गावोगाव…

  गाव    आभाळ जिथे घन गर्जे     ते गाव मनाशी निजले.     अंधार भिजे धारांनी     घर एक शिवेवर पडले…    अन् पाणवठ्याच्या पाशी    खचलेला एकट वाडा    मोकाट कुणाचा तेथे    कधी हिंडत असतो घोडा…    झाडातून दाट वडाच्या    कावळा कधीतरी उडतो.    पारावर पडला साधू    हलकेच कुशीवर वळतो…    गावातिंल लोक शहाणे    कौलांवर जीव पसरती     पाऊस परतण्याआधी     क्षितिजेच धुळीने मळती…                       कवी ग्रेस  वय उतरणीला लागलं की बालपण आवतीतीभोवती फेर धरू लागतं की … Continue reading गावोगाव…

कविता : जून  २०२५

बडिवार  निसटोनि गेली  ठाय लय आता कोलाहल सारा  माजलेला किती किती पाहू  वेचू किती ज्ञान अडकले मन  याच्यातच पाहिजे पाहिजे मनाला हव्यास लोभाच्या समुद्री  गटांगळ्या आरोग्याचा पोकळ  बडिवार मोठा जेवणाचा रस  हरवला उदंड उदंड  कुंभमेळी गर्दी मनातली रांगोळी  पुसलेली. उषा कुर्डूकर  Continue reading कविता : जून  २०२५

कवितेचे पान : अघटितांचं घटित

जग अनेक अनाकलनीय घटितांनी, अक्रितांनी भरलेलं आहे यावर माझा लहानपणापासून विश्वास आहे.उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या की मुक्ततेच्या आनंदाच्या हातात हात घालून आणखी एक आनंद यायचा तो म्हणजे आजी आजोबांकडून किस्से कहाण्या ऐकण्याचा. याची तयारी संध्याकाळपासूनच होई. तुळशीच्या अंगणात भरपूर पाणी टाकायचं. तापलेलं अंगण निवलं की बाजा टाकायच्या. गाद्याबिद्या पद्धतशीर घालून आम्ही अधीरपणे आजोबांची वाट पाहायचो… मग सुरू व्हायचा गप्पा, किस्से यांचा दौर! रात्री डोळ्यांवर झोप उतरेपर्यंत … Continue reading कवितेचे पान : अघटितांचं घटित

कवितेचे पान  २

अपूर्ण – पूर्ण   गावाकडे शेती पण कामासाठी वास्तव्य मात्र पुण्यात असणारा गणेश काही दिवसांपूर्वी भेटायला आला होता. गप्पा चालल्या होत्या. हुरड्याचा विषय निघाला. आगटीत भाजलेला कोवळा लुसलुशीत हुरडा, हुरड्यासोबत खायच्या  चटण्या, दही, दही ओरपायला ज्वारीच्या कणसांचेच बनवलेले छोटे छोटे गुच्छ… रंगात येऊन आम्ही बोलत होतो, आठवणी जागवत होतो. अचानक काहीशा धारदार, कडवट स्वरात गणेश म्हणाला… “उषाताई, गेल्या सत्तावीस वर्षांत मी हुरडा खाल्लेला नाही.” आम्ही सगळेच … Continue reading कवितेचे पान  २

कवितेचं एक पान : खोलवर रुतणारा उद्गार – विराणी 

‘विराणी’ हा शब्द वाचला की संत ज्ञानेश्वर आठवतात… मीराबाई आठवते… लता मंगेशकर आठवतात… मग आठवतो त्यातील विरहिणीचा आर्त, व्याकूळ भाव. मन कातर कातर होतं; तरी कुठेतरी उदात्त असं, अलौकिक असं काही उरात दाटूनही येतं. पण कवी अनिलांची ‘विराणी’ वाचली –  मन खिन्न, उदास उदास होऊन गेलं. अनिलांच्या या विराणीत मिलनाची आस जागवणारी विरहवेदना नाही; तर उजाड, वैराण आयुष्यातला घट्ट दाट काळोख आहे. माणसाचं स्वत्व शोषून … Continue reading कवितेचं एक पान : खोलवर रुतणारा उद्गार – विराणी 

जगणं समृद्ध करणारी ‘माती माय…’ जनाबाई

परभणीहून मुंबईला जाण्यासाठी स्टेशनवर पोहोचले तर गाडी लेट झालेली. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं म्हणून जरा निवांतशी बसले होते. तेवढ्यात  शेजारी कोणी  मायलेकी येऊन बसल्या. लेक अगदी पोरसवदा. बोलक्या डोळ्यांची.  सुंदर, चमकदार, लांबसडक केसांचं ऐश्वर्य घेऊन आलेली. मुंबईला शिकायला निघालेल्या लेकीत  आईचा जीव  अडकलेला; त्यातही लेकीच्या मऊसूत केसांमध्ये तर अधिकच अडकलेला. माय परोपरीने स्वतःची आणि केसांची आबाळ करू नकोस असं बजावतेय. ‘वेळेवर नहात जा, तेल लावत … Continue reading जगणं समृद्ध करणारी ‘माती माय…’ जनाबाई

चिमा

सांबाराव, तुम्हांला ढोरं राखायला गुरखी पाहिजे होता नव्हं? ह्यो बघा ह्यो पोरगा. चुनचुनीत हाय. कामं बी आक्शी चटाचटा करतंय पोरगं. घ्या ठिऊन याला. कोंडराव मामाच्या बोलण्याचा विचार करत सांबारावांनी ८/९ वर्षांच्या त्या काळ्या-सावळ्या मुलाकडे निरखून पाहिलं. पोरगं काटक होतं. नजर स्वच्छ होती.  “काय नाव रे तुझं?”  “चिमा,” मुलाने उत्तर दिलं. सांबारावांना मुलगा आवडला. ठेवून घेतला.     सांबराव पुराणिक माझे आजोबा. शंभर दीडशे एकरांचे मालक. गावावर … Continue reading चिमा