सप्टेंबर २०२६

संपादकीय : अमेरिका प्रवास — भाग १ :  उड्डाण

  नुकत्याच केलेल्या अमेरिका प्रवासाच्या निमित्ताने … भारतातून अमेरिकेत केलेला प्रवास हे   नुसते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नसते. त्याला अनेक सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आयाम असतात. याबाबतची निरीक्षणे क्रमशः … अमेरिकेला जाण्यापूर्वी खूप पूर्वतयारी करावी लागते. विमान प्रवासाचे नियोजन हा त्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग असतो. पुरेसे आधी नियोजनबद्ध बुकिंग केल्यास विमानाची तिकिटे स्वस्त मिळू… Continue reading संपादकीय : अमेरिका प्रवास — भाग १ :  उड्डाण

यास्मिन शेख : चिरतरुण भाषायोगिनी

  ‘मूर्तिमंत मराठीप्रेम’ या दोन शब्दांत ज्यांचे अवघे जीवन सामावलेले होते त्या यास्मिन शेख यांनी  सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता वयाच्या एकशेएकाव्या वर्षी पुण्यात शेवटचा श्वास घेतला. वयाचा विचार करता अनपेक्षित नसले तरी त्यांचे निधन हे जिवाला चटका लावणारे होते. त्याच दिवशी दुपारी तीन वाजता बाणेर येथील विद्युतदाहिनीत जेव्हा त्यांचा देह शेवटचा दृष्टीआड झाला… Continue reading यास्मिन शेख : चिरतरुण भाषायोगिनी

ज्ञानपीठ पुरस्कार लेख क्र. ८

वि. वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’: मराठी साहित्यातील ध्रुवतारा     १९७४ मध्ये वि. स. खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मराठी मानकरी ठरले. त्यानंतर एक तप उलटून गेल्यावर १९८७ साठी कुसुमाग्रजांना हा पुरस्कार जेव्हा जाहीर झाला तेव्हा समीक्षक आणि सर्वसाधारण वाचक, सर्वांनाच या निर्णयाचा आनंद झाला. विशेष म्हणजे खांडेकरांना हा पुरस्कार मिळाला त्या वेळी कुसुमाग्रज या सन्मानास पात्र… Continue reading ज्ञानपीठ पुरस्कार लेख क्र. ८

एक नाटक, दोन दृष्टिकोण  : एका नटाचा मृत्यू

 महेश एलकुंचवार यांनी लिहिलेला ‘एका नटाचा मृत्यू’ हा एकल प्रयोग पाहिला. हा दीर्घांक मी अलीकडेच वाचला होता. मुळात मी फारशा नाट्यसंहिता वाचल्या नसल्यामुळे संहिता वाचणं आणि लगेच तिचा रंगमंचावरील प्रयोग पाहणं, हा अनुभवही माझ्यासाठी जवळजवळ पहिलाच होता. ही संहिता वाचताना एलकुंचवारांनी रंगमंच, प्रकाशयोजना, संगीत आणि अभिनेत्याच्या प्रत्येक हालचालीचं केलेलं सूक्ष्म आणि तपशीलवार वर्णन विशेष लक्ष… Continue reading एक नाटक, दोन दृष्टिकोण  : एका नटाचा मृत्यू

पुनरपि जननं : भाग १९ 

अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली  ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.  ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे : हव्यासापोटी एकमेकांशी लढाया… Continue reading पुनरपि जननं : भाग १९ 

खवय्या : गुऱ्हाळ (भाग १)

या अंकापासून सागर वामन दामले यांच्यासोबत एक खाद्यसफर  सुरु करत आहोत.  लेखक सागर वामन दामले हे शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर आहेत. २००५ साली, पदव्युत्तर परीक्षा झाल्यावर नोकरीच्या निमित्ताने सांगलीहून ठाण्यात आले आणि ठाण्यातच रमले. एका नावाजलेल्या मल्टिनॅशनल कंपनीत जवळपास १३वर्षे  शॉप फ्लोअर इंजिनीअरपासून प्रॉडक्शन मॅनेजर असा प्रवास केला. नंतर स्वतःची स्वयंपाकाची आवड आणि ज्ञान जोपासण्यासाठी, तसेच… Continue reading खवय्या : गुऱ्हाळ (भाग १)

