सप्टेंबर २०२६
मार्गदर्शक : भानू काळे संपादक : अनिल जोशी व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी तंत्रसाहाय्य : मिहिर जोशी Continue reading सप्टेंबर २०२६
This will be used to store each unique issue of the magazine
मार्गदर्शक : भानू काळे संपादक : अनिल जोशी व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी तंत्रसाहाय्य : मिहिर जोशी Continue reading सप्टेंबर २०२६
साप्ताहिक साधनेत मागील वर्षी वनश्री वनकर यांची झरी-जामनीतील स्त्रिया ही लेखमाला अधूनमधून वाचत होतो. वाचलेला प्रत्येक लेख मनाचा ठाव घेत होता. काहीतरी सकस, अर्थपूर्ण, आशावादी लेखन हाती लागल्याचा आनंद मिळत होता. लेखावरच्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया ही लेखमाला नक्कीच गाजणार याची साक्ष देत होत्या. तेव्हापासून या लेखमालेचे लवकरच पुस्तक येणार आहे याचीही चाहूल लागली होती. त्यामुळे कधी एकदा हे पुस्तक प्रकाशित होतेय आणि कधी आपण वाचतोय अशी … Continue reading पुस्तक परीक्षण : आशावाद जागवणाऱ्या… लढायला बळ देणाऱ्या… बाभळीच्या बाया!
The Recipe by T. P. Kailasam A bit of bone, a bit of skin, A toothless smile, a sunken chin, Two flapping ears, two kindly eyes, A spirit that can scale the skies; A yard of cloth, a stick in hand, To walk the length of motherland; A cup of goat’s milk, dates and grain, A heart that feels another’s pain; A soul attuned to … Continue reading अभिवाचन : एक कविता
प्रॉस्पेक्ट पार्क न्यू यॉर्क येथील एक सूर्योदय छायाचित्र : सौ. शुभांगी जोशी Continue reading मुखपृष्ठ सप्टेंबर २०२६
बुद्धिमंतांना प्रिय असं विबुधप्रिया वृत्त. यातही मोरोपंतांनी त्यांच्या भाषाप्रभुत्वातून रामकथा खुलवली आहे. मोरोपंत विबुधप्रिया वृत्ताला हरिनर्तन छंद म्हणतात. (गालगालल गालगालल गालगा) गेयता असलेल्या या वृत्तातील प्रत्येक ओळीत एकेक घटना गुंफत मोरोपंतांनी कथेला वेग दिला आहे. २६२/४/ शंभुच्या धनुचे, पळांत चि ओढितां तुकडे करी जानकी, पणसिद्धि पाहुनि, हर्षुनि, प्रभुतें वरी, दे तिघांसि सुता तिघी, जनकासि कीर्ति मिळे बरी या दोन वाक्यांत रामाचा विवाहही होऊन जातो. … Continue reading मोरोपंत : ‘विबुधप्रिया, सवया रामायण’
ई अंतर्नाद ऑगस्ट २६ मधला अरुण कानेटकर यांचा रविकिरण मंडळावरील लेख वाचला. मराठी साहित्याच्या इतिहासात काही चळवळींचे महत्त्व त्यांच्या तत्कालीन लोकप्रियतेपेक्षा त्यांनी पुढील साहित्याला दिलेल्या दिशेमुळे ठरते. रविकिरण मंडळ ही अशीच एक महत्त्वाची साहित्यिक घटना होती. हा लेख या जुन्या काव्यपरंपरेकडे पुन्हा वळून पाहण्याची संधी देतो. लेखाची सुरुवातच कवी गिरीश यांच्या ‘मराठी नाट्यछटा’ या पुस्तकातील ‘We are seven’ या उल्लेखाने आणि सहकाऱ्यांना केलेल्या अर्पणाने होते. … Continue reading प्रतिसाद : रविकिरण मंडळ
कार्ल सेगन यांची ‘कॉसमॉस’ ही मालिका नितांतसुंदर आहे. या मालिकेतील अनेक दृश्यं अविस्मरणीय आहेत. या मालिकेतील माझ्या मनावर प्रभाव पाडलेला एक प्रसंग आठवतो. या दृश्यात एक मोठं वाचनालय दाखवलं आहे. वाचनालयातील प्रत्येक मजल्यावर भिंतींलगत पुस्तकांनी गच्च भरलेली कपाटे ठेवलेली आहेत. कार्ल सेगन त्या पुस्तकांच्या कपाटांकडे निर्देश करून म्हणतात, ‘अशी कल्पना करा, की तुम्ही दर आठवड्याला एक पुस्तक वाचता. या गतीने जर तुम्ही आयुष्यभर पुस्तके वाचली … Continue reading तथ्यज पुस्तकांची शोधयात्रा
अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले. ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे : हव्यासापोटी एकमेकांशी लढाया करून, भांडून, नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याच आधिपत्याखाली सगळे जग असावे … Continue reading पुनरपि जननं : भाग १९
उत्क्रांतीच्या ओघाकाठी वचन दिले उभयतां युगायुगांचे अतूट व्रत, हो दिग्विजयीं सांगता रानघऱ्यांचा गृहप्रवेश कोंबडा आरवला. भैरू उठला. तोंड धुऊन त्याने न्याहारी केली. पारूने त्याला शिदोरी बांधून दिली. तोवर भैरूने बैलांना वैरणपाणी दिलं आणि त्यांना घेऊन तो शेताकडे निघाला. पारूने कपिलेला आणि शालू शेळीला चारा दिला. वासराला आणि कोकराला प्यायला सोडलं; मग दूध काढलं. मोत्या कुत्र्याला भाकरी दिली; मनीला दूध दिलं; कोंबड्यांना दाणे टाकले. गायी, बैल, शेळ्या, कुत्री, … Continue reading मैत्र जीवाचें
डॉ. सरोज व डॉ. नील सहस्रबुद्धे या मातापुत्रांच्या जोडीने ‘शरीराच्या कथा आणि व्यथा’या शीर्षकांतर्गत शरीरातील विविध संस्थांची माहिती पुस्तकरूपाने मराठीत प्रसिद्ध करायचा संकल्प सोडला आहे. या मालिकेतील ‘मानवी मज्जासंस्था’ यावरचे दुसरे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले. ही पुस्तके छापील व ई अशा दोन्ही स्वरूपांत उपलब्ध आहेत. ई स्वरूपातील पुस्तक पूर्णपणे विनामूल्य आहे. शास्त्रीय ज्ञान मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी हे चाललेले प्रयत्न वेगळे वाटल्याने आम्ही या पुस्तकाच्या … Continue reading स्वागत : ‘शरीराच्या कथा आणि व्यथा’