एक नाटक, दोन दृष्टिकोण  : एका नटाचा मृत्यू

 महेश एलकुंचवार यांनी लिहिलेला ‘एका नटाचा मृत्यू’ हा एकल प्रयोग पाहिला. हा दीर्घांक मी अलीकडेच वाचला होता. मुळात मी फारशा नाट्यसंहिता वाचल्या नसल्यामुळे संहिता वाचणं आणि लगेच तिचा रंगमंचावरील प्रयोग पाहणं, हा अनुभवही माझ्यासाठी जवळजवळ पहिलाच होता. ही संहिता वाचताना एलकुंचवारांनी रंगमंच, प्रकाशयोजना, संगीत आणि अभिनेत्याच्या प्रत्येक हालचालीचं केलेलं सूक्ष्म आणि तपशीलवार वर्णन विशेष लक्ष वेधून घेत होतं. वाचतानाच नाटक डोळ्यांसमोर उभं राहत होतं. त्यामुळे … Continue reading एक नाटक, दोन दृष्टिकोण  : एका नटाचा मृत्यू

कविता  : असाही पाऊस . . .

चित्रकार : सुनील काळे ओलेता मादक गंध पाऊस उधळीत आला जलधारा आठवणींच्या मज मनात भिजवीत गेल्या गारवा सुखाचा बरसे भिजती मातीची स्वप्ने सुखबीज रुजे त्या कायी   रुजती रुणझुणती कवने काळ्या मेघांच्या ओठी थेंबांच्या मौक्तिक माला वाऱ्या संगे आलेल्या ओंजळीत जरा साठवल्या जलधारा मुक्त बरसती डोंगर रांगांच्या भवती बेबंद होऊनी आल्या या कविता प्राणावरती Continue reading कविता  : असाही पाऊस . . .

खवय्या : गुऱ्हाळ (भाग १)

या अंकापासून सागर वामन दामले यांच्यासोबत एक खाद्यसफर  सुरु करत आहोत.  लेखक सागर वामन दामले हे शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर आहेत. २००५ साली, पदव्युत्तर परीक्षा झाल्यावर नोकरीच्या निमित्ताने सांगलीहून ठाण्यात आले आणि ठाण्यातच रमले. एका नावाजलेल्या मल्टिनॅशनल कंपनीत जवळपास १३वर्षे  शॉप फ्लोअर इंजिनीअरपासून प्रॉडक्शन मॅनेजर असा प्रवास केला. नंतर स्वतःची स्वयंपाकाची आवड आणि ज्ञान जोपासण्यासाठी, तसेच विस्मृतीत गेलेले मराठी पदार्थ पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांनी ‘मुक्तछंद किचन’ नावाचे … Continue reading खवय्या : गुऱ्हाळ (भाग १)

ज्ञानपीठ पुरस्कार लेख क्र. ८

वि. वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’: मराठी साहित्यातील ध्रुवतारा     १९७४ मध्ये वि. स. खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मराठी मानकरी ठरले. त्यानंतर एक तप उलटून गेल्यावर १९८७ साठी कुसुमाग्रजांना हा पुरस्कार जेव्हा जाहीर झाला तेव्हा समीक्षक आणि सर्वसाधारण वाचक, सर्वांनाच या निर्णयाचा आनंद झाला. विशेष म्हणजे खांडेकरांना हा पुरस्कार मिळाला त्या वेळी कुसुमाग्रज या सन्मानास पात्र असल्याचे उद्गार त्यांनी काढले होते. २७ फेब्रुवारी १९१२ रोजी गजानन … Continue reading ज्ञानपीठ पुरस्कार लेख क्र. ८

