पुनर्भेट नॅशनल पार्कची २ : नॅशनल पार्कमधील श्रावण 

संततधार धरलेला आषाढ संपून  उद्यानात ऊन-पावसाचा श्रावण सुरू होतो.  जमिनीलगत उगवणाऱ्या गुलाबी रंगाच्या  रानहळदीला बहर येतो . आषाढात समूहाने उगवणारी अळंबी दिसते; तर श्रावणात  ही रानहळदीची फुलं काही काही ठिकाणी समूहाने उगवलेली दिसतात  . जमिनीलगत गुलाबी रंगाच्या पाकळ्या आणि त्यावर काही ठिकाणी हळदीच्या पिवळ्या रंगांचा फटकारा असलेली रानहळदीची फुलं शोधायला मी पूर्वी रानवाटा धुंडाळल्या आहेत .  वाघांच्या पिंजऱ्याकडून चालत येत असताना या जमिनीलगत उगवलेल्या रानहळदीच्या … Continue reading पुनर्भेट नॅशनल पार्कची २ : नॅशनल पार्कमधील श्रावण 

मी आणि माझे वाचन

 गेली ५० वर्षे मी विविध प्रकारची पुस्तके वाचतो आहे. सुदैवाने पुस्तके वाचायला भरपूर वेळ मिळेल अशी शिक्षकाची नोकरी मिळाली. पुस्तकांनी माझे जीवन पूर्ण बदलले. वाचन ही माझ्या आयुष्यातील अनमोल भेट आहे, असं मला वाटतं. माझ्यासाठी वाचन हा स्वान्त सुखाय भाग आहे. मी आणि पुस्तक हे आमच्या दोघांचं खूप सुंदर प्रेमाचं नातं आहे.    अगदी लहानपणी शाळेत शिकत असताना मला ‘सुविचार’ वाचनमालेतील अनंत काणेकर, वि. स. खांडेकर … Continue reading मी आणि माझे वाचन

आमची शेती… आमचं प्रेम.. 

  सुनिल खरे ( माझा नवरा ) एम्.एस्सी. (अॕग्रि) झालेला. सगळ्या प्रकारची पिकं, भाजीपाला, बटण-मश्रूम, आंबा, अननस… त्यांचं कॅनिंग, डेअरी, पिगरी… असा बराच अनुभव एव्हाना गाठीशी आला होता. जागा मिळेपर्यंत सात वर्षं गेली. तोवर बरोबरची मित्रमंडळी पांगली; मग आपल्याला परवडेल असं वाटणारी चार एकर जमीन आमच्या ताब्यात आली.    मुख्य गेटच्या आत आल्यावर उजवीकडे अगदी जवळच बोअरचा पंप होता; पण वापर नसल्याने बोअरचं पाणी आटलं. … Continue reading आमची शेती… आमचं प्रेम.. 

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने संत पंत तंत  काव्यविषयक लेखमाला : भाग दुसरा 

संत नामदेव  नामदेवांचा जन्म झाला तो काळ होता कर्मकांडं, व्रतवैकल्ये आणि  जातिभेदाचा!  शिंपी कुळात जन्म झालेल्या नामदेवांचा जन्म शिंपीतून – शिंपल्यातून झाला अशी एक मजेशीर आख्यायिका ऐकायला मिळते. एखाद्या व्यक्तीच्या मागे वलय निर्माण झालं की त्याच्याभोवती अतर्क्य घटनांची रांगोळी चितारणारा समाज प्रत्येक काळात आढळतो.  ‘नामदेवांनी सुलतानासमोर मेलेली गाय जिवंत केली,’ ही अशीच प्रसिद्ध(!) चमत्कार कथा!  प्राक्तनाचे योगें भरलासे ओहटा| पाडितसे वाटा| चोरासंगे|| या अभंगाचा दाखला … Continue reading आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने संत पंत तंत  काव्यविषयक लेखमाला : भाग दुसरा 

बंध

चारी बाजूंना दूरवर पसरलेला पिवळा शुष्क माळ. त्यावर एकट्याने संकटांना झुंज देत वाढलेला धीरगंभीर विस्तीर्ण वड! एकाकी!  कधीतरी वार्‍याच्या इवल्या झुळुकेवर भुरभुरत एक बीज येऊन पडलं. कोवळा गुलाबी-तपकिरी कोंब तरारला. स्वत:त निमिषानिमिषानं होत जाणारा बदल पाहून चकित होणारा. मश्गूल…  आणि एका तिन्हीसांजेला मंद-मंजूळ संगीत त्याच्या कानावर आलं. अंगावर सुखद रोमांच उठले. अनावर उत्सुकतेनं त्यानं सभोवार पाहिलं. सगळं मोकळं मैदान – दूरवर उभा एक फक्त वड. … Continue reading बंध