मोरोपंत : ‘विबुधप्रिया, सवया रामायण’

बुद्धिमंतांना प्रिय असं विबुधप्रिया वृत्त.  यातही मोरोपंतांनी त्यांच्या भाषाप्रभुत्वातून रामकथा खुलवली आहे. मोरोपंत विबुधप्रिया वृत्ताला हरिनर्तन छंद म्हणतात. (गालगालल गालगालल गालगा)  गेयता असलेल्या या वृत्तातील प्रत्येक ओळीत एकेक घटना गुंफत मोरोपंतांनी  कथेला वेग दिला आहे. २६२/४/  शंभुच्या धनुचे, पळांत चि ओढितां   तुकडे करी जानकी, पणसिद्धि पाहुनि, हर्षुनि, प्रभुतें वरी,  दे  तिघांसि सुता तिघी, जनकासि… Continue reading मोरोपंत : ‘विबुधप्रिया, सवया रामायण’

चित्रओळी : लिहिण्याचे सामे असावे

भारतातील हस्तलिखित पोथ्यांचे विश्व इथल्या कलाविश्वासारखेच अथांग आहे. याच्या प्रारंभाबद्दल किंवा अवाक्याबद्दल आजवर बरेच संशोधन होत आले असले तरीसुद्धा या संबंधी बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत किंवा त्यांची उत्तरे नेमकेपणाने देता येत नाहीत. भारतातल्या उपलब्ध असलेल्या हस्तलिखित पोथ्यांची संख्या सुमारे पन्नास लाखांच्या घरात आहे, यावरूनही या क्षेत्राच्या आवाक्याचा काहीसा अंदाज येऊ शकतो. इंग्रजीमध्ये पोथी लिहणाऱ्याला ‘स्क्राइब’… Continue reading चित्रओळी : लिहिण्याचे सामे असावे

झुकझुक आगीनगाडी : लेख क्र. १९

पाहुणचार    मध्यरेल्वेच्या सोलापूर मंडळामध्ये अनेक धार्मिक व इतर पर्यटन स्थळे आहेत. उदा. शिर्डीचे साईबाबा, पंढरपूरचे श्रीविठ्ठल मंदिर, नळदुर्ग किल्ला व तेथील ‘नर-मादी’ धबधबा, तुळजापूर, गाणगापूर, भिगवणजवळील फ्लेमिंगो अभयारण्य, सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर, दत्त चौकातील चर्च, तसेच कलबुर्गी (गुलबर्गा) येथील मशीद आणि मंदिरे. ज्या वेळी एखाद्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी तपासणीसाठी येतात, त्या वेळी त्यांचे देवदर्शन आणि… Continue reading झुकझुक आगीनगाडी : लेख क्र. १९

पुस्तक परीक्षण : आशावाद जागवणाऱ्या… लढायला बळ देणाऱ्या… बाभळीच्या बाया!

साप्ताहिक साधनेत मागील वर्षी वनश्री वनकर यांची झरी-जामनीतील स्त्रिया ही लेखमाला अधूनमधून वाचत होतो. वाचलेला प्रत्येक लेख मनाचा ठाव घेत होता. काहीतरी सकस, अर्थपूर्ण, आशावादी लेखन हाती लागल्याचा आनंद मिळत होता. लेखावरच्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया ही लेखमाला नक्कीच गाजणार याची साक्ष देत होत्या. तेव्हापासून या लेखमालेचे लवकरच पुस्तक येणार आहे याचीही चाहूल लागली होती. त्यामुळे कधी… Continue reading पुस्तक परीक्षण : आशावाद जागवणाऱ्या… लढायला बळ देणाऱ्या… बाभळीच्या बाया!

कविता  : असाही पाऊस . . .

