मुखपृष्ठ:  एप्रिल २०२६ :  चैत्रांगण

रांगोळी : सौ. शुभांगी जोशी  चैत्र महिना सुरू झाला आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जाणारा  हा महिना सुरू झाला, की ‘चैत्रांगण’ अपरिहार्यपणे आठवते.   चैत्रांगणाचा उगम  हा लोकसंस्कृतीत  आहे.  विविध शुभचिन्हांनी नटलेली रांगोळी  चैत्र महिन्यात काढली जाते. आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणजे ही रांगोळी असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. ही माझी अत्यंत आवडती रांगोळी. या रांगोळीत  एकूण किती चिन्हे असावीत   याचा काही निश्चित … Continue reading मुखपृष्ठ:  एप्रिल २०२६ :  चैत्रांगण

माझा मॅरेथॉन( चा) प्रवास.. २०१७ ते २०२५ 

सदानंद पाटील हे पंढरपुरातील एक  प्रथितयश डॉक्टर आहेत. एक काऊच पोटॅटो ते सराईत  मॅरेथॉनपटू असा त्यांचा प्रवास कसा झाला ते त्यांच्याच शब्दांत ऐकू या. या निमित्ताने त्यांनी मॅरेथॉन धावण्याचे तंत्र व मंत्र याबाबत त्यांचे विचार मांडले आहेत. हे विचार अर्थातच त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांवर आधारित आहेत. त्यांचा स्वीकार करण्यापूर्वी  आपापल्या व्यक्तिगत डॉक्टरांशी बोलून मगच कसलाही निर्णय घेणे श्रेयस्कर ठरेल.  संपादक      मी शाळा कॉलेजमध्ये हुशार पण … Continue reading माझा मॅरेथॉन( चा) प्रवास.. २०१७ ते २०२५ 

🦚  मोर – ‘पिसाऱ्याची भाषा’

“मी आलोय… मी आलोय…” दुपारी दोन वाजले, की कंपाऊंडवर बसून तो मियांव मियांव अशी आरोळी ठोकायचा. जसं काही, ‘मी आलोय… मी आलोय… ये आता बाहेर,’ असं म्हणायचा. त्या आरोळीबरोबर तो माझ्या बागेत नव्हे… तर जणू एखाद्या दरबारात जातोय अशा राजेशाही थाटात उतरायचा. त्याच्यामागे आणखी एक-दोन शिकाऊ मोर आणि चार-पाच उत्साही लांडोरी असायच्याच. मी आतून पोळीचे तुकडे, ज्वारीचे, मक्याचे दाणे ताटलीत ठेवले, की त्यांचा ‘दरबार’ भरायचा;  … Continue reading 🦚  मोर – ‘पिसाऱ्याची भाषा’

स्मरणरंजन

मौजेची रंगीत दिवाळी  जातीभेद व अस्पृश्यता हे दोन मोठे शाप आपल्या देशाला मिळालेले आहेत.  त्याचे समूळ निराकरण करण्याकरिता संत, विचारवंत, समाज सुधारक यांनी आपले जीवन समर्पित केले. यामध्ये सध्याच्या काळात विस्मरणात गेलेले एक नाव म्हणजे समतानंद उर्फ अनंत हरी गद्रे.  ऑक्टोबर १८९० मध्ये जन्म व १९६७ मध्ये मृत्यू असा त्यांचा जीवन प्रवास.  ह्या प्रवासामध्ये, त्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर त्यांनी अनेक ‘भानगडी’ केल्या. टिळकांच्या दौऱ्यातील … Continue reading स्मरणरंजन

प्रश्नोपनिषद :सप्टेंबर २०२५ 

मंडळी,   आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू. त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.  उच्च शिक्षणात पीएच.डी.ची डिग्री हा एक मानदंड मानला जातो.  एखादा विषय घेऊन त्याचा समग्र अभ्यास आणि त्यावर आधारित संशोधनाचा तो अंतिम टप्पा मानला जातो. ही पदवी मिळवणे हे अवघड असते किंवा कोणे  एके काळी ते अवघड होते.  हल्ली या पदवीच्या गुणवत्तेविषयी  वेगवेगळ्या क्षेत्रात शंका व्यक्त केल्या जातात.  यासाठी … Continue reading प्रश्नोपनिषद :सप्टेंबर २०२५ 

अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(३) 

आकाशवाणीचं हे ….                                              ‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च।                                               वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’ (उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.) भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली.  भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे आहेत त्यांमध्ये आकाशवाणी ऐकणे हे एक महत्त्वाचे लक्षण म्हणावे लागेल.  … Continue reading अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(३) 

एका अद्भुत जगात 

 राहुलला गेल्या काही वर्षांत लागलेल्या छंदामुळे नेटवरून तो  पक्षिनिरीक्षणासाठी नवनवीन  जागांच्या शोधात असतो. त्यात त्याला नंदू तांबेच्या पक्षी अभयारण्याचा शोध लागला होता. त्याचे डिटेल्स वाचून तो अगदी प्रभावित झाला होता;  परंतु जुलैमध्ये जर्मनीला जायच्या आधीपासून इच्छा असलेली नंदू तांबेकडची भेट शेवटी जानेवारीत सफल झाली. फोनवरून तो जरा अधिक शिस्तबद्ध माणूस वाटला. राहण्याचा दर थोडा जास्त आहे. “तो जंगल संवर्धनासाठीचा आहे, त्यामुळे दरात तडजोड नाही,” असेही … Continue reading एका अद्भुत जगात 

प्रश्नोपनिषद : मार्च  २०२५ 

मंडळी,   आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू.  त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.  The basic element of any art form is deceptive, illusionary, artificial, anything that lacs reality, surreal. जयराज साळगांवकर यांनी एका समूहावर व्यक्त केलेले हे मत आहे. कला ही नेहमीच फसवी, आभासी व कृत्रिम असते का?   कलेची व वास्तवाची खरोखरच  फारकत असते का? हा प्रश्न!  या प्रश्नावर विचार करताना  डॉक्टर … Continue reading प्रश्नोपनिषद : मार्च  २०२५ 

प्रकाशन वृत्तांत – शेवटचा दिस गोड व्हावा

डॉ.अनिल जोशी लिखित ‘शेवटचा दिस गोड व्हावा!’ या पुस्तकाचा प्रकाशन वृत्तांत.    राजा असो वा रंक, आयुष्याचा शेवट गोडच व्हावा, क्लेशदायक, दुःखदायक असू नये हीच प्रत्येक मनुष्यप्राण्याची कायम इच्छा असते आणि अर्थातच  तसा शेवट सर्वांनाच मिळतो असे नाही; मग आपण उगाच त्यातही एक उतरंड लावतो. पुढच्या पिढीचे चांगले दिवस पाहून समाधानाने आणि रोगाविना मनुष्य गेला म्हणजे फारच पुण्यवान; खूप महिने शुश्रूषा करूनही रोगाने गेला तर इथले … Continue reading प्रकाशन वृत्तांत – शेवटचा दिस गोड व्हावा

विचार आणि भावना

         मानवी शरीर हे अत्यंत गुंतागुंतीचे, अजब यंत्र आहे असे म्हणतात. एखाद्या उत्पादनाची अचूक आणि अपेक्षित रूपात निर्मिती करण्यासाठी आधी एका यंत्राची निर्मिती होत असते. कापडाचे तुकडे एकत्र आणून कपडे शिवण्यासाठची बारीकशी सुई हे एक प्रकारचे यंत्र आणि असंख्य सुटे भाग एकत्र आणून अतिभव्य वस्तूचे उत्पादन करणारे साधनही यंत्रच. अशा लहानमोठ्या नवनवीन यंत्रांचा शोध लावत, त्यांत सुधारणा करत आज माणसाने अतिविराट यंत्रे बनविण्यात प्रावीण्य मिळवले … Continue reading विचार आणि भावना