आणिले टिपूनी अमृतकण : भाग २

‘मनी आणावे ते ते होते कृपा केलिया रघुनाथे प्रचिती येते’ समर्थ रामदासांचे हे शब्द ग. दि. माडगूळकरांच्या लेखन-प्रतिभेला तंतोतंत लागू पडतात. त्यांच्या गीतांच्या झोक्यांनी गाव-खेड्यातले चिमुकले डोळे झोपी जातात. ‘गोरी गोरी पान’, ‘नाच रे मोरा’ अशी बालगीतं शाळाशाळांची स्नेहसंमेलनं गाजवतात. ‘गीत-रामायण’नं ओसऱ्या राममय होऊन जातात. चित्रपटगीतांनी मराठी वाद्यवृंदांना ओळख मिळते. लावण्यांनी जत्रेच्या रात्री रंगतात. एके काळी कथा-पटकथा-संवाद-गीतं –  ग. दि. माडगूळकर या शब्दांना सोन्याचं मोल … Continue reading आणिले टिपूनी अमृतकण : भाग २

बेंगलोर डायरी ६ 

क्रिकेट आणि चित्रपट या भारताला जोडून ठेवणाऱ्या दोन गोष्टी आहेत. चित्रपट समजण्यासाठी प्रत्येक वेळी भाषा ओळखीची असावी लागतेच  असे नाही तर अनेकदा चित्रभाषा सगळी बंधने तोडून माणसांना जोडतात. दक्षिण भारतीय असे वर्णन केले जाते तेव्हा या दक्षिण भारतात पाच वेगवेगळी राज्ये आहेत आणि त्यांच्या चार भाषा, वेगळी संस्कृती आहे याचा थोडासा विसरच पडतो. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ. खासकरून दाक्षिणात्य चित्रपट असे म्हणताना सब … Continue reading बेंगलोर डायरी ६ 

बेंगलोर डायरी ५

एखादे शहर सांस्कृतिकदृष्ट्या किती सजग आहे हे बघायचे असेल तर त्या शहरात असणारी संग्रहालये, नाट्यगृहे, सभागृहे बघितली पाहिजेत असे कुठेतरी वाचले होते. बेंगलोर शहरात बघायला काय आहे याची यादी देताना जुन्या गोष्टींबरोबरच नव्याने आलेली काही ठिकाणे म्हणजे संग्रहालये; त्यामुळे ही बेंगलोर डायरी फक्त बेंगलोरमधील नानाविध प्रकारच्या संग्रहालयांबद्दल.      बेंगलोर शहर तसे जुने आहे आणि तसे जुने नाही – म्हणजे मागील एका लेखात म्हणल्याप्रमाणे या शहराचा इतिहास … Continue reading बेंगलोर डायरी ५

झेन आणि आनंदी राहण्याची कला

काही दिवसांपूर्वी झेन तत्त्वज्ञानाविषयी एक पोस्ट वाचनात आली होती. त्या पोस्टमध्ये फार सोप्या शब्दांत जीवन आनंदाने जगण्याची तत्त्वे सांगितली होती.          *कोणतीही गोष्ट करताना ती मनाच्या विशिष्ट एकाग्रतेने, मनाच्या शांतपणानं आणि साधेपणानं करणं. ज्यात ज्ञानाचा अनुभव येतो आणि त्या अनुभवातून आनंद मिळतो  ती गोष्ट म्हणजे झेन होय.         *आपले आयुष्य जगत असताना आपल्या बाबतीत घडणारी प्रत्येक गोष्ट ही आपल्या बाबतीत  घडू शकणारी सर्वोत्तम गोष्ट आहे असे समजावे … Continue reading झेन आणि आनंदी राहण्याची कला

पुनर्भेट नॅशनल पार्कची ४ :  विरहाच्या आणि मिलनाच्या गोष्टी  

  दि.  १४.११.२०२३         नॅशनल पार्कमध्ये नदीच्या आसपास एक जखमी माकड फिरत आहे असा निरोप आम्हांला मिळाला. आम्ही त्या माकडाला शोधण्यासाठी बाहेर पडलो. पार्कमध्ये नेहमी चिंचा बोरे विकणाऱ्या बायकांना विचारलं तर त्या म्हणाल्या, “आता तर इकडेच होतं! बहुतेक त्या दिशेला गेलं.”  दुसरी म्हणे, “या दिशेला गेलं.”  पण माकड काही त्या दिवशी सापडलं नाही.  १५.११.२०२३      मी कार्यालयात माझ्या कामात गढले होते; तर बाहेर आरडाओरडा  ऐकायला आला. मी बाहेर … Continue reading पुनर्भेट नॅशनल पार्कची ४ :  विरहाच्या आणि मिलनाच्या गोष्टी  

गेले ते दिन गेले

कोरा कागद… निळी शाई…  आम्ही कुणाला भीत नाही… दगड का माती… असे खेळ खेळत मोठी झालेली आपली पिढी ! या निळ्या शाईने आपल्याला सहनशीलता दिली, उज्ज्वल भवितव्य दिलं, लढण्याचं बळ दिलं! पेनामध्ये शाई भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आमची पिढी… दुकानदारही शाईचे थेंब मोजून पेनमध्ये टाकायचा. आधीच होल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे राहायचे – कधी शाई हातावर सांडायची – ती तशीच डोक्याला पुसायची…  … Continue reading गेले ते दिन गेले

पुनर्भेट नॅशनल पार्कची ३ : थंडीतील गुलाबी आठवणी 

दि. १.११.२०२३       ऑक्टोबर महिना संपला आणि नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी गुलाबी थंडीची चाहूल लागली. गुलाबी थंडीच्या आगमनाबरोबर आइस्क्रीम क्रीपरच्या गुलाबी फुलांना बहर आला. त्रिकोणी पानांची ही वेल. तिच्यावर इवलीशी दोन ते तीन सेंटीमीटर व्यासाची पाच पाकळ्यांची गुलाबी रंगाची असंख्य फुलं आली  आहेत. या फुलांच्या मध्यभागी इवले इवले पिवळ्या रंगाचे पुंकेसर दिसतात. आइस्क्रीम क्रीपरच्या फुलांवर असंख्य रंगीबेरंगी  फुलपाखरं भिरभिरताना दिसतात. ही फुलं गुलाबी रंगामुळे चट्कन नजरेत भरतात; … Continue reading पुनर्भेट नॅशनल पार्कची ३ : थंडीतील गुलाबी आठवणी 

अमूर्ततेचा शोध

भारतात अनेक जातींची, वेगवेगळ्या धर्मांची, विविध पंथांची, विविध भाषांची, वेगवेगळ्या विचारसरणींची, वेगवेगळा पेहराव करणाऱ्यांची जशी रेलचेल  आहे तसेच चित्रकलेच्या क्षेत्रातही असंख्य वेगवेगळे प्रकार आहेत. काही जण वास्तववादी चित्रं काढण्यात, काही जण व्यक्तिचित्रं रेखाटण्यात; तर काही जण निसर्गचित्रांत माहीर असतात. काही जण अमूर्त आकारांच्या चित्रशोधात सतत मग्न व तल्लीन झालेले असतात. या सर्व चित्रकारांची माध्यमेही वेगवेगळी असतात. काही चित्रकार जलरंग, काही तैलरंग; तर काही जण ॲक्रेलिक … Continue reading अमूर्ततेचा शोध

रियाज

       वाईवरून पाचगणीकडे निघालो की वळणावळणाचा पसरणी घाट सुरू होतो. या घाटातून प्रवास करताना आजही मी भारावून जातो. मनातल्या मनात कितीतरी आठवणी जपल्यायत या घाटाने.  बारावी सायन्स शिकत असताना पास काढलेला असायचा. रोज पाचगणी – वाई  एसटीने प्रवास करायला लागायचा. हॅरिसन फॉली (थापा पॉईंट) संपला की पांडवगड, मांढरदेवीचा डोंगर आणि मग पसरणी, एकसर, कुसगाव  अशा अनेक गावांतील शेतकऱ्यांनी केलेली भातशेती दिसायची.     त्या भातशेतीत तुंबवलेले पाणी … Continue reading रियाज

गाण्यांमागची गोष्ट

मानसशास्त्राचा अभ्यास करताना, ‘जोहारी विंडो’ नावाची संकल्पना शिकवतात. जसे खिडकीचे चार भाग असतात तसे चार कप्प्यांमध्ये व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये विभागलेली असतात. पहिला कप्पा आहे अशा क्षमता-कमतरतांचा ज्या व्यक्तीला स्वतःलाही ठाऊक असतात आणि इतरांनाही. म्हणजे रुग्णांचे निदान करून उपचार करण्याची माझी क्षमता किंवा कोणतेही वाहन चालवता न येणे ही कमतरता मला आणि जगाला ज्ञात आहे. काही गुणदोष फक्त माझे मलाच ठाऊक असतात. माझ्या मनातली सव्वा लाखाची झाकली … Continue reading गाण्यांमागची गोष्ट