मंडळी,
आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू. त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.
The basic element of any art form is deceptive, illusionary, artificial,
anything that lacs reality, surreal.
जयराज साळगांवकर यांनी एका समूहावर व्यक्त केलेले हे मत आहे. कला ही नेहमीच फसवी, आभासी व कृत्रिम असते का?
कलेची व वास्तवाची खरोखरच फारकत असते का? हा प्रश्न!
या प्रश्नावर विचार करताना
डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांना आठवण झाली ती शांताबाईंच्या एका कवितेची.
ती कविता खालीलप्रमाणे आहे :
लोलक
देवळाच्या झुम्बरातुन सापडलेला लोलक
हरवला माझ्या हातुन
आणि दिसू लागली पुन्हा
माणसं माणसासारखी
पुन्हा दिसू लागलं
गवत हिरवं आणि
आभाळ दिसू लागलं पुन्हा नीळं …
परवा खूप खूप वर्षांनी
एक चिमुरडी धावत आली माझ्याकडे
आणि म्हणाली,
‘आजी तुला माहिती आहे’
गवत नसतं नुसतं हिरवं
आणि आभाळ नसतं नुसतं नीळं
आणि माणसं असतात
इंद्रधनुष्याची बनलेली
माझा लोलक हिला कुठे बरं सापडला?
त्या देवळातल्या झुंबराला
अजून असे किती लोलक आहेत
कुणास ठाऊक??
शांता शेळके
आपापल्या लोलकातून जगाकडे पाहणे म्हणजे कला असे काही आहे का?
आपल्याला काय वाटते ते जरूर कळवा.
आपली उत्तरे/प्रतिसाद सदराच्या खाली कॉमेंट स्वरूपात देऊ शकता किंवा ई-मेल द्वारा jaysss12@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकता.
आपले मत आपण 9422647283 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारादेखील पाठवू शकता.
आणि हो,
या सदरासाठी आपल्याला पडलेले अशा प्रकारचे प्रश्नदेखील आपण पाठवू शकता.
संपादक
