कविता: चांदरात… भर दिवसाची.

काळ्याशार म्हशींचा रस्ता ओलांडत चाललेला तांडा.

मागे तंबाखू मळत जगावर थुंकणारा त्यांचा राखणदार.

दोन्ही बाजूला लागलेल्या वाहनांच्या रांगा.

वाहनांचा व त्यांच्या मालकांचा वांझोटा कोलाहल. 

रस्ता दुभाजकाच्या दोन्ही बाजूला छाटणी करून टाकलेल्या फांद्या.

उघडे पडलेले झेंडे व बोडका झालेला रस्ता.

रस्त्याकडेच्या मद्यालयासमोरचा  तो तळीरामांचा जथा 

उलट्या दिशेने धूळ उडवीत येणाऱ्या त्यांच्या बेदरकार गाड्या.

आपल्या महान नैतिक सामर्थ्याने हे सर्व सहन करत मार्गक्रमण करणारे आबालवृद्धांचे तांडे. 

परिस्थितीवर नजर ठेवून असलेले सर्व मान्यवरांचे पुतळे.

वाऱ्यावर तरंगणारा तो कागदाचा कपटा व त्यावरचे ते चंद्रयान.

Author

Leave a Reply