मैत्र जीवाचें

उत्क्रांतीच्या ओघाकाठी वचन दिले उभयतां युगायुगांचे अतूट व्रत, हो दिग्विजयीं सांगता रानघऱ्यांचा गृहप्रवेश  कोंबडा आरवला. भैरू उठला. तोंड धुऊन त्याने न्याहारी केली. पारूने त्याला शिदोरी बांधून दिली. तोवर भैरूने बैलांना वैरणपाणी दिलं आणि त्यांना घेऊन तो शेताकडे निघाला. पारूने कपिलेला आणि शालू शेळीला चारा दिला. वासराला आणि कोकराला प्यायला सोडलं; मग दूध काढलं. मोत्या कुत्र्याला भाकरी दिली; मनीला दूध दिलं; कोंबड्यांना दाणे टाकले. गायी, बैल, शेळ्या, कुत्री, … Continue reading मैत्र जीवाचें

पाय फुटलेला व्यासंग

   फोडणीतली राई तडतडताना पाहून मीनाला फुटणाऱ्या लाह्यांची आठवण येते. लाह्यांवरून पॉपकॉर्न, तिथून  मॉलमधली पॉपकॉर्न  खाणारी, केस निळे रंगवलेली बाई असा राई ते बाई मनप्रवास घडतो. हे मानसशास्त्रीय विचार-साखळीचं एक उदाहरण आहे. ‘काट्याच्या अणीवर वसली तीन गावे,’ म्हणून सुरू केलेली विचारसाखळी संत ज्ञानेश्वर प्रारब्ध, संचित आणि क्रियमाणाच्या बुक्क्यांपर्यंत नेऊन सद्गुरूच्या पायीं पोचवतात. प्रत्येकाच्या मनातल्या  विचारांची भ्रमण-साखळी वेगवेगळी असते.  डॉ.आनंद जोशींनी लिहिलेलं, ‘ऑर्वेलच्या अवतीभोवती’ हे पद्मगंधा … Continue reading पाय फुटलेला व्यासंग