धर्म नावाची मजेशीर गोष्ट

समाज कुटुंबाचा बनलेला असतो. ही कुटुंबे वेगवेगळे धर्म बाळगून असतात.  कुटुंबात  जन्म झाला, की आपण त्या कुटुंबाच्या धर्माचे बनून जातो.  कुटुंब हिंदू असेल तर आपण आपसूक हिंदू म्हणून ओळखले जातो. एवढ्यावर संपत नाही. ज्या धर्मात जन्म झालाय त्या धर्माचा अभिमान बाळगण्याची पद्धत असते. त्या पद्धतीनुसार आपण जन्माने प्राप्त झालेल्या धर्माचा अभिमान बाळगायला लागतो. एकप्रकारची सक्तीच असते ती. कोणी विचारत नाही, ‘तू ज्याबद्दल अभिमान बाळगतो आहेस … Continue reading धर्म नावाची मजेशीर गोष्ट

नाट्य परिचय : कुटुंब किर्रतन

कुटुंब किर्रतन हे संकर्षणचं नाटक पाहिलं.  आवडण्यासारखं खूप काही या नाटकात आहे हे जाणवलं.  सुरुवातीलाच स्पष्ट सांगायचं तर नाटकाची सुरुवात काहीशी धिमी आणि निराशाजनक वाटली.  चाळीस मिनिटांनंतर मध्यांतर होते.  सुरुवातीची दहा मिनिटं अगदीच सो सो ड्रामा. साधेसुधे मिडिऑकर विनोद – सामान्य संवाद. कशाला आपण हे बघत  बसायचं असं वाटत राहिलं. नंतरची तीस मिनिटं मात्र कथाकृती अधिक शार्प करणारी, चांगलीच रंगतदार, प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारी. संकर्षणचे … Continue reading नाट्य परिचय : कुटुंब किर्रतन

तेव्हाच्या गोष्टी

चांद्रयान ३ चंद्राच्या भूभागावर अलगद उतरत होतं तेव्हा…  टीव्हीवर वृत्तनिवेदिका उत्साहानं काहीतरी  अघटित घडल्याच्या थाटात कालच्याच बातम्या आज पुन्हा सांगत होती… एक राजकीय नेता दुसऱ्या एका  राजकीय नेत्यावर कसा निशाणा साधत आहे आणि त्या दुसऱ्या नेत्याकडून त्याचा कशा प्रकारे पलटवार केला जातो आहे वगैरे  बातम्यांच्या नावाखाली खपवण्याचे तिचे उद्योग चालू होते. चांद्रयान ३ चंद्राच्या भूभागावर अलगद उतरत होतं तेव्हा… करमरकर  फोनवर आपल्या सिनियर मॅनेजरला सांगत … Continue reading तेव्हाच्या गोष्टी

माझ्याच बाबतीत . . .

    ‘माझ्याच बाबतीत असं का होतं…?’ असा  प्रश्न मला सतत पडतो.  तुम्हांला पडतो का ?  पडत असणार; कारण तो तसा अनेकांना पडतो; पण ते उघड बोलत नाहीत!  मला इथे त्याविषयी लिहायची संधी मिळाल्याने मी त्याचे मला आलेले अनुभव सांगू शकतो. मी भलताच पंक्च्युअल म्हणजे वक्तशीर माणूस आहे. नाटकाच्या जाहिरातीत सूचना असते, ‘प्रेक्षकांनी पंधरा मिनिटे आधी स्थानापन्न व्हावे.’ मी बरोबर पंधरा मिनिटे आधी आसनस्थ होतो; पण त्यावेळी … Continue reading माझ्याच बाबतीत . . .

‘आमच्या’ वेळी असे नव्हते! 

ही ‘आमची’ वेळ म्हणजे कोणती वेळ ? ‘आमची’ वेळ म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हाची वेळ; पण लहान असलो तरी आजूबाजूचे व्यवहार समजण्याइतके तेव्हा मोठे होतो.  नंतर तरुण वयात   तर आम्हांला आणखी खूप काही दिसायला, समजायला लागलं. आजूबाजूला त्यावेळी आम्ही जे काही पाहत होतो त्या वस्तू, ती माणसं, त्यांचे व्यवहार आणि एकूणच जग आजच्यापेक्षा वेगळं होतं. थोडक्यात ‘आमची’ वेळ म्हणजे पन्नास-साठ वर्षांपूर्वीचा काळ.  साठी-सत्तरीला आलेली … Continue reading ‘आमच्या’ वेळी असे नव्हते!