कविता  : असाही पाऊस . . .

चित्रकार : सुनील काळे ओलेता मादक गंध पाऊस उधळीत आला जलधारा आठवणींच्या मज मनात भिजवीत गेल्या गारवा सुखाचा बरसे भिजती मातीची स्वप्ने सुखबीज रुजे त्या कायी   रुजती रुणझुणती कवने काळ्या मेघांच्या ओठी थेंबांच्या मौक्तिक माला वाऱ्या संगे आलेल्या ओंजळीत जरा साठवल्या जलधारा मुक्त बरसती डोंगर रांगांच्या भवती बेबंद होऊनी आल्या या कविता प्राणावरती Continue reading कविता  : असाही पाऊस . . .

कविता : सप्टेंबर २०२५ : अव्यक्त…

अव्यक्त … रितेपणात माझ्या हा पुष्प बहर खुलतो रेखून वेदनांना रंगात व्यक्त होतो हातात कुंचला जो थांबे कधी क्षणीक रचनेत त्या क्षणी तो अव्यक्त बंध येतो नजरेतूनी बघावी ऐशीच तान येते  त्या कल्पनेत आता तो तृप्त साज स्मरतो कधी तप्त रंग येती कधी कृष्ण गाज गाती चित्रातूनी मनीचा हा भाव व्यक्त होतो अवकाश हाच माझा सिमाच ज्यास नाही स्पर्शून  त्या क्षितीजा तो तृप्त भाव येतो … Continue reading कविता : सप्टेंबर २०२५ : अव्यक्त…

कविता : मे २०२५ 

सोहळा… छायाचित्र : वंदना बाजीकर.  प्रत्येक माणूस जगत असतो आयुष्याचा अद्वितीय सोहळा तरीही असतो प्रत्येकाचा जगण्याचा ताल वेगळा वेगळा सापडत नाहीत कोणा कोणाला अचूक उत्तरे जगण्याची म्हणून काही संपत नाही लढाई त्यांच्या अस्तित्वाची  ओघळून जातात पानावरून थेंब इतक्या सहज रितं झालं पाहिजे प्राजक्तासारखं न तुटता हलक्याने मन सुटलं पाहिजे ध्यास हवा मना मनाला आभाळाला गवसणी घालण्याचा जगला पाहिजे खरा आनंद जमिनीशी नाते जोडण्याचा कठीण आहे … Continue reading कविता : मे २०२५ 

कविता : मार्च २०२५ 

जीवन… जन्मची आहे अथांग सारा कशास त्याचा अंत बघा आनंदाने जगत रहावे चिंता करूनी जगणे ना… अनंतकाळी दुःख असे ते मरणा वाचून संपे ना सरणावरती गेल्यावरती अंत कुणीही पाहे ना… आनंदाने जगत रहावे चिंता करूनी जगणे ना… सुख दुःखाचे अवघे जगणे रडतची येणे हासत जाणे मागे कुठले पाश ठेवूनी  सोबत काही नेणे ना… आनंदाने जगत रहावे चिंता करूनी जगणे ना… नियतीसुद्धा अचाट असते ती न … Continue reading कविता : मार्च २०२५ 

कविताचित्र  : रानफूल

हा इवला देहच माझा बघ सांग कसा फुलवावा जरी दाही दिशांनी साऱ्या तो वारा धावून यावा मी गाणे गाते फुलता रेशमी धुक्यातून आता मग सूरही ते पानांचे मज साथ सुगंधी करीता शोधूच नका कुणी मजला रानात हरवूनी गेले मी रानफूल हो आहे विसरून मला मी गेले कुणी आनंदाने यावे अन् मला हळूच भेटवे फुलपाखरू येता जवळी रंगांनी उधळून जावे त्या हरीत तृणांच्या कुशीत मी मुक्त … Continue reading कविताचित्र  : रानफूल