कविता : जून  २०२५

बडिवार 

निसटोनि गेली 

ठाय लय आता

कोलाहल सारा 

माजलेला

किती किती पाहू 

वेचू किती ज्ञान

अडकले मन 

याच्यातच

पाहिजे पाहिजे

मनाला हव्यास

लोभाच्या समुद्री 

गटांगळ्या

आरोग्याचा पोकळ 

बडिवार मोठा

जेवणाचा रस 

हरवला

उदंड उदंड 

कुंभमेळी गर्दी

मनातली रांगोळी 

पुसलेली.

उषा कुर्डूकर 

Author

Leave a Reply