ऑगस्ट २०२६

संपादकीय : मुंबई..

 खरे सांगायचे झाले तर मला मुंबईला जाणं अजिबातच आवडत नाही. तिथली ती चिकट, दमट हवा, गर्दी, आवाज, ट्रॅफिक यांची एक भीती मनात बसली आहे. त्यामुळे मुंबईत काही काम निघाले, की ते टाळायचे किंवा इतरांच्याकडून करून घ्यायचं अशी रणनीती मी करतो. परंतु या वेळी त्यातलं काहीच करता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे हा प्रवास जास्तीत जास्त नियोजनबद्धरित्या… Continue reading संपादकीय : मुंबई..

रविकिरण मंडळाची कविता

‘How many are you then, said I, if they two are in heaven? Quick was the little maid’s reply, oh master! We are seven.’ ‘मराठी नाट्यछटा’ या छोटेखानी पुस्तकाच्या प्रारंभी कवी गिरीश यांनी  उद्धृत केलेल्या या ओळी रविकिरण मंडळाच्या सदस्यांची स्मृती जागवतात. त्यांनी अर्पणपत्रिकेत लिहिलंय, ‘या करुण सुंदर ओळींची यथार्थ  स्मृति करून देणाऱ्या माझ्या प्रिय… Continue reading रविकिरण मंडळाची कविता

ज्ञानपीठ पुरस्कार लेख ७

महादेवी वर्मा : विसाव्या शतकातील सर्वाधिक प्रभावशाली हिंदी लेखिका १९८१ मध्ये अमृता प्रीतम यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कारानंतर पुढल्याच वर्षी तो सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिका महादेवी वर्मा यांना मिळावा ही गोष्ट दोन कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरते : एक म्हणजे स्त्रीलेखिकांना हा पुरस्कार लागोपाठ दोन वर्षी मिळणे आणि दुसरे म्हणजे  अमृता प्रीतम यांनीदेखील हिंदीमध्ये विपुल प्रमाणात लिहिले आहे.  हिंदी… Continue reading ज्ञानपीठ पुरस्कार लेख ७

‘उपासमारीचा कलाकार’ काफ्काची ‘सत्यकथा’      

प्रत्येक कलेला इतिहास असतो. युरोपीय ललितकलेला – म्हणजे लघुकथा, नाटक, कादंबरी वगैरे कलाकृतींनासुद्धा इतिहास आहे. हा नुसता साहित्याचा इतिहास नसून सांस्कृतिक, सामाजिक  -राजकीय, असे अनेक पदर त्याला असतात.‘हंगर आर्टिस्ट’ ही काफ्काची महत्त्वाची कथा; कारण ‘माझे सगळे साहित्य जाळून टाक पण काही कथा जाळू नको’ असे काफ्काने त्याचा मित्र मॅक्स ब्रॉडला सांगितले होते. ललितकृतीतील ‘हंगर आर्टिस्ट’… Continue reading ‘उपासमारीचा कलाकार’ काफ्काची ‘सत्यकथा’      

पुनरपि जननं : १८

अर्चना मिरजकर यांनी लिहिलेली  ‘All the way… Home’ ही इंग्रजी कादंबरी दिल्लीतील लिफी प्रकाशनाने २०१९ मध्ये प्रकाशित केली. त्या वर्षी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात, बनारस हिंदू विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विज्ञानकथा संमेलनात आणि कॅनडाच्या राजदूतांच्या आवासात या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ झाले.  ज्या वैज्ञानिक ‘कल्पनेवर’ हे कथासूत्र बेतलेले आहे त्याचे स्वरूप असे : हव्यासापोटी एकमेकांशी लढाया… Continue reading पुनरपि जननं : १८

मोरोपंत – भाग ४

दोहा रामायण ही मोरोपंतांची आणखी एक कलाकृती.  दोह्यासंबंधी थोडी माहिती देते.  दोहा हा अर्धसम  मात्रिक छंद आहे. यात दोन ओळींत चार चरण असतात. पहिल्या आणि तिसऱ्या चरणात १३ मात्रा आणि दुसऱ्या आणि चौथ्या चरणात ११ मात्रा असतात.  विषम चरणाच्या सुरुवातीला ‘ज’गण (लघू-गुरू-लघू) नसावा असा संकेत आहे.( मात्र याला काही अपवाद आहेत.)  शेवटची अक्षरे : समचरणातील… Continue reading मोरोपंत – भाग ४

