अर्धसत्य

सगळा जन्म शिकण्यात अन् शिकविण्यात गेला. आता खोल विचार केल्यावर लक्षात येते, की आपल्याला नेहमी अर्धसत्य शिकवले गेले. आपणही तोच कित्ता गिरवत अर्धसत्य शिकवले; कारण सगळे शिकवणे हे परीक्षेसाठी होते. शिकण्यासाठी, ज्ञान संपादन करण्यासाठी नव्हते. बरे, परीक्षा म्हणजे तरी काय… तर ठरावीक प्रश्नांची ठरावीक वेळात ठरावीक उत्तरे लिहिणे, अन् मोबदल्यात अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळवणे! आधी अर्धसत्य कसे ते समजून घेऊ. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज १८० … Continue reading अर्धसत्य

कविता : जानेवारी २०२६

आयुष्य पुरेसे नाही  आयुष्य ही परीक्षा सुटणार प्रश्न नाही उत्तरे शोधताना हे आयुष्य पुरणार  नाही आलो इथे कशाला उद्दिष्ट काय आहे  सत्य जीवनाचे हे कोणास ठाव  नाही  सुख लाटांच्या भरतीने चिंब जाहले अंग  दुःखाच्या मानसिकतेचे रडगाणे संपत नाही चेहरा बघण्याआधी स्वच्छ कराव्या काचा  आरसा कधी भिंतीचा खोटे बोलत नाही रेशमी बंध नात्याचे विस्कटले तुटले धागे जोडायचे कसे ते पुन्हा या कोड्यास  पार  नाही! Continue reading कविता : जानेवारी २०२६

कविता : डिसेंबर २०२५ 

सुख दुःख  दुःख एकटेच कोपऱ्यात बसलेले मी विचारले काय झाले? कुणी काही बोलले, रागावले? मनात विचार आला  दुःखालाही दुःख असू शकते की! आपल्याला कसे नाही कळले? त्याच्याच बाजूला सुख बसलेले प्रत्येकाला हवे असलेले  पण तेही हिरमुसलेले! मला वाटले याला काय झाले? मनात विचार आला  सुखाला सुखाचे अजीर्ण होऊ शकते की! आपल्याला कसे नाही कळले? Continue reading कविता : डिसेंबर २०२५ 

आठवण : डॉ.कलाम यांचे स्वप्न साकार

ऑपरेशन सिंदूरमुळे प्रत्येक भारतीयाला जितका अभिमान वाटतो आहे त्याहीपेक्षा कितीतरी जास्त पटीने समाधान वर आकाशात डॉ. कलाम यांना वाटले असेल. त्यांना मिसाईलचे जनक म्हणतात ते उगाच नव्हे. आपल्या कारकिर्दीची सुरुवात इस्रोमध्ये केलेल्या डॉ. कलाम यांनी साधारण ८१ /८२ च्या सुमारास हैदराबादच्या डी. आर. डी. एल. प्रयोगशाळेचे संचालक म्हणून स्थलांतर केले. त्यानंतर त्यांच्याकडे येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या रिसर्च सेंटर इमारत ( आर. सी. आय. ) या … Continue reading आठवण : डॉ.कलाम यांचे स्वप्न साकार

उच्च शिक्षण क्षेत्रात भविष्याचे नंतर पाहू; आधी वर्तमान सुधारू या!

  सध्या उच्च शिक्षणासंदर्भात विविध विषयांवर बरीच उलट सुलट चर्चा सुरू आहे. त्यात गुणवत्ता तपासणारी मानांकन पद्धत, कुलगुरू निवडीची पद्धत, त्या संबंधीचे निकष, प्राध्यापक निवडीचे निकष, त्यासाठी लागणारी अर्हता, नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, पीएच. डी. संशोधनाचे निकष, प्रबंधांचा दर्जा, विद्यार्थी, पालक यांची शिक्षणाविषयीची अनास्था, विद्यार्थ्यांची गैरहजेरी अन् भविष्य काळात येऊ घातलेले कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅट जीपीटी, गूगल, व्हॉट्स ॲप विद्यापीठाचे आव्हान हे प्रमुख विषय आहेत. यांपैकी प्रत्येक … Continue reading उच्च शिक्षण क्षेत्रात भविष्याचे नंतर पाहू; आधी वर्तमान सुधारू या!

