कविता : डिसेंबर २०२५ 

सुख दुःख 

दुःख एकटेच कोपऱ्यात बसलेले

मी विचारले काय झाले?

कुणी काही बोलले, रागावले?

मनात विचार आला 

दुःखालाही दुःख असू शकते की!

आपल्याला कसे नाही कळले?

त्याच्याच बाजूला सुख बसलेले

प्रत्येकाला हवे असलेले 

पण तेही हिरमुसलेले!

मला वाटले याला काय झाले?

मनात विचार आला 

सुखाला सुखाचे अजीर्ण होऊ शकते की!

आपल्याला कसे नाही कळले?

Author

Leave a Reply