कविता  : असाही पाऊस . . .

चित्रकार : सुनील काळे ओलेता मादक गंध पाऊस उधळीत आला जलधारा आठवणींच्या मज मनात भिजवीत गेल्या गारवा सुखाचा बरसे भिजती मातीची स्वप्ने सुखबीज रुजे त्या कायी   रुजती रुणझुणती कवने काळ्या मेघांच्या ओठी थेंबांच्या मौक्तिक माला वाऱ्या संगे आलेल्या ओंजळीत जरा साठवल्या जलधारा मुक्त बरसती डोंगर रांगांच्या भवती बेबंद होऊनी आल्या या कविता प्राणावरती Continue reading कविता  : असाही पाऊस . . .

कविता : जून २०२६ 

काय विचित्र योगायोग आहे पहा, मासिकासाठी म्हणून  आठ दिवसाच्या कालावधीत तीन कविता प्राप्त झाल्या;  दोन  मराठी  ,एक इंग्रजी.  या तीन कवितांमध्ये एक दुवा होता, कर्करोगाचा!   कर्करोगाचे निदान झाल्यानंतर काय काय होते.  रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक व एकंदरीतच रुग्णाची परिसंस्था कशी ढवळून निघते त्याचे अनुभव सांगणारे या तीन कविता आहेत.   हल्ली वेगवेगळ्या कारणाने माणसाचे आयुर्मान वाढते आहे. हे वाढते आयुष्य म्हणजे एक ओझे आहे असे वाटावे अशीही … Continue reading कविता : जून २०२६ 

कविता : मे २०२६ 

कहाणी… राजकारणातल्या कलेची आणि कलेतल्या राजकारणाची… (ज्येष्ठ कविवर्यांची क्षमा मागून) तेच किस्से त्याच कहाण्या तेच हशे आणि त्याच टाळ्या तीच वाक्ये – तीच गाणी सृजनाची झाली फक्त कहाणी/    ती (च) घराणी ती (च) परंपरा अहो, मी (च) आहे त्यातील मोठा बडा घर पोकळ वासा मात्र सांगेन मीच नेता/   घागर भरली रिती झाली पुन्हा भरली पुन्हा भरली कथा उखाणे किस्से यांनी भरल्यासारखी भासवत ठेवली/     पालथी … Continue reading कविता : मे २०२६ 

कविता : फेब्रुवारी २०२६ 

खरंच माझा भारत आज मृत्युशय्येवर आहे  गेली काही वर्षे  हळूहळू पण सारखे सारखे  असेच वाटत राहते  की येणाऱ्या प्रत्येक क्षणाक्षणात  पूर्वी  विविधतांच्या सहअस्तित्वात नटलेला आणि रमलेला  माझ्या कल्पनेतील शांत भारत  आज अशांत,अस्वस्थ आणि उदास आहे  पदोपदी तो मृत्यूच्या उरलेल्या घटका मोजत आहे  खरंच माझा भारत आज मृत्युशय्येवर आहे  माझ्या भारतातील धर्मसहिष्णुता  आज बधिर झाली आहे की हरपली आहे  ते काळच पुढे ठरवेल  आज मात्र ती  … Continue reading कविता : फेब्रुवारी २०२६ 

कविता : जानेवारी २०२६

आयुष्य पुरेसे नाही  आयुष्य ही परीक्षा सुटणार प्रश्न नाही उत्तरे शोधताना हे आयुष्य पुरणार  नाही आलो इथे कशाला उद्दिष्ट काय आहे  सत्य जीवनाचे हे कोणास ठाव  नाही  सुख लाटांच्या भरतीने चिंब जाहले अंग  दुःखाच्या मानसिकतेचे रडगाणे संपत नाही चेहरा बघण्याआधी स्वच्छ कराव्या काचा  आरसा कधी भिंतीचा खोटे बोलत नाही रेशमी बंध नात्याचे विस्कटले तुटले धागे जोडायचे कसे ते पुन्हा या कोड्यास  पार  नाही! Continue reading कविता : जानेवारी २०२६

