
आयुष्य पुरेसे नाही
आयुष्य ही परीक्षा सुटणार प्रश्न नाही
उत्तरे शोधताना हे आयुष्य पुरणार नाही
आलो इथे कशाला उद्दिष्ट काय आहे
सत्य जीवनाचे हे कोणास ठाव नाही
सुख लाटांच्या भरतीने चिंब जाहले अंग
दुःखाच्या मानसिकतेचे रडगाणे संपत नाही
चेहरा बघण्याआधी स्वच्छ कराव्या काचा
आरसा कधी भिंतीचा खोटे बोलत नाही
रेशमी बंध नात्याचे विस्कटले तुटले धागे
जोडायचे कसे ते पुन्हा या कोड्यास पार नाही!
