पन्नास वर्षांची अक्षरयात्रा

   उतार वयात आपण जुने हिशेब चाळत बसतो. मागच्या काळात रमायला आवडते सत्तरी पार केलेल्या आमच्यासारख्यांना! सहज हिशेब करताना आठवले : आपली पहिली कादंबरी ‘अंधारातल्या सावल्या’ १९७३ साली प्रसिद्ध झाली – त्याला या वर्षी ५० वर्षे पूर्ण झाली! काळ असा चंद्र यानाच्या वेगाने धावतो. या निमित्ताने मागे वळून साहित्यिक प्रवासाची उजळणी करावीशी वाटली.   तसा मी शाळेत असल्यापासून लिहायला लागलो. लेखन वाचनातून उगवते. शालेय जीवनात … Continue reading पन्नास वर्षांची अक्षरयात्रा

पदर जळू नये निखारे विझू नयेत

 हा संकल्प करणे ही सामाजिक जबाबदारी…   निवृत्तीपूर्वी नुकत्याच एका मित्र कुलगुरूंनी दिलेल्या मुलाखती वाचण्यात आल्या. कुलगुरूचे पद म्हणजे फक्त काटेरी मुकुटच नव्हे; तर ती बाणांची काटेरी भीष्मशय्यादेखील असते. प्रसिद्ध नाटककार  पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या नाटकात एक वाक्य आहे – नुकत्याच लग्न होऊन घरात आलेल्या सुनेला सावध करताना सासरा म्हणतो, “बाई गं,तुझ्या पदरात जळते निखारे आहेत. तुझ्यापुढे आव्हान आहे, निखारे विझू द्यायचे नाहीत अन् पदरही जळू द्यायचा … Continue reading पदर जळू नये निखारे विझू नयेत

उच्च शिक्षण ,संशोधन काही प्रश्न काही उत्तरे…

गेले दोन अडीच महिने माझे मुलाकडे – नेदरलँड येथे – वास्तव्य होते. या काळात एकूणच युरोपियन,पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीचा अभ्यास केला. चर्चेतून त्याच्या व्यवस्थेचे वेगळेपण जाणून घेतले.माझा मुलगा आशिष याला अमेरिकेतील अनेक विद्यापीठांचा  अनुभव आहे; माहिती आहे; शिवाय श्यानान ल्याब, सॅमसंग, फिलिप्स रिसर्च, एन पी एक्स सेमी कंडक्टर अशा संशोधन संस्थांत  त्याने काम केले आहे. त्याच्या नावावर शंभरपेक्षा जास्त पेटंट आहेत. सिंगापूर विद्यापीठ,आय आय एस सी-बंगलोर, टेक … Continue reading उच्च शिक्षण ,संशोधन काही प्रश्न काही उत्तरे…

आपले काय चुकते?

खरेतर अशा लेखाच्या शीर्षकाखाली मुलांचे- नवीन पिढीचे काय चुकते? मोठ्यांचे म्हणजे पालकांचे काय चुकते? संसारात नवरा-बायकोंचे काय चुकते? असे वेगवेगळे उपशीर्षक असायला हवे.  यात नेत्यांचे,सरकारचे काय चुकते हेही जोडता येईल; कारण अवतीभवतीची कौटुंबिक,सामाजिक,राजकीय परिस्थिती बघितली तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येकाचे काही ना काही चुकते आहे.अवतीभवतीच्या गोंधळाला,अराजकाला,अस्थिर परिस्थितीला आपण सारेच जबाबदार आहोत. गोम अशी आहे की कळते; पण वळत नाही. आपल्या चुका आपल्याला मान्य नाहीत, … Continue reading आपले काय चुकते?