
अव्यक्त …
रितेपणात माझ्या हा पुष्प बहर खुलतो
रेखून वेदनांना रंगात व्यक्त होतो
हातात कुंचला जो थांबे कधी क्षणीक
रचनेत त्या क्षणी तो अव्यक्त बंध येतो
नजरेतूनी बघावी ऐशीच तान येते
त्या कल्पनेत आता तो तृप्त साज स्मरतो
कधी तप्त रंग येती कधी कृष्ण गाज गाती
चित्रातूनी मनीचा हा भाव व्यक्त होतो
अवकाश हाच माझा सिमाच ज्यास नाही
स्पर्शून त्या क्षितीजा तो तृप्त भाव येतो
माझी न राहीले मी गुंगी सुन्या क्षणांची
कवळून चित्र सारे शृंगार आज सजतो
