कामशेत- ४ … १९९३

 इथे आता बरेच साप आणि विंचू चावल्याचे रुग्ण येताहेत. चाव्याचे  ठिकाण बधिर करण्याचे झायलोकेन नावाचे औषध असते. (दात काढताना हेच इंजेक्शन देतात.) विंचू चावलेल्या ठिकाणी वरचेवर त्वचेखाली ते द्यायचे म्हणजे वेदना कमी होत जातात; पण साप चावला तर तसे नसते. विषारी/ बिनविषारी असं  ठरवून मग  साप विषारी असला तर त्याची लस द्यावी लागते; पण साप  विषारी आहे का नाही हे नक्की समजणे अवघड आणि कळीचा … Continue reading कामशेत- ४ … १९९३

कामशेत ३

वैद्यक शास्त्रातील पदवी मिळाल्यानंतर(MBBS) ग्रामीण व शहरी भागातील सरकारी दवाखान्यांमध्ये एक वर्ष सेवा द्यावी लागते. अशा सेवेची सुरुवात करताना एका नवशिक्याला आलेले हे अनुभव –  संपादक.      कामशेत न सोडता राहायचा महिना झाला.  पगार झाला. दोनशे रुपये उधारी चुकवली – परत हजार रुपयेच उरले. कसं  जमवावं आता? एवढ्यात एक मित्र असाच भेटायला आला. तो आता मेडिसीनमध्ये पदव्युत्तर  शिकणार  होता. त्या खुशीत तो खास भेटायलाच आला, तेही … Continue reading कामशेत ३

कामशेत  (२)

वैद्यक शास्त्रातील पदवी मिळाल्यानंतर(MBBS) ग्रामीण व शहरी भागातील सरकारी दवाखान्यांमध्ये एक वर्ष सेवा द्यावी लागते. अशा सेवेची सुरुवात करताना एका नवशिक्याला आलेले हे अनुभव –  संपादक.  शेवटी सवय झालीये म्हणायचं इथली! रेल्वेलाइनच्या दोन बाजूला रांगेत पसरलेलं हे गाव – छोटी छोटी घरं, बाजारपेठ, थोडी दूरवर असलेली धनिकांची फार्महाउसेस आणि चिक्कार रासवटपणा! लोकलच्या वेळा सोडल्या तर निपचित असे हे गाव. इथे डोसा चटणी नाही, पोहे,उप्पीट वगैरे … Continue reading कामशेत  (२)

कामशेत   भाग १     

इसवी सन  – १९९३  वैद्यक शास्त्रातील पदवी मिळाल्यानंतर(MBBS) ग्रामीण व शहरी भागातील सरकारी दवाखान्यांमध्ये एक वर्ष सेवा द्यावी लागते. अशा सेवेची सुरुवात करताना एका नवशिक्याला आलेले हे अनुभव –  संपादक.    कामशेतपासून टमटम अथवा बसेस पकडून अंदरमावळ म्हणतात अशा दुर्गम भागात जावं लागतं. छोटी छोटी खेडी, वस्त्या आणि सर्वत्र हिरवंगार असलेला परिसर, अध्येमध्ये  इंद्रायणीचं होणारं दर्शन आणि इंद्रायणीच्याच नावाच्या  आणि आंबेमोहर भाताच्या  पिकाचा दरवळ . कामशेतला … Continue reading कामशेत   भाग १