कोळवली…एक घरेलू सहल

                        सुनीलच्या म्हणजे माझ्या यजमानांच्या घरची वडिलोपार्जित जमीन अबलोलीच्या पुढे कोळवली या गावी आहे, असं काही वर्षांपूर्वी समजलं होतं. तिकडे कधीच कुणी गेलेलं नव्हतं. आमची ही जमीन बघायला जायचा घाट आम्ही घातला, तेव्हा गुहागर या गावाशिवाय आजूबाजूचं आम्हांला काहीच माहीत नव्हतं.                          गुहागरला जाताना वाटेत अबलोली गावाकडे जाण्याचा फाटा लागतो. तिथून पुढे – म्हणजे अबलोलीच्याही पुढे –  गाडी न जाणाऱ्या ठिकाणी ही जमीन आहे. सुनीलने शेती विषयातली … Continue reading कोळवली…एक घरेलू सहल

बांधवगड : व्याघ्रदर्शन 

 .                 तशी ही आहे  २००९ ची गोष्ट. जुन्या गोष्टींचा कधीकधी वेगळाच आनंद असतो. कालौघात  तिकडची गर्दी, बंधने  वाढत जातात.  अशा वेळी  त्या जुन्या गोष्टी स्मरून त्याविषयी पुन्हा एकदा  वाचायला, लिहायला आणि तो निवांतपणा आठवायलाही खूप छान वाटते.  अशा एका बिनगर्दीच्या वेळची ही गोष्ट.                    पेपरमध्ये जाहिरात बघितली. व्याघ्रदर्शनाची ही सहल  होती. जंगलसफारी  नेणारी  ही कंपनी होती. घराजवळच असल्याने लगेच चौकशीला गेले.  तारखा सोयीच्या होत्या, दोन मैत्रिणी … Continue reading बांधवगड : व्याघ्रदर्शन 

मालिकांचा सावळा गोंधळ

कृष्णधवल जमान्यातील मालिका हा एक वेगळाच जिव्हाळ्याचा विषय होता. त्याबद्दल अजूनही मन:पूर्वक बोललं जातं. अगदी सुरुवातीच्या काळात टीव्ही फक्त संध्याकाळी असायचा. बातम्यांमध्ये सर्वात आधी स्मिता गोविलकर ( तळवलकर ) शाळेच्या युनिफॉर्मचीच साडी नेसून interview साठी गेली आणि थेट बातम्या देऊनच आली! प्रदीप भिडे, शोभा तुंगारे, ज्योत्स्ना किरपेकर ह्याही होत्या.  सुरभि कार्यक्रम गाजला. सुधीर गाडगीळची गद्धेपंचविशी दाद मिळवून गेली. हमलोग, उडान, श्वेतांबरा, गुन्ह्याचा शोध घेणाऱ्या मालिका … Continue reading मालिकांचा सावळा गोंधळ

चित्रपटांच्या रिमिक्सच्या जमान्यात…

ओह… गॉड! हा सुमारे १९७७ च्या आसपासचा चित्रपट असावा. मुळात रंगकर्मी असलेल्या जॉर्ज  बर्न्स नावाच्या सुमारे ८० वर्षांच्या आणि उबदार आवाजाच्या नटाने त्यातील देवाची मध्यवर्ती भूमिका केली होती; पण त्या वेळी मात्र मुंबईत हा चित्रपट जेमतेम चार दिवस चालला. मला ह्या चित्रपटाची डीव्हीडी पहाण्याचा योग मस्कतच्या लायब्ररीमुळे लाभला. मन लावून रमून बघण्याचा हा चित्रपट रात्री आम्ही सर्वांनी मिळून बघितला आणि संध्याकाळी सीडी परत करायची त्या … Continue reading चित्रपटांच्या रिमिक्सच्या जमान्यात…

आमची शेती… आमचं प्रेम.. 

  सुनिल खरे ( माझा नवरा ) एम्.एस्सी. (अॕग्रि) झालेला. सगळ्या प्रकारची पिकं, भाजीपाला, बटण-मश्रूम, आंबा, अननस… त्यांचं कॅनिंग, डेअरी, पिगरी… असा बराच अनुभव एव्हाना गाठीशी आला होता. जागा मिळेपर्यंत सात वर्षं गेली. तोवर बरोबरची मित्रमंडळी पांगली; मग आपल्याला परवडेल असं वाटणारी चार एकर जमीन आमच्या ताब्यात आली.    मुख्य गेटच्या आत आल्यावर उजवीकडे अगदी जवळच बोअरचा पंप होता; पण वापर नसल्याने बोअरचं पाणी आटलं. … Continue reading आमची शेती… आमचं प्रेम..