कविता  : असाही पाऊस . . .

चित्रकार : सुनील काळे

ओलेता मादक गंध

पाऊस उधळीत आला

जलधारा आठवणींच्या

मज मनात भिजवीत गेल्या

गारवा सुखाचा बरसे

भिजती मातीची स्वप्ने

सुखबीज रुजे त्या कायी  

रुजती रुणझुणती कवने

काळ्या मेघांच्या ओठी

थेंबांच्या मौक्तिक माला

वाऱ्या संगे आलेल्या

ओंजळीत जरा साठवल्या

जलधारा मुक्त बरसती

डोंगर रांगांच्या भवती

बेबंद होऊनी आल्या

या कविता प्राणावरती

Author

Leave a Reply