर जोशी  रेड मेपल (Red Maple – Acer rubrum) :  पूर्व उत्तर अमेरिकेतील एक मोठ्या प्रमाणावर आढळणारे झाड. हे झाड शरद ऋतूमध्ये आपल्या सुंदर, तेजस्वी लाल रंगाच्या पानांसाठी विशेष ओळखले जाते. हे रंग खूप आकर्षक आणि नेत्रदीपक असतात. शुगर मेपलएवढा नसला तरी, रेड मेपलच्या चिकाचा उपयोग मेपल सिरप बनवण्यासाठी … Continue reading मुखपृष्ठाविषयी : डिसेंबर २०२५