दिवाळी शुभेच्छा !! 

रांगोळी रेखाटन व छायाचित्र : शुभांगी जोशी 

आनंदाची दिवाळी | घरी बोलवा वनमाळी | घालीते मी रांगोळी | गोविंद गोविंद ॥धृ॥

घरी आले देव | त्यांच्या चरणी ठेवा भाव | मुखी म्हणा रामशिव | होईल आनंद ॥१॥

सर्व साक्षी ईश्वर | त्याला करी नमस्कार | करोनिया मन स्थिर | आनंदी आनंद ॥२॥|

दासी नामयाची जनी | करीतसे विनवणी | म्हणा रात्रंदिवस मनी | गोविंद गोविंद ॥३॥

Author

Leave a Reply