प्रश्नोपनिषद :सप्टेंबर २०२५ 

मंडळी, 

 आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू. त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा. 

उच्च शिक्षणात पीएच.डी.ची डिग्री हा एक मानदंड मानला जातो.  एखादा विषय घेऊन त्याचा समग्र अभ्यास आणि त्यावर आधारित संशोधनाचा तो अंतिम टप्पा मानला जातो. ही पदवी मिळवणे हे अवघड असते किंवा कोणे  एके काळी ते अवघड होते.  हल्ली या पदवीच्या गुणवत्तेविषयी  वेगवेगळ्या क्षेत्रात शंका व्यक्त केल्या जातात.  यासाठी लागणारे प्रबंध लिहून देणारी अनधिकृत यंत्रणा उपलब्ध असल्याची चर्चाही  वेळोवेळी होते.  एकदा ही पदवी मिळाली की त्याचा वापर करण्याची इच्छाच  पदवीधराला राहत नाही. थोडक्यात या ज्ञानाचे समाजासाठी जे उपयोजन व्हायला पाहिजे तेच होत नाही. मध्यांतरी या संदर्भात एक सूचना आली होती.  अशा प्रकारच्या पदवीला एक एक्स्पायरी डेट असावी का –  म्हणजे पदवी मिळवल्यानंतर दहा वर्षांनी त्या विषयात पुन्हा एकदा तितक्याच तोलामोलाचे संशोधन करावे,  त्या विषयात झालेले नवनवे संशोधन व प्रगती यांचा आढावा घ्यावा आणि आपल्या पदवीचे नूतनीकरण करून घ्यावे अशी काही व्यवस्था असावी का? 

आपली उत्तरे/प्रतिसाद  सदराच्या खाली कॉमेंट स्वरूपात देऊ शकता किंवा ई-मेल द्वारा 

jaysss12@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकता. 

आपले मत आपण 9422647283 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारादेखील पाठवू  शकता. 

आणि हो, 

 या सदरासाठी आपल्याला पडलेले अशा प्रकारचे प्रश्नदेखील आपण पाठवू शकता. 

संपादक 

Author

Leave a Reply