कल हो ना हो…

 बै.जी.वैद्यकीय महाविद्यालय, पुणे…  ४७ वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षणाच्या तीव्र इच्छेतून एकत्र आलेली  आपापल्या शाळांतील हुशार मुलंमुली. एकमेकांसाठी जवळजवळ सगळेच अनोळखी …  कुणी डॉक्टरांचे, कुणी सरकारी सायबांचे, काही शिक्षकांचे, काही बागायतदारांचे – पण बरेच जण सरकारी-निमसरकारी कामगारांच्या middle class बिऱ्हाडांतले…धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुण्यासह या जिल्ह्यांतील छोटी-मोठी गावं अन् अतिदुर्गम वाडी वस्तीवरील, गरीब, श्रीमंत, सवर्ण,अवर्ण, गौरवर्णी, कृष्णवर्णीय २०० विद्यार्थी… देहबोलीतून डोकावणारा लाजरेपणा, बुजरेपणा, न्यूनगंड, गर्व,अहंकार, माज…  पण … Continue reading कल हो ना हो…

डांग्यांचा वाडा 

मी माझ्या दोन काका अन् आजीबरोबर चार वर्षांचा असताना मुलतापीहून नागपूरला शिफ्ट झालो. सव्वा वर्षांचा असताना आईने मला आजीच्या झोळीत टाकले ते कायमचे. नागपूरला सुरुवातीला आम्ही इतवारी मुख्य पोस्ट ऑफिससमोरील पारखी वाड्यात राहत होतो – पहिल्या मजल्यावर. एक दिवस घराचा जिना धाड्कन कोसळला! घर बदलावेच लागले. आम्ही डांगे वाड्यात आलो. हे घर इतवारी हायस्कूलजवळ. हा जुन्या नागपूरचा व्यापारी भाग. इथेही आम्ही पहिल्या मजल्यावर राहायचो. आगगाडीसारख्या … Continue reading डांग्यांचा वाडा 

पुनरपि जननम् – प्रकरण १

अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली  ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.  ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे : हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे … Continue reading पुनरपि जननम् – प्रकरण १

एक पिल्लू, बारा अंडी

   एका पिल्लासमोर  त्याच्याइतकीच निरागस दिसणारी बारा अंडी सुबकपणे एग कार्टनमध्ये ठेवली होती. पिल्लू माणसाचं होतं, अंडी कोंबडीची होती. पिल्लानं प्रथम काही वेळ ह्या नवीन खेळण्याकडे पाहिलं; नंतर आपल्या छोट्या बोटांनी त्यांना चाचपून बघितलं आणि ग्रीक तत्त्ववेत्त्याच्या अभिनिवेशानं एक अंडं जमिनीवर टाकलं. त्याचा आवाज, त्याचं फुटणं, त्यातला बलक जमिनीवर पसरणं ह्या सगळ्यांची नोंद घेतली गेली – क्लिनिकल डिटॅचमेंटने! उरलेल्या अकरा अंड्यांचं स्टॅटिस्टिकस होण्याच्या आत त्या प्रयोगात  … Continue reading एक पिल्लू, बारा अंडी

मेनका 

कुर्ल्याच्या लोकमान्य टर्मिनसला गाडी लांबचा भोंगा वाजवून थांबली आणि मेनकाने तिचे लांबसडक काळेसावळे हात पूर्व-पश्चिम पसरत मोठ्ठा आळस दिला. उतारूंच्या नजरा लगोलग तिच्याकडे वेधल्या गेल्या – होतीच ती तशी. नाकीडोळी नेमकेपणा, पांढरेशुभ्र हसरे दात, उंच उचललेल्या  इंद्रधनुष्यी भुवया, उंच गर्दन, सडसडीत मोहक बांधा, बऱ्यापैकी उंची आणि मुख्य म्हणजे या सगळ्याची असलेली पुरेपूर जाण;  पण त्या नजरा, थबकणारे पाय या कशाचं काही वाटून न घेता सरळ … Continue reading मेनका 

