स्थलांतरित

विंदांच्या कवितेत ‘किती कठीण परदेशात पोहोचणे स्वदेशाचा त्याग केल्याशिवाय’ ही ओळ वाचली आणि ती विंदांनी माझ्यासाठीच लिहिली आहे असे मला वाटले. स्वदेश कधीतरी कुणी सोडतं का?…दिवाळीच्या पणतीकडे बघता-बघता माझ्या मनात विचार आला. ही पणती लागली होती माझ्या मैत्रिणीच्या घरी जिथे आम्ही नेहमीप्रमाणे दिवाळी पहाट साजरी करायला जमलो होतो. अर्थात आमच्या घरांमधली अंतरं बघता पहाटे येणं म्हणजे कसरतच झाली असती. म्हणून ‘दिवाळी पहाट’ आम्ही सगळे अतिशय … Continue reading स्थलांतरित

एक पिल्लू, बारा अंडी

   एका पिल्लासमोर  त्याच्याइतकीच निरागस दिसणारी बारा अंडी सुबकपणे एग कार्टनमध्ये ठेवली होती. पिल्लू माणसाचं होतं, अंडी कोंबडीची होती. पिल्लानं प्रथम काही वेळ ह्या नवीन खेळण्याकडे पाहिलं; नंतर आपल्या छोट्या बोटांनी त्यांना चाचपून बघितलं आणि ग्रीक तत्त्ववेत्त्याच्या अभिनिवेशानं एक अंडं जमिनीवर टाकलं. त्याचा आवाज, त्याचं फुटणं, त्यातला बलक जमिनीवर पसरणं ह्या सगळ्यांची नोंद घेतली गेली – क्लिनिकल डिटॅचमेंटने! उरलेल्या अकरा अंड्यांचं स्टॅटिस्टिकस होण्याच्या आत त्या प्रयोगात  … Continue reading एक पिल्लू, बारा अंडी

एक दक्षिणी लग्न

ह्यूस्टनमधली आर्द्रतेची शाल पांघरलेली सकाळ! हिम सूर्यकिरणांनी वितळतं; ही आर्द्रता आणखीनच घन होत जाणारी… हवेला जडशीळ करणारी! मर्टलची जागोजागी फुललेली प्रसन्न मोठाली झाडं, काही वृक्षागतदेखील. आमच्या ॲरिझोनातील नेहमीच्या पालो वेर्दे, फायकस, कॅक्टस या सदाहरितांपेक्षा कितीतरी वेगळी. या झाडाफुलांमधून व्यक्त होणारी भूमीची भाषा मला अनोळखी आणि म्हणून आकर्षक. लाल विटांच्या इमारतीत लग्नासाठी भरजरी कपडे घालून घाम टिपत शिरताना मन नवीन अनुभवाला उत्सुक होतं. आतमध्ये सुखद गारवा. … Continue reading एक दक्षिणी लग्न

सहृदयी

 एक सामान्य आठवण माझ्या मनात का बरं जपून  ठेवली गेली असावी? मी आणि माझी आई एका बसची वाट पाहत होतो. बस दुरून येताना दिसत होती; पण तिचा वेग अतिशय कमी आहे असं भासत होतं. ते वाट पाहणं सहनशीलतेची परीक्षा पाहणारं होतं. शेवटी ती बस जेव्हा आमच्या थांब्यावर पोचली तेव्हा मात्र ती अगदी कमी वेळ थांबली आणि आम्ही ती बस पकडू शकलो नाही. आमच्या दोघींच्याही हातात … Continue reading सहृदयी