मित्र नावाचा नातलग…

ना जवळचा ना लांबचा… पण  हाकेच्या अंतरावरचा…   मित्र नावाचा नातलग… ना जवळचा ना लांबचा…पण  हाकेच्या अंतरावरचा… एकेकाळचा अनोळखी पण आता जिवलग ना जातीचा ना पातीचा ना रक्ताचा ना वंशावळीचा मीही तोच, तोच तूही मीपणाच नाही कुठे…  वयं वाढली… बुद्धी वाढली…  तशी इयत्ताही वाढत गेली… बालवाडीची झाली शाळा… शाळेचं झालं विद्यालय.. तिचं झालं महाविद्यालय…  मित्र नावाच्या नातेवाइकांत नवी भर पडली…मिशी आली  …दाढी वाढली… खांद्याखांद्यावर जबाबदारी वाढली… … Continue reading मित्र नावाचा नातलग…

ओ माझी रे …

आज सकाळी अचानक ‘ओ माझी रे …’ ची सुरावट कानावर आली . तसे हे गाणे अनेक वेळा ऐकलेले आहे; पण आज त्यातल्या शब्दांकडे जरा जास्तच लक्ष गेले . ‘ओ माझी रे अपना किनारा नदिया की धारा है‌‍|साहिलो पे बहनेवाले कभी सुना तो होगा कहीकागजोकी कश्तियोंका कहीं किनारा होता नहींओ माझी रे माझी रे…कोई किनारा जो किनारे से मिले वो अपना किनारा हैओ माझी रे…….पानियो में … Continue reading ओ माझी रे …

‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें’

संत पंत तंत  काव्यविषयक लेखमाला – भाग २ ‘संतकवी तुकाराम’  ‘भगवद्भक्ति कराया बहु जड जीवांसी जो तुका शिकवी| त्याच्या दुसरा धरणीवरि येइल कोण हो तुकासि कवी?’ ‘तुकारामांनी आपल्या अभंगांतून जडजीवांना  शिकवण दिली; त्याच्या तुकासी –  त्यांच्याशी कोणत्याही कवीची तुलना होऊ शकणार नाही.’  तुकारामांच्या कार्याचं आणि कवित्वाचं हे यथार्थ वर्णन!  ‘नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें| सवें पांडुरंगें येऊनियां| सांगितलें काम करावे कवित्व| वाउगे निमित्य बोलों नको|| मनात … Continue reading ‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें’

‘आमच्या’ वेळी असे नव्हते! 

ही ‘आमची’ वेळ म्हणजे कोणती वेळ ? ‘आमची’ वेळ म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हाची वेळ; पण लहान असलो तरी आजूबाजूचे व्यवहार समजण्याइतके तेव्हा मोठे होतो.  नंतर तरुण वयात   तर आम्हांला आणखी खूप काही दिसायला, समजायला लागलं. आजूबाजूला त्यावेळी आम्ही जे काही पाहत होतो त्या वस्तू, ती माणसं, त्यांचे व्यवहार आणि एकूणच जग आजच्यापेक्षा वेगळं होतं. थोडक्यात ‘आमची’ वेळ म्हणजे पन्नास-साठ वर्षांपूर्वीचा काळ.  साठी-सत्तरीला आलेली … Continue reading ‘आमच्या’ वेळी असे नव्हते! 

संत पंत तंत – एक वाङ्मयीन प्रवास

लेख पहिला ज्ञानेश्वर ‘किं कवेस्तस्य काव्येन किं काण्डेन धनुष्मतः| परस्थ हृदये लग्नं न घूर्णयति यच्छिरः| ‘एखाद्या धनुर्धराने आपल्या बाणाने शत्रूच्या हृदयाचा  वेध घेऊन त्याचं मस्तक गरगरायला लावलं नाही; तसंच एखाद्या कवीने आपल्या काव्यातून रसिकाच्या हृदयात शिरून त्याला आपले शिर डोलवायला लावले नाही तर त्या बाणाचा आणि त्या काव्याचा काय उपयोग!’  काव्य, कवी आणि काव्यरसिक यांच्या संबंधांचं हे मजेदार वर्णन! कवी, काव्य आणि त्यांस समरसून दाद … Continue reading संत पंत तंत – एक वाङ्मयीन प्रवास