चित्रकार : सुनील काळे ओलेता मादक गंध पाऊस उधळीत आला जलधारा आठवणींच्या मज मनात भिजवीत गेल्या गारवा सुखाचा बरसे भिजती मातीची स्वप्ने सुखबीज रुजे त्या कायी   रुजती रुणझुणती कवने काळ्या मेघांच्या ओठी थेंबांच्या मौक्तिक माला वाऱ्या संगे आलेल्या ओंजळीत जरा साठवल्या जलधारा मुक्त बरसती डोंगर रांगांच्या भवती बेबंद होऊनी आल्या या कविता प्राणावरती Continue reading कविता  : असाही पाऊस . . .

मैत्र जीवाचें

उत्क्रांतीच्या ओघाकाठी वचन दिले उभयतां युगायुगांचे अतूट व्रत, हो दिग्विजयीं सांगता रानघऱ्यांचा गृहप्रवेश  कोंबडा आरवला. भैरू उठला. तोंड धुऊन त्याने न्याहारी केली. पारूने त्याला शिदोरी बांधून दिली. तोवर भैरूने बैलांना वैरणपाणी दिलं आणि त्यांना घेऊन तो शेताकडे निघाला. पारूने कपिलेला आणि शालू शेळीला चारा दिला. वासराला आणि कोकराला प्यायला सोडलं; मग दूध काढलं. मोत्या कुत्र्याला भाकरी… Continue reading मैत्र जीवाचें

तथ्यज पुस्तकांची शोधयात्रा

कार्ल सेगन यांची ‘कॉसमॉस’ ही मालिका नितांतसुंदर आहे. या मालिकेतील अनेक दृश्यं अविस्मरणीय आहेत. या मालिकेतील माझ्या मनावर प्रभाव पाडलेला एक प्रसंग आठवतो. या दृश्यात एक मोठं वाचनालय दाखवलं आहे. वाचनालयातील प्रत्येक मजल्यावर भिंतींलगत पुस्तकांनी गच्च भरलेली कपाटे ठेवलेली आहेत. कार्ल सेगन त्या पुस्तकांच्या कपाटांकडे निर्देश करून म्हणतात, ‘अशी कल्पना करा, की तुम्ही दर आठवड्याला… Continue reading तथ्यज पुस्तकांची शोधयात्रा

स्वागत :  ‘शरीराच्या कथा आणि व्यथा’

डॉ. सरोज व डॉ. नील सहस्रबुद्धे या मातापुत्रांच्या जोडीने ‘शरीराच्या कथा आणि व्यथा’या शीर्षकांतर्गत शरीरातील विविध संस्थांची माहिती पुस्तकरूपाने मराठीत प्रसिद्ध करायचा संकल्प सोडला आहे. या मालिकेतील ‘मानवी मज्जासंस्था’ यावरचे दुसरे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले. ही पुस्तके छापील व ई  अशा दोन्ही स्वरूपांत उपलब्ध आहेत. ई स्वरूपातील पुस्तक पूर्णपणे विनामूल्य आहे. शास्त्रीय ज्ञान मराठीत उपलब्ध… Continue reading स्वागत :  ‘शरीराच्या कथा आणि व्यथा’

प्रतिसाद : रविकिरण मंडळ

ई अंतर्नाद ऑगस्ट २६ मधला  अरुण कानेटकर यांचा रविकिरण मंडळावरील लेख  वाचला. मराठी साहित्याच्या इतिहासात काही चळवळींचे महत्त्व त्यांच्या तत्कालीन लोकप्रियतेपेक्षा त्यांनी पुढील साहित्याला दिलेल्या दिशेमुळे ठरते. रविकिरण मंडळ ही अशीच एक महत्त्वाची साहित्यिक घटना होती.  हा लेख या जुन्या काव्यपरंपरेकडे पुन्हा वळून पाहण्याची संधी देतो. लेखाची सुरुवातच कवी गिरीश यांच्या ‘मराठी नाट्यछटा’ या पुस्तकातील… Continue reading प्रतिसाद : रविकिरण मंडळ

महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

मार्गदर्शक : भानू काळे

 संपादक : अनिल जोशी

 व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी 

तंत्रसाहाय्य : मिहिर जोशी

Author

Leave a Reply