झुकझुक आगीनगाडी : लेख क्र. १९

पाहुणचार    मध्यरेल्वेच्या सोलापूर मंडळामध्ये अनेक धार्मिक व इतर पर्यटन स्थळे आहेत. उदा. शिर्डीचे साईबाबा, पंढरपूरचे श्रीविठ्ठल मंदिर, नळदुर्ग किल्ला व तेथील ‘नर-मादी’ धबधबा, तुळजापूर, गाणगापूर, भिगवणजवळील फ्लेमिंगो अभयारण्य, सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर, दत्त चौकातील चर्च, तसेच कलबुर्गी (गुलबर्गा) येथील मशीद आणि मंदिरे. ज्या वेळी एखाद्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी तपासणीसाठी येतात, त्या वेळी त्यांचे देवदर्शन आणि त्यातही फुकटचे व्ही.आय.पी. दर्शन व त्यांची सरबराई करणे म्हणजे सोलापूरमधील … Continue reading झुकझुक आगीनगाडी : लेख क्र. १९

संपादकीय : अमेरिका प्रवास — भाग १ :  उड्डाण

  नुकत्याच केलेल्या अमेरिका प्रवासाच्या निमित्ताने … भारतातून अमेरिकेत केलेला प्रवास हे   नुसते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नसते. त्याला अनेक सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आयाम असतात. याबाबतची निरीक्षणे क्रमशः … अमेरिकेला जाण्यापूर्वी खूप पूर्वतयारी करावी लागते. विमान प्रवासाचे नियोजन हा त्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग असतो. पुरेसे आधी नियोजनबद्ध बुकिंग केल्यास विमानाची तिकिटे स्वस्त मिळू शकतात. भारतातून अमेरिकेला जाण्यासाठीच्या प्रवासाचे तीन पर्याय उपलब्ध असतात : … Continue reading संपादकीय : अमेरिका प्रवास — भाग १ :  उड्डाण

चित्रओळी : लिहिण्याचे सामे असावे

भारतातील हस्तलिखित पोथ्यांचे विश्व इथल्या कलाविश्वासारखेच अथांग आहे. याच्या प्रारंभाबद्दल किंवा अवाक्याबद्दल आजवर बरेच संशोधन होत आले असले तरीसुद्धा या संबंधी बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत किंवा त्यांची उत्तरे नेमकेपणाने देता येत नाहीत. भारतातल्या उपलब्ध असलेल्या हस्तलिखित पोथ्यांची संख्या सुमारे पन्नास लाखांच्या घरात आहे, यावरूनही या क्षेत्राच्या आवाक्याचा काहीसा अंदाज येऊ शकतो. इंग्रजीमध्ये पोथी लिहणाऱ्याला ‘स्क्राइब’ असे नाव आहे. याची व्युत्पत्ती पाहता, कोरणारा किंवा खरवडणारा असा … Continue reading चित्रओळी : लिहिण्याचे सामे असावे

यास्मिन शेख : चिरतरुण भाषायोगिनी

  ‘मूर्तिमंत मराठीप्रेम’ या दोन शब्दांत ज्यांचे अवघे जीवन सामावलेले होते त्या यास्मिन शेख यांनी  सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता वयाच्या एकशेएकाव्या वर्षी पुण्यात शेवटचा श्वास घेतला. वयाचा विचार करता अनपेक्षित नसले तरी त्यांचे निधन हे जिवाला चटका लावणारे होते. त्याच दिवशी दुपारी तीन वाजता बाणेर येथील विद्युतदाहिनीत जेव्हा त्यांचा देह शेवटचा दृष्टीआड झाला तेव्हा एक विलक्षण रितेपण मनात दाटून आले. कसेबसे स्वतःला आवरत, … Continue reading यास्मिन शेख : चिरतरुण भाषायोगिनी

चीन आणि रवींद्रनाथ : एका अनुबंधाचा शोध

  डावीकडून उजवीकडे :  विनोद शिरसाठ, सतीश बागल, भानू काळे, नीती बडवे व सानिया कर्णिक.  रविवार, १९ जुलै २०२६. पुण्यातील एस एम जोशी सोशालिस्ट फौंडेशनचे सभागृह. संध्याकाळी सहाची वेळ. बरीच गर्दी जमली होती. निमित्त होते ‘चीन भेटीतील भाषणे’ या सानिया कर्णिक यांनी अनुवादिद केलेल्या आणि साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन. मराठी वाचकांची संख्या घटत चालली आहे असे अलीकडे नेहमीच म्हटले जाते पण तसे जरी असले … Continue reading चीन आणि रवींद्रनाथ : एका अनुबंधाचा शोध