मुखपृष्ठाविषयी : ऑक्टोबर २०२४
मुखपृष्ठाविषयी : ऑक्टोबर २०२४ या वेळचे मुखपृष्ठ कलाकार आहेत पुन्हा एकदा दत्तात्रेय फडके. यापूर्वी त्यांच्या कलेचा आविष्कार आपण नोव्हेंबर २०२३ च्या मुखपृष्ठाच्या स्वरूपात पाहिला आहे. व्यवसायाने ते शरीरविकृतिशास्त्रज्ञ (पॅथॉलॉजिस्ट) आहेत. सूक्ष्मदर्शी यंत्राखाली वेगवेगळे आकार पाहणे, त्यांच्यातील रंगसंगती पाहणे व त्यातून निदान करणे हे या शास्त्राचे वैशिष्ट्य आहे. फडक्यांची नजर सूक्ष्मदर्शी… Continue reading मुखपृष्ठाविषयी : ऑक्टोबर २०२४
संपादकीय : स्वप्न ते वास्तव
पुद्दुचेरीची ही दुसरी भेट. पुद्दुचेरीपेक्षा पॉंडिचेरी हा शब्द अजूनही थोडासा जवळचा वाटतो. आमच्या शालेय पुस्तकांत तो शब्द असाच लिहिला जायचा हेच त्याचे प्रबळ कारण असावे. एक केंद्रशासित प्रदेश आणि योगी अरविंद व माताजी यांच्याशी निगडित हा प्रदेश. अरविंदांविषयी विशेष कुतूहल असण्याची विविध कारणे आहेत. घोडेस्वारीची परीक्षा न दिल्यामुळे त्यांचे अपूर्ण… Continue reading संपादकीय : स्वप्न ते वास्तव
आयआयटीची ज्ञानगंगा आणि ब्रेनड्रेन
हल्ली बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मराठी माणसे परदेशी जात असतात. प्रवासी कंपन्यांच्या मोठमोठ्या जाहिरातींवरून ते लगेचच लक्षात येते. ते स्वागतार्हच आहे; पण आपला मायदेश तरी त्यांतील किती जणांनी डोळसपणे बघितला असतो? ती उणीव लक्षात घेऊन ‘अंतर्नाद’कार भानू काळे सध्या भारतातील वेगवेगळ्या प्रांतांत प्रवास करत आहेत. त्यांतील तमिळनाडूप्रवासावर आधारित दोन लेख आम्ही… Continue reading आयआयटीची ज्ञानगंगा आणि ब्रेनड्रेन
प्रश्नोपनिषद : ऑक्टोबर २०२४
मंडळी, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू. त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा. या वेळच्या प्रश्नाची थोडीशी पार्श्वभूमी अशी : सध्या जग दोन युद्धांच्या गर्तेत सापडले आहे. युक्रेन आणि गाझा येथे जे काही चालले आहे ते आपण हताशपणे पाहण्याशिवाय काही करू शकत नाही. नुकतीच वैशाली करमरकर… Continue reading प्रश्नोपनिषद : ऑक्टोबर २०२४
कविता : विनाशक काली
झणझणा झोंबरा वारा थरथरते अंबर सारे चराचर कापती धारा जग गिळले अंधकारे || गडगडा गरजती मेघ दिक्काल चिरडण्या येती कडकडा कोसळे लोळ भयकंपित सारी सृष्टी || उसळते रक्तिम पाणी वेढते वाढत्या वेगे स्थिर जे उच्च ठिकाणी दशदिशा फेकले गेले || जल निर्मल जीवनदायी रसरसती, फुलती वेली स्वमग्न कृद्ध तांडवी बनतसे… Continue reading कविता : विनाशक काली
पुनर्भेट नॅशनल पार्कची ११
भाद्रपदातील आठवणी श्रावण संपला आणि भाद्रपदातील उबदार उन्हं पडू लागली. या उन्हात उद्यानात जिकडे तिकडे फुलपाखरं भिरभिरू लागली. ऑफिससमोरच्या नीलकंठीच्या झुडपावर पिवळ्या रंगाची फुलपाखरं येऊ लागली. नीलकंठीचं झुडूप साधारण तीन ते चार फुटांचं असतं. नीलकंठीच्या आठ ते दहा सें.मी. लांबीच्या दांडीवर साधारण तीन सें.मी. अंतरावर एक ते दोन सें.मी.… Continue reading पुनर्भेट नॅशनल पार्कची ११
बेंगलोर डायरी १२
लग्न करून पंधरा वर्षांपूर्वी मी बेंगलोरमध्ये आले तेव्हा कन्नड आडनाव सोडले तर माझा आणि कन्नडचा काहीच संबंध नव्हता. हे शहर किती मोठे आहे याची जाणीव ही नव्हती. भरपूर तलाव, हिरवळ असलेले हे गाव मला आवडले होते. आम्ही राहतो तो भाग उपनगर आहे – खरे बेंगलोर नाही हेही माहीत होते; पण… Continue reading बेंगलोर डायरी १२
