चित्रओळी : लिहिण्याचे सामे असावे
भारतातील हस्तलिखित पोथ्यांचे विश्व इथल्या कलाविश्वासारखेच अथांग आहे. याच्या प्रारंभाबद्दल किंवा अवाक्याबद्दल आजवर बरेच संशोधन होत आले असले तरीसुद्धा या संबंधी बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत किंवा त्यांची उत्तरे नेमकेपणाने देता येत नाहीत. भारतातल्या उपलब्ध असलेल्या हस्तलिखित पोथ्यांची संख्या सुमारे पन्नास लाखांच्या घरात आहे, यावरूनही या क्षेत्राच्या आवाक्याचा काहीसा अंदाज येऊ शकतो. इंग्रजीमध्ये पोथी लिहणाऱ्याला ‘स्क्राइब’ असे नाव आहे. याची व्युत्पत्ती पाहता, कोरणारा किंवा खरवडणारा असा … Continue reading चित्रओळी : लिहिण्याचे सामे असावे