चित्रओळी : चित्रमय पोथ्या भाग २

महाराष्ट्रातल्या चित्रमय पोथ्यांबाबत पहिल्या भागात आपण जाणून घेतले. नागपूर भागातल्या पोथ्यांचे थोडक्यात रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला. नागपूर भागातल्या या परंपरेतील अत्युच्च शिखर म्हणता येईल असे काम म्हणजे, ज्ञानेश्वरीची ‘नारायण’ या सुलेखनकाराने बनवलेली हस्तलिखित चित्रमय प्रत. ही प्रत बऱ्याच अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या प्रतीचा आकार १४” x १०” असा आहे. पोथ्यांच्या रूढ आकारापेक्षा हा खूप मोठा… Continue reading चित्रओळी : चित्रमय पोथ्या भाग २

झुकझुक आगीनगाडी :१८  

मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडल (कार्यक्षेत्र : वाडी—ते दौंड, दौंड ते मनमाड, लातूर ते कूर्डवाडी ते मिरज) मध्ये अतिवेगाने खूपच सुधारणा  होत होत्या आणि त्यासुद्धा माझ्या कार्यकाळातच होत होत्या. त्यामुळे मी जास्तच तंत्रस्नेही होऊ लागलो. आम्हां इंजीनियर लोकांना Android सारखे कायम अपडेट राहवेच लागते. “बदला, नाहीतर नष्ट व्हा!” ‘मला माहीत नाही, येत नाही’ अशा सबबी  अजिबात … Continue reading झुकझुक आगीनगाडी :१८  

अतुलनीय मोहिमेचा श्रीगणेशा : 2

मराठी समानार्थ लघु शब्दकोश : खंड एक – प्राणिजगत संपादक : सुहास अनंत रानडे ….. मराठी भाषेला ‘अभिजात’ असा दर्जा मिळून एक वर्ष उलटून गेले; मात्र, यातून काय काय करायचे, याचा काहीही आराखडा अद्याप अमलात आलेला नाही. मराठी साहित्य आणि संस्कृती विषयक, भाषा, कोश किंवा इतरही आनुषंगिक कामे करणारी मंडळे, विभाग महाराष्ट्रात आहेत. राज्यात साहित्य… Continue reading अतुलनीय मोहिमेचा श्रीगणेशा : 2

पुस्तक परिचय : यांना जीवन कळले हो

   मी माझ्या सवयीप्रमाणे एकाच वेळी दोन तीन पुस्तके वाचत होतो. डॉ.अभिजित वैद्य यांचे जगभरातल्या १५० पेक्षा अधिक तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, विवेकवादी यांच्यावरचे  अप्रतिम असे ‘विवेकयात्री’ हे पुस्तक वाचाताना विश्वाच्या रहस्याचा शोध घेऊ पाहणाऱ्या या विवेकयात्रींच्या प्रयासाने थक्क होऊन जात होतो, तर दुसरीकडे माझ्या टेबलावर पडलेल्या पुस्तकातील एकाच कुटुंबातील असे डझनभर सात्त्विक आणि तात्त्विक सातारीपेढे नव्हे –… Continue reading पुस्तक परिचय : यांना जीवन कळले हो

चीन आणि रवींद्रनाथ : एका अनुबंधाचा शोध

  डावीकडून उजवीकडे :  विनोद शिरसाठ, सतीश बागल, भानू काळे, नीती बडवे व सानिया कर्णिक.  रविवार, १९ जुलै २०२६. पुण्यातील एस एम जोशी सोशालिस्ट फौंडेशनचे सभागृह. संध्याकाळी सहाची वेळ. बरीच गर्दी जमली होती. निमित्त होते ‘चीन भेटीतील भाषणे’ या सानिया कर्णिक यांनी अनुवादिद केलेल्या आणि साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन. मराठी वाचकांची संख्या घटत चालली… Continue reading चीन आणि रवींद्रनाथ : एका अनुबंधाचा शोध

महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

मार्गदर्शक : भानू काळे

 संपादक : अनिल जोशी

 व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी 

तंत्रसाहाय्य : मिहिर जोशी

Author

2 thoughts on “ऑगस्ट २०२६

  1. नमस्ते. मुंबईच्या तुमच्या ह्या प्रवासात मला धाकधूक होती की ह्यांच्यांशी आत्ता काही होईल🤔। पण हुश्श ! आपण सुखरूपपणे प्रवास केला. देवाने 🙏आमची अर्थातच गुजरातची लाज राखली 😀

    अजून संपादकीय वाचलेत, पुढे सावकाश.
    अरुणा जाडेजा

Leave a Reply