बंध
चारी बाजूंना दूरवर पसरलेला पिवळा शुष्क माळ. त्यावर एकट्याने संकटांना झुंज देत वाढलेला धीरगंभीर विस्तीर्ण वड! एकाकी! कधीतरी वार्याच्या इवल्या झुळुकेवर भुरभुरत एक बीज येऊन पडलं. कोवळा गुलाबी-तपकिरी कोंब तरारला. स्वत:त निमिषानिमिषानं होत जाणारा बदल पाहून चकित होणारा. मश्गूल… आणि एका तिन्हीसांजेला मंद-मंजूळ संगीत त्याच्या कानावर आलं. अंगावर सुखद रोमांच उठले. अनावर उत्सुकतेनं त्यानं सभोवार पाहिलं. सगळं मोकळं मैदान – दूरवर उभा एक फक्त वड. … Continue reading बंध
