कविता : फेब्रुवारी २०२६ 

खरंच माझा भारत आज मृत्युशय्येवर आहे  गेली काही वर्षे  हळूहळू पण सारखे सारखे  असेच वाटत राहते  की येणाऱ्या प्रत्येक क्षणाक्षणात  पूर्वी  विविधतांच्या सहअस्तित्वात नटलेला आणि रमलेला  माझ्या कल्पनेतील शांत भारत  आज अशांत,अस्वस्थ आणि उदास आहे  पदोपदी तो मृत्यूच्या उरलेल्या घटका मोजत आहे  खरंच माझा भारत आज मृत्युशय्येवर आहे  माझ्या भारतातील धर्मसहिष्णुता  आज बधिर झाली आहे की हरपली आहे  ते काळच पुढे ठरवेल  आज मात्र ती  … Continue reading कविता : फेब्रुवारी २०२६ 

कविता : ऑक्टोबर २०२५ 

   पाखरांच्या कविता         नजरेत संपूर्ण  मावणारे                 मेघाच्छादित  कुंद आकाश                 हिरव्यागार झालेल्या                  वनराईच्या अगणित                   पोपटी पानांना                  संथ गतीने                  अविरत भिडणाऱ्या                   रिमझिम जलधारा           झाडाझाडांच्या पानांवर                  पंख पालवून पाणी झटकत                     संथ विसावणारे असंख्य पक्षी                    हळू-हळू एकत्र येऊन                                           आपल्या चोचीने                    पानांच्या शिरांखाली                     बसतात   लिहीत                    असह्य  वेदनांमुळे                    मेघाश्रुंनी दाटून गेलेल्या                    आभाळाच्या डोळ्यावरील                                        अगम्य कविता…   जखम  लपत छपत आलीस  मजला भेटायला  सुख दुखाच्या नेहमीच्या  त्या गप्पा झाल्या  आणि अचानक  तव नयनातून … Continue reading कविता : ऑक्टोबर २०२५ 

कविता : ऑगस्ट २०२५ 

१)  मला आवडेल मला आवडेल संध्याकाळी  लांब लांब होत जाणाऱ्या  सावल्यांशी लपंडाव खेळायला  मला आवडेल जागेपणीच  असंख्य स्वप्नांचे  मनोरे रचून  त्यांच्याबरोबर  लगोऱ्या खेळायला  मला आवडेल  एखाद्या खूप गाजलेल्या  पुस्तकातील एकच अक्षर होऊन  चिरंजीव व्हायला  मला आवडेल  साधुसंतांच्या आध्यत्मिक चैतन्यातून  स्फूर्ती घेऊन अन्यायाशी  सतत दोन हात करायला  २) मन कोठे तरी विषण्ण होते  अजूनही सारखी माझ्या  डोळ्यासमोर येतात  डी. जे. च्या कर्णकर्कश  आवाजात  भर रस्त्यावर अंगविक्षेप … Continue reading कविता : ऑगस्ट २०२५ 

आठवणीतील प्राध्यापक निशिकांत मिरजकर

दिल्ली विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख, तौलनिक साहित्याभ्यासाचे प्राध्यापक आणि ख्यातनाम अनुवादक निशिकांत धोंडोपंत मिरजकर यांचे शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी निधन झाले. ते दिल्ली विद्यापीठात सहा वर्षे विभाग प्रमुख आणि तीन वर्षे कलाशाखेचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. काव्यलेखनाने त्यांनी साहित्य निर्मितीला सुरुवात केली. संत साहित्य, आधुनिक मराठी साहित्य व तौलनिक साहित्याभ्यासातील तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्याबद्दल लिहीत आहेत त्यांचे एक ज्येष्ठ स्नेही, अलाहाबाद विश्वविद्यालयाचे … Continue reading आठवणीतील प्राध्यापक निशिकांत मिरजकर