युद्ध : एक परिवर्तन बिंदू

   माध्यान्ह उलटून गेली होती. आभाळ कसं पसरट लांबलचक झालं होतं आणि  त्याला मनोहर केशरी रंगाची छटा येऊ लागली होती. कलिंग देशात घडलेल्या ताज्या रणधुमाळीचे लोटही त्यात मिसळू पाहत होते जणू! त्यामुळे त्या संध्यासमयातून रम्यतेची जागा खिन्नतेने घेतली होती. सम्राट-महासम्राट-चक्रवर्ती अशी चढत्या क्रमाची बिरुदं मिरवणारा अशोक राजा एका उंच टेकाडावर मनगट हनुवटीखाली धरून कसल्यातरी गहन विचारात गढून गेला होता. कलिंगचा विजय हा नेहमीसारखा त्याला का कोण … Continue reading युद्ध : एक परिवर्तन बिंदू

मेनका 

कुर्ल्याच्या लोकमान्य टर्मिनसला गाडी लांबचा भोंगा वाजवून थांबली आणि मेनकाने तिचे लांबसडक काळेसावळे हात पूर्व-पश्चिम पसरत मोठ्ठा आळस दिला. उतारूंच्या नजरा लगोलग तिच्याकडे वेधल्या गेल्या – होतीच ती तशी. नाकीडोळी नेमकेपणा, पांढरेशुभ्र हसरे दात, उंच उचललेल्या  इंद्रधनुष्यी भुवया, उंच गर्दन, सडसडीत मोहक बांधा, बऱ्यापैकी उंची आणि मुख्य म्हणजे या सगळ्याची असलेली पुरेपूर जाण;  पण त्या नजरा, थबकणारे पाय या कशाचं काही वाटून न घेता सरळ … Continue reading मेनका 

विदुला

शाळेची दप्तरं तितकी भारदस्त नव्हती म्हणून असेल कदाचित – तेव्हाचं शाळेच्या प्रेमात असणं काही औरच असायचं – सगळ्यांचंच! हुशारांचं तर साहजिकच; पण साधारण बुद्ध्यंकाचे विद्यार्थीपण अगदी जीव तोडून शाळेसाठी करायचे सगळं – अगदी खोडसाळ विद्यार्थीपण. शाळेचं मैदान झाडायला अजिबात लाजायचं नाही. कुणी झाडं लावायचे, कुणी रांगोळी काढायचे, सुविचार लिहून फळा रोज रंगवायचे – किती काय काय. शिक्षकांवर अपार श्रद्धा असे. सत्तरच्या दशकातला काळ होता तो. … Continue reading विदुला