डांग्यांचा वाडा 

मी माझ्या दोन काका अन् आजीबरोबर चार वर्षांचा असताना मुलतापीहून नागपूरला शिफ्ट झालो. सव्वा वर्षांचा असताना आईने मला आजीच्या झोळीत टाकले ते कायमचे. नागपूरला सुरुवातीला आम्ही इतवारी मुख्य पोस्ट ऑफिससमोरील पारखी वाड्यात राहत होतो – पहिल्या मजल्यावर. एक दिवस घराचा जिना धाड्कन कोसळला! घर बदलावेच लागले. आम्ही डांगे वाड्यात आलो. हे घर इतवारी हायस्कूलजवळ. हा जुन्या नागपूरचा व्यापारी भाग. इथेही आम्ही पहिल्या मजल्यावर राहायचो. आगगाडीसारख्या … Continue reading डांग्यांचा वाडा 

मराठी भाषेच्या संवर्धनासंबंधी –

आव्हाने,जबाबदारी…  मराठी भाषेला निवडणुकीचे निमित्त साधून का होई ना,अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अत्यंत आनंदाची, अभिमानाची बाब आहे. मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी हा संकल्पपूर्तीचे समाधान देणारा क्षण आहे. यासाठी ज्या साहित्यिकांनी, विचारवंतांनी गेली दहा वर्षे प्रयत्न केले त्या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानायला हवेत. अभिजात दर्जा मिळाल्याने केंद्र सरकारकडून जी काही भाषा संवर्धनासाठी, संशोधनासाठी आर्थिक मदत मिळायची ती मिळेलच; त्या देणगीतून विद्यापीठे जे काही योगदान द्यायचे … Continue reading मराठी भाषेच्या संवर्धनासंबंधी –

कविता – काहीच कळत नाही

ऐकू येतात हुंदके तडा गेलेल्या भिंतीचे ओघळणारे अश्रू सुरकुतलेल्या कांतीचे आहेच कुठे जमीन पायाखाली भेगा पडायला,सारवायला तुम्ही तर चालता गुळगुळीत फरशीवर पडायला घसरायला! भिंतीच्या कोनाड्यात कडी कुलूप नसलेल्या कपाटात साचलाय निरुपयोगी कचरा भिंतीवर लटकलेल्या तसबिरी घरून निघताना नमस्कार करण्यापुरत्या काही ब्लॅक अँड व्हाइट अल्बम जपून ठेवलेले रंगीबेरंगी फोटो जुन्या डायरीतल्या नोंदी न चुकते केलेले हिशेब पिवळ्या पानावर पुसट झालेले पत्ते,फोन नंबर कुणीच नसतील अस्तित्वात त्यावर … Continue reading कविता – काहीच कळत नाही

नात्यांचे शिवधनुष्य..

परवा मित्राचा फोन आला. माझ्याच वयाचा… चांगला पाऊण एक तास बोलत होता. या वयाचे एक दुखणे असते – एकटेपण वाढीला लागलेले; शिवाय वाढत्या वयाच्या शारीरिक दुखण्यातून उद्भवलेल्या नैसर्गिक तक्रारी… खरे दुःख असते ते जवळची नाती तुटत चालल्याचे – आपलीच रक्ताची माणसे दुरावत चालल्याचे. हा दुरावा अनेक कारणांनी आलेला! मुलं मोठी झाली, नोकरीच्या निमित्ताने परगावी,परदेशी स्थिरावली, मुली लग्न होऊन सासरी गेल्या – म्हणजे प्रत्येकाने आपले वेगळे … Continue reading नात्यांचे शिवधनुष्य..

तस्मै श्री गुरवे नमः 

आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो. आज पंचाहत्तरीत मागे वळून पाहताना,आयुष्याचा जमाखर्च मांडताना मला आठवतात ते माझे निवडक शिक्षक. त्यांतील बहुतेक आज हयात नाहीत; पण आयुष्यातील त्यांचे स्थान ध्रुवासारखे अढळ आहे. शाळेतले शिक्षक तर कुणालाच विसरता येत नाहीत. सुरुवात तिथूनच करतो. कायमचा ठसा उमटवणारे दोन शिक्षक – याचा अर्थ ज्यांच्या विषयी लिहिले नाही त्यांचे महत्त्व कमी होते असे नाही; पण काही ठसे अमीट असतात. … Continue reading तस्मै श्री गुरवे नमः