विदुला

शाळेची दप्तरं तितकी भारदस्त नव्हती म्हणून असेल कदाचित – तेव्हाचं शाळेच्या प्रेमात असणं काही औरच असायचं – सगळ्यांचंच! हुशारांचं तर साहजिकच; पण साधारण बुद्ध्यंकाचे विद्यार्थीपण अगदी जीव तोडून शाळेसाठी करायचे सगळं – अगदी खोडसाळ विद्यार्थीपण. शाळेचं मैदान झाडायला अजिबात लाजायचं नाही. कुणी झाडं लावायचे, कुणी रांगोळी काढायचे, सुविचार लिहून फळा रोज रंगवायचे – किती काय काय. शिक्षकांवर अपार श्रद्धा असे. सत्तरच्या दशकातला काळ होता तो. … Continue reading विदुला

रद्दीतील रत्ने २ : हुसैनी ब्राह्मण

  या लेखाचे शीर्षक वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल; परंतु अशी ब्राह्मणांची एक पोटजात भारतात अस्तित्वात आहे. मी हा लेख २८ एप्रिल २०१०  रोजी लोकसत्तेच्या लोकरंग पुरवणीत ‘इंटरेस्टिंग’ या सदरात श्री.उमेश करंदीकर यांनी हुसैनी ब्राह्मणांविषयी जी माहिती दिली आहे त्याचा आधार घेऊन लिहिला आहे. मला ही माहिती खरोखरच इंटरेस्टिंग वाटल्यामुळे मी  स्वतः  ब्राह्मणांच्या या पोटजातीविषयी अधिक माहिती गोळा केली; त्याचाही मी या लेखात उपयोग केला आहे.   … Continue reading रद्दीतील रत्ने २ : हुसैनी ब्राह्मण

बेंगलोर डायरी ७

   फळांचा राजा आंब्याला म्हणतात आणि आंब्यांचा राजा हापूस.  आंबा म्हणजे फक्त हापूस या माझ्या समजाला मोठा छेद गेला बेंगलोरला आल्यावर. इथे हापूसच्या झगमगाटात इतर आंबे लपून जात नाहीत. येथील प्रसिद्ध बदामी म्हणजेच  कर्नाटक हापूससुद्धा जरा इतर आंब्यांना दबूनच असतो. इथे मोठा मान असतो तो बैंगनपल्ली या आंध्र प्रदेशातील आंब्यांना, त्यानंतर रसपुरी या नावातूनच रस गळणाऱ्या आंब्याला, त्यानंतर बदामीबरोबरचा मान असतो तो सिंदूरा या आंब्याचा! सीझन … Continue reading बेंगलोर डायरी ७

पुनर्भेट नॅशनल पार्कची ६ : चैत्रपालवीचे  दिवस  

 दि. ११.४.२०२४                                                          फाल्गुन संपला आणि  उद्यानात उन्हं तापू लागली आणि  करंजाच्या झाडांना बहर येऊ लागला. फाल्गुनात  करंजाचं झाड चकचकीत हिरव्या पानांनी भरून गेलं होतं;त्यावर आता  फिकट गुलाबी कळ्यांसारखी दिसणारी फुलं गुच्छाने येऊ लागली. करंजाचं फूल तीन पाकळ्यांचं. वरच्या दोन पाकळ्या   मुळाला लालसर गुलाबी रंगाच्या.नमस्कारासाठी जोडलेल्या दोन फुगीर हातांप्रमाणे एकमेकांना जोडलेल्या; तर खालची पाकळी पसरट त्रिकोणी आकाराची व टोकाला हिरव्या रंगाची. करंजाच्या फुलांवर गुलाबी पांढऱ्या … Continue reading पुनर्भेट नॅशनल पार्कची ६ : चैत्रपालवीचे  दिवस  

पुनर्भेट नॅशनल पार्कची ५ : वसंत ऋतूतील आठवणी 

            थंडी कमी होऊ लागली  तसतसा ग्लीरीसिडीयाचा गुलाबी बहर कमी होऊ लागला. ग्लीरीसिडीयाची जागा आता वसंत ऋतूत शेवरीच्या लालभडक फुलांनी घेतली. घंटेच्या आकाराची  शेवरीची फुलं दरवर्षी वसंतावर जणू चवऱ्या ढाळत असतात. आमच्या व्याघ्रविहाराच्या रस्त्यावर एक काळा कुडा अंगांगाने बहरून आला आहे. नावात याच्या काळा रंग असला तरी फूल मात्र पांढऱ्या शुभ्र रंगाचे. झाड साधारण दोन मीटरभर उंचीचं. भर उन्हात पाहिलं तर झाडावर जणू काही हिमवर्षाव झाला … Continue reading पुनर्भेट नॅशनल पार्कची ५ : वसंत ऋतूतील आठवणी