संत,पंत,तंत काव्यविषयक लेखमाला (११)
कवी विठ्ठल कविता स्फुरते कशी याचे दोन प्रवाह कविमनाला जाणवतात. मनातल्या भावनांचा उद्रेक होऊन अंतरातून बाहेर आलेली भावगर्भ कविता आणि दुसरी बाहेरच्या परिस्थितीचा मनावर परिणाम होऊन बाहेरून आत आलेली कविता. संतकाव्य हे अंतरीच्या उमाळ्यातून ‘अंतरीचे धावे स्वभावें बाहेरी’ या प्रकारातलं. परमेश्वर हाच संतकाव्यरचनेचा विषय होता त्यामुळे कविता भक्तिसंकल्पनेभोवतीच फिरत होती. … Continue reading संत,पंत,तंत काव्यविषयक लेखमाला (११)
रद्दीतील रत्ने भाग ६ : भारतीय ज्यू समाज
मलिद्याचे ताट नैवेद्य म्हणून दाखवताना एलियाज दांडेकर मराठी ज्यू कीर्तनकार भारतीय ज्यू समाज नागपूरहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘हितवाद’ या वर्तमानपत्रात दिनांक १ डिसेंबर २००२ रोजी प्रसिद्ध झालेला ‘बेने इस्रायल इन महाराष्ट्र’ हा लेख व ‘आपले जग’ या पाक्षिकात नोहा मस्सील या मराठी भाषक बेने इस्रायली लेखकाने लिहिलेला लेख व इतर स्रोतांच्या… Continue reading रद्दीतील रत्ने भाग ६ : भारतीय ज्यू समाज
पुस्तकपरीक्षण
मरण स्वस्त होत आहे – लेखक बाबुराव बागुल इंग्रजी अनुवाद : लुटालूट – अनुवादक मानव कांबळी प्रकाशक – हॅचेट इंडिया १७८ पाने किंमत – रु. ४९९ किंडल – रु. १७७ बाबुराव बागुल यांची पहिली कथा १९५७ साली आचार्य अत्रेंच्या नवयुग या नियतकालिकातून प्रसिद्ध झाली; नंतर १९६३ साली प्रसिद्ध झालेल्या ‘जेव्हा मी… Continue reading पुस्तकपरीक्षण
मागे उभा
वैकुंठेश्वराला गेलेली मंडळी पांगली. पैठणकर प्रकाशला घेऊन निघाले; बरोबर आणखी चार जण होते. पावसात सगळे भिजलेले. जिना चढून वर आले. बाहेरच्या खोलीत सतरंजी घातलेली. सगळे बसले. आतून कोणीतरी चहा आणला. प्रकाश खचून गेलेला. अकस्मात उद्भवलेल्या परिस्थितीनं तो गांगरून गेलेला. आपलं आता होणार कसं? हा प्रश्न त्याच्या समोर आ वासून उभा… Continue reading मागे उभा
कवितेची भाषा
मधमाश्यांची गुणगुण, गाईचे वासराला चाटणे, मोराचे नाचणे, सापाचे फुत्कार करणे, लाजाळूचे लाजणे, ट्रॅफिकच्या सिग्नलचे दिवे, शाळेची घंटा, इंजिनाची शिट्टी, कंडक्टरचे चिमटा वाजवणे या आणि अशा कितीतरी गोष्टी काही ना काही कोणाला तरी सांगत असतात. याखेरीज करपल्लवी, देहबोली या परीनेही आपण बोलतो. म्हणजेच अशा अनेक भाषा असतात. अगदी ‘शब्देविण संवादू’ घडवू… Continue reading कवितेची भाषा
कूटकाव्य
कूटकाव्य ही कोडी आहेत वृत्तबद्ध, संस्कृतप्रचुर. म्हटलं तर अवघड; पण मजेशीर. विठ्ठल कवी सहा महिन्यांत कोडी सोडवायला सांगतो. अंतर्नादच्या रसिक वाचकांना एवढा वेळ नक्कीच लागणार नाही. करा बघू प्रयत्न… ( उत्तर इतरत्र) (टीप : पुस्तक जीर्ण झाल्याने काही ठिकाणी शब्द दिसत नाहीत; तिथे जागा सोडली आहे. कोडं सोडवताना त्या न… Continue reading कूटकाव्य
ग्रंथयात्रा – एक प्रवास ९
ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यूट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर यांनी वेगवेगळ्या मराठी साहित्य प्रकारांचा रसास्वाद वाचकांसाठी घेतला आहे. यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी… मराठी कादंबरीची जुनी परिमाणे बदलून टाकणारी आणि अत्यंत गाजलेली ‘कोसला’ ही कादंबरी नेमाडेंनी वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी लिहिली.… Continue reading ग्रंथयात्रा – एक प्रवास ९
देवगड हापूस