कविता : डिसेंबर २०२५ 

सुख दुःख  दुःख एकटेच कोपऱ्यात बसलेले मी विचारले काय झाले? कुणी काही बोलले, रागावले? मनात विचार आला  दुःखालाही दुःख असू शकते की! आपल्याला कसे नाही कळले? त्याच्याच बाजूला सुख बसलेले प्रत्येकाला हवे असलेले  पण तेही हिरमुसलेले! मला वाटले याला काय झाले? मनात विचार आला  सुखाला सुखाचे अजीर्ण होऊ शकते की! आपल्याला कसे नाही कळले? Continue reading कविता : डिसेंबर २०२५ 

कविता:  नोव्हेंबर २०२५ 

मी अजूनही ‘लिहितो’ कविता ~~~~~~ मी लिहायचो कविता  तिला भेटण्यापूर्वीपासूनच  तेव्हा मात्र ती अस्फुट असायची  तरी करायची घुसखोरी माझ्या कवितेत  अलगद, अनायासेच, माझ्या नकळत  लिहित गेलो मी कविता यमक टाळत  तरी ती घुसायची एखाद्या ओळीत  देऊन चकमा यमकाला गूढरम्य  सरकत गेले दिवस असेच  प्रकाशित होऊ लागल्या माझ्या कविता  इथेतिथे, माय मराठीच्या पदरात दडून  ¤ अखेर झालीच तिची-माझी भेट  अरण्यातील एका ओसाड पाठशाळेत  पर्णहीन वृक्षांच्या नसलेल्या … Continue reading कविता:  नोव्हेंबर २०२५ 

कविता : ऑक्टोबर २०२५ 

   पाखरांच्या कविता         नजरेत संपूर्ण  मावणारे                 मेघाच्छादित  कुंद आकाश                 हिरव्यागार झालेल्या                  वनराईच्या अगणित                   पोपटी पानांना                  संथ गतीने                  अविरत भिडणाऱ्या                   रिमझिम जलधारा           झाडाझाडांच्या पानांवर                  पंख पालवून पाणी झटकत                     संथ विसावणारे असंख्य पक्षी                    हळू-हळू एकत्र येऊन                                           आपल्या चोचीने                    पानांच्या शिरांखाली                     बसतात   लिहीत                    असह्य  वेदनांमुळे                    मेघाश्रुंनी दाटून गेलेल्या                    आभाळाच्या डोळ्यावरील                                        अगम्य कविता…   जखम  लपत छपत आलीस  मजला भेटायला  सुख दुखाच्या नेहमीच्या  त्या गप्पा झाल्या  आणि अचानक  तव नयनातून … Continue reading कविता : ऑक्टोबर २०२५ 

कविता : सप्टेंबर २०२५ : अव्यक्त…

अव्यक्त … रितेपणात माझ्या हा पुष्प बहर खुलतो रेखून वेदनांना रंगात व्यक्त होतो हातात कुंचला जो थांबे कधी क्षणीक रचनेत त्या क्षणी तो अव्यक्त बंध येतो नजरेतूनी बघावी ऐशीच तान येते  त्या कल्पनेत आता तो तृप्त साज स्मरतो कधी तप्त रंग येती कधी कृष्ण गाज गाती चित्रातूनी मनीचा हा भाव व्यक्त होतो अवकाश हाच माझा सिमाच ज्यास नाही स्पर्शून  त्या क्षितीजा तो तृप्त भाव येतो … Continue reading कविता : सप्टेंबर २०२५ : अव्यक्त…

कविता : ऑगस्ट २०२५ 

१)  मला आवडेल मला आवडेल संध्याकाळी  लांब लांब होत जाणाऱ्या  सावल्यांशी लपंडाव खेळायला  मला आवडेल जागेपणीच  असंख्य स्वप्नांचे  मनोरे रचून  त्यांच्याबरोबर  लगोऱ्या खेळायला  मला आवडेल  एखाद्या खूप गाजलेल्या  पुस्तकातील एकच अक्षर होऊन  चिरंजीव व्हायला  मला आवडेल  साधुसंतांच्या आध्यत्मिक चैतन्यातून  स्फूर्ती घेऊन अन्यायाशी  सतत दोन हात करायला  २) मन कोठे तरी विषण्ण होते  अजूनही सारखी माझ्या  डोळ्यासमोर येतात  डी. जे. च्या कर्णकर्कश  आवाजात  भर रस्त्यावर अंगविक्षेप … Continue reading कविता : ऑगस्ट २०२५