आंदोलन हस्तांचे व मनाचे 

एका स्नेहसंमेलनात मला एक ओळखीचा मुलगा भेटला.  “काय म्हणताय? किती दिवसांनी भेटतोय आपण!” असं म्हणत त्याने हात पुढे केला. मी त्याच्याशी हस्तांदोलन केलं. त्याच्या हाताची पकड अगदी सैल होती. तेवढ्यात माझा नवरा आला आणि त्या मुलाने त्याच्याशीही हस्तांदोलन केलं. या वेळी मात्र ती पकड अगदी घट्ट, आत्मविश्वासपूर्ण होती. तो फरक इतका स्पष्ट होता, की मला तो जवळजवळ विनोदी वाटला. दुसऱ्या वेळी मला याच्या अगदी उलट … Continue reading आंदोलन हस्तांचे व मनाचे 

नाट्यपरीक्षण : मढी

राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुनील सुकथनकर यांची मुख्य  भूमिका असलेल्या आणि अलीकडेच बघितलेल्या बारदोवीमधल्या चित्तरंजन गिरी यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘मढी’बद्दल कळलं तेव्हा ते नक्की बघायचं हे ठरलेलंच होतं. तिकीट काढताना तिकीट खिडकीच्या संकेतस्थळावर ‘a wordless play’ (शब्दहीन नाटक) असं वाचल्यामुळे खूप उत्सुकता आणि त्याचबरोबर ‘आपल्याला समजेल का?’ अशी शंकाही मनात निर्माण झाली होती.    “वाराणसीमध्ये गंगा नदीच्या काठावर झोपडीसारख्या अनेक वास्तू बांधलेल्या आहेत. त्यांना मढी म्हणतात. … Continue reading नाट्यपरीक्षण : मढी