सकाळची वेळ, तव्यावर घावन टाकल्याचा ‘चुर्रर्र आवाज आला. त्याचा मंद सुगंध जेवणघरात दरवळला. सुमित्रा खुर्चीत निःस्तब्ध बसली होती – शून्यात पाहत. आभाने तिच्या पुढ्यात टेबलावर प्लेट ठेवली,म्हणाली, “आई, घे गरमगरम… तुझ्या आवडीची तांदळाची घावनं… मऊ, लुसलुशीत, जाळीदार…त्याच्याशी नारळाची चटणी, शिवाय नारळाचे दूध… गूळ वेलची घातलेलं.” विचारातून जागी होत सुमित्रानं तिच्याकडे… Continue reading देवगड हापूस
शेअर मार्केट :- एक ब्लॅक होल
इ. स. सुमारे १६०० साली डच ईस्ट इंडिया कंपनीला भारताशी व्यापार करण्याची, त्यासाठी सैन्य उभारण्याची, किल्ले बांधण्याची सनद मिळाली. त्यासाठी बोटी बांधणे, त्यांमधून माल नेणे आणणे, या उद्योगात बोटी बुडणे, लुटल्या जाणे, आजार, वगैरे धोके आणि त्यामुळे नुकसानही होणे ही गोष्ट नेहमीचीच होती; पण फायदाही चांगलाच होता. त्यासाठी लागणारे मोठ्ठे… Continue reading शेअर मार्केट :- एक ब्लॅक होल
बोल सुना जानी — अर्थात चिजांच्या मुखड्यावर आधारित चित्रपटगीते भाग २
हिंदी चित्रपटांतील जी गाणी मूळ शास्त्रीय बंदीश किंवा उपशास्त्रीय (ठुमरी, दादरा वगैरे) गाण्यांवर बेतलेली आहेत आणि ज्या गाण्यांचा मुखडादेखील मूळ बंदिशीशी साधर्म्य असलेलाच आहे त्या गाण्यांबद्दल दिनेश शिंदे लिहीत आहेत. या लेखाचा पहिला भाग सप्टेंबर २०२४ च्या अंकात आलेला आहे. आता ऐकू या दुसरा भाग. ११) गरजत बरसत सावन आयो… Continue reading बोल सुना जानी — अर्थात चिजांच्या मुखड्यावर आधारित चित्रपटगीते भाग २
मानवी मेंदूचा सगळ्यात मोठा नकाशा
नकाशे तयार करण्याचे माणसाचे वेड प्राचीन संस्कृतीपासून आहे. ग्रीक, भारतीय, चीन या सगळ्या संस्कृतींचा इतिहास तपासला तर त्यात नकाशे तयार केल्याचे पुरावे मिळतात. Carta म्हणजे map या लॅटिन शब्दापासून cartography हा शब्द तयार झाला. तीच संकल्पना आधुनिक मेंदू विज्ञानात आली. गेली अनेक वर्षे मेंदूचा नकाशा तयार करण्याचे काम चालू आहे.… Continue reading मानवी मेंदूचा सगळ्यात मोठा नकाशा
खजुराहोतील मैथुनशिल्पे आणि सांप्रत लैंगिक भान
खजुराहोतील लोक असे मानतात की ज्यांनी खजुराहो पाहिले नाही त्यांचा जन्म झाला नाही; त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही ‘खजुराहो’ पाहता तो दिवस तुमचा जन्मदिवस म्हणून तुम्ही साजरा करू शकता!विनोदाचा भाग आपण बाजूला ठेवू या; परंतु साधारण एक हजार वर्षांपूर्वी खऱ्या अर्थाने माणसाचे जगणे कसे होते ते शिल्पकारांनी दगडावर कोरलेले आहे हे… Continue reading खजुराहोतील मैथुनशिल्पे आणि सांप्रत लैंगिक भान
नाट्यपरीक्षण : मढी
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुनील सुकथनकर यांची मुख्य भूमिका असलेल्या आणि अलीकडेच बघितलेल्या बारदोवीमधल्या चित्तरंजन गिरी यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘मढी’बद्दल कळलं तेव्हा ते नक्की बघायचं हे ठरलेलंच होतं. तिकीट काढताना तिकीट खिडकीच्या संकेतस्थळावर ‘a wordless play’ (शब्दहीन नाटक) असं वाचल्यामुळे खूप उत्सुकता आणि त्याचबरोबर ‘आपल्याला समजेल का?’ अशी शंकाही मनात निर्माण… Continue reading नाट्यपरीक्षण : मढी
गाव करी ते राव न करी
हिवतर गाव – एका अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी म्हणजे शुकाचार्यांच्या डोंगरापासून चार किलोमीटरवर असलेले एक गाव. पावसाळा चालू असल्याने हिरवेगार. रस्त्याच्या दुतर्फा मका, ऊस आणि झेंडