भारत गायन समाज – भाग ३

लेखन अनुभवएका सांस्कृतिक इतिहासाची शतकोत्तर वाटचालपुणे भारत गायन समाजएक सुरेल स्वरयात्रा – ११० वर्षांचा सांगीतिक प्रवास(भाग ३ ) आपण आपल्याच तंद्रीत चालत असावं आणि एका वळणावर अनपेक्षित मुक्कामी पोहोचावं, तसं मला या ग्रंथाचं लेखन करताना वाटलं. एक नाही, दोन नाही, अनेक दिवस. या वळणानं मला एका वेगळ्याच विश्वाची ओळख करून दिली, दुरन्वये का होईना, गुरुवर्य भास्करबुवांशी जोडलं. हा केवळ योगायोग होता, की माझं विधिलिखित! माहीत … Continue reading भारत गायन समाज – भाग ३

लेखन अनुभव : २

एका सांस्कृतिक इतिहासाची शतकोत्तर वाटचाल पुणे भारत गायन समाज एक सुरेल स्वरयात्रा – ११० वर्षांचा सांगीतिक प्रवास (भाग २) देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचं संस्थात्मक कार्य समजून घेताना पुण्यात आणि एकूणच महाराष्ट्रात त्या वेळी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती काय होती, हे विचारप्रवाह कसे होते, ते पाहणं आवश्यक वाटलं; कारण या विचारांना बाजूला ठेवून कलानिर्मिती-प्रगती-सांस्कृतिक संपन्नता यांचा विचार होऊ शकत नाही. ही सर्व क्षेत्रं परस्परपूरक … Continue reading लेखन अनुभव : २

लेखन अनुभव

एका सांस्कृतिक इतिहासाची शतकोत्तर वाटचाल पुणे भारत गायन समाज एक सुरेल स्वरयात्रा – ११० वर्षांचा सांगीतिक प्रवास (भाग १) २०१७-१८ सालची गोष्ट आहे. गायिका पंडिता शैला सुधीर दातार यांचा फोन आला. “अगं! एक सप्टेंबर १९११ रोजी देवगंधर्व भास्करबुवा बखले – माझे आजेसासरे – यांनी ‘किर्लोस्कर भारत गायन समाजा’ची स्थापना केली. २०२२ साली गुरुवर्यांचं स्मृतिशताब्दीवर्ष आहे. त्या निमित्तानं संस्थेचा इतिहासवजा सांगीतिक प्रवास लिहिण्याची कल्पना आहे. ‘राजहंस … Continue reading लेखन अनुभव

आणिले टिपूनी अमृतकण : भाग २

‘मनी आणावे ते ते होते कृपा केलिया रघुनाथे प्रचिती येते’ समर्थ रामदासांचे हे शब्द ग. दि. माडगूळकरांच्या लेखन-प्रतिभेला तंतोतंत लागू पडतात. त्यांच्या गीतांच्या झोक्यांनी गाव-खेड्यातले चिमुकले डोळे झोपी जातात. ‘गोरी गोरी पान’, ‘नाच रे मोरा’ अशी बालगीतं शाळाशाळांची स्नेहसंमेलनं गाजवतात. ‘गीत-रामायण’नं ओसऱ्या राममय होऊन जातात. चित्रपटगीतांनी मराठी वाद्यवृंदांना ओळख मिळते. लावण्यांनी जत्रेच्या रात्री रंगतात. एके काळी कथा-पटकथा-संवाद-गीतं –  ग. दि. माडगूळकर या शब्दांना सोन्याचं मोल … Continue reading आणिले टिपूनी अमृतकण : भाग २

आणिले टिपूनी अमृतकण

‘तुझे जाहले दर्शन वेडावलो आनंदाने माझे मला उमगेना काय मागावे मागणे…. तुझ्या हास्यातून आले स्वनातीत शब्द काही ममतेनं म्हणालास वरं ब्रूहि वरं ब्रूहि…. काय मागू गुरूदेवा तूच बोल माझ्या मुखे तुझ्या मुखी आले शब्द माझ्या मागण्यासारखे…. वेळ साधुनी मिळावी जठराग्निस आहुती माझे एकल्या व्यक्तीचे मागणे ते किती?…. साऱ्या विश्वासाठी द्यावा गुरूदेवा, एक वर जीव जीव सुखी व्हावा स्वर्ग यावा पृथ्वीवर’ — ‘माझे मागणे’  ग. दि. … Continue reading आणिले टिपूनी अमृतकण

पंडिता मालिनीताई राजुरकर

गृहिणी ते विख्यात गायिका (उत्तरार्ध)    लग्नानंतर  मालिनीताईंनी गाणं केलं पाहिजे, ही वसंतरावांची प्रेमळ अटच होती. अनेक गुणवान भारतीय स्त्री कलावंतांना आपली कला अपेक्षेप्रमाणे वाढवता येत नाही; मग ते गाणं असो, वाद्य वादन असो किंवा इतर कुठलीही कला. केवळ कलाच नव्हे; तर अनेक स्त्रियांना अर्धवट राहून गेलेलं शिक्षणही पूर्ण करता येत नाही. या पार्श्वभूमीवर वसंतरावांचे विचार किती वेगळे होते, काळाच्या पुढे होते याचं आश्चर्य वाटतं. त्यांच्या … Continue reading पंडिता मालिनीताई राजुरकर

पंडिता मालिनीताई राजूरकर 

गृहिणी ते विख्यात गायिका त्यांची माझी प्रत्यक्ष भेट फक्त दोन वेळा झाली होती. एरवी त्या व्यासपीठावर गायिका म्हणून आणि मी समोर श्रोता हेच आमचं मुख्य नातं होतं. त्यांच्या असंख्य सामान्य चाहत्यांपैकी, रसिकांपैकी मी एक! संगीताच्या व्याकरणापर्यंत मी कधी पोहोचले नाही – पोहोचावं असं कधी वाटलंही नाही. संगीतानंदाच्या पायरीवरच थांबले. त्यांचं गाणं आवडूनही मैफलींनंतर आवर्जून भेटून तसं कधी सांगितलं नाही; कारण त्यांच्या भैरवीचे शांतवणारे सूर बरोबर … Continue reading पंडिता मालिनीताई राजूरकर 

आहिताग्नि शंकर रामचंद्र राजवाडे – भाग २

माणसं आपल्याला कधी ना कधी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भेटत असतात ;मग ती कुठल्याही क्षेत्रातली असोत. त्यांचा थोडा सहवासही आपल्याला खूप काही देऊन जातो, शिकवून जातो.काही वर्षांपूर्वी असंच एक असामान्य, अलौकिक व्यक्तिमत्त्व मला भेटलं, ज्यांचं नाव आहे आहिताग्नि राजवाडे. खरंतर त्यांना मी प्रत्यक्ष पाहिलं नाही, ऐकलंही नाही; तरीही ते मला भेटले असं मी म्हणतेय. त्यांच्या व्यासंगाची, अफाट कष्टांची, ज्ञानोपासनेची ‘धग’ मला लागली. त्यांचं निर्भीड, परखड व्यक्तिमत्त्व माझ्यापर्यंत पोहोचलं ते … Continue reading आहिताग्नि शंकर रामचंद्र राजवाडे – भाग २

आहिताग्नि शंकर रामचंद्र राजवाडे

(१३-१०-१८७९ ते २७-११-१९५२) आहिताग्नि शंकर रामचंद्र राजवाडे. अनेकांसाठी तसं हे अनोळखी नाव. महाराष्ट्रातील काही अभ्यासक आणि विचारवंत वगळता या ज्ञानोपासकाची फारशी ओळख महाराष्ट्राला नाही. एकेकाळी ‘अग्निहोत्र मंदिर’, २८६ सदाशिव पेठ, पुणे (महाराष्ट्र) इथं या प्रकांड पंडिताचं वास्तव्य होतं. त्यांनी आयुष्यभर फक्त ज्ञानसंग्रह आणि ग्रंथलेखन केलं. हिंदुस्थानभर दौरे करून धर्म, तत्त्वज्ञान आणि इतिहास या विषयांवर व्याख्यानं दिली. ‘ज्ञानोपासक’ या बिरुदाला त्यांच्यामुळे श्रेष्ठत्व प्राप्त व्हावं असं हे … Continue reading आहिताग्नि शंकर रामचंद्र राजवाडे