कविता – काहीच कळत नाही

ऐकू येतात हुंदके

तडा गेलेल्या भिंतीचे

ओघळणारे अश्रू

सुरकुतलेल्या कांतीचे

आहेच कुठे जमीन पायाखाली

भेगा पडायला,सारवायला

तुम्ही तर चालता

गुळगुळीत फरशीवर

पडायला घसरायला!

भिंतीच्या कोनाड्यात

कडी कुलूप नसलेल्या कपाटात

साचलाय निरुपयोगी कचरा

भिंतीवर लटकलेल्या तसबिरी

घरून निघताना नमस्कार करण्यापुरत्या

काही ब्लॅक अँड व्हाइट अल्बम

जपून ठेवलेले रंगीबेरंगी फोटो

जुन्या डायरीतल्या नोंदी

न चुकते केलेले हिशेब

पिवळ्या पानावर पुसट झालेले पत्ते,फोन नंबर

कुणीच नसतील अस्तित्वात त्यावर

काय ठेवायचे,काय रद्दीत टाकायचे

काहीच कळत नाही 

उरलेय कोण कुणाचे

काहीच कळत नाही!

Author

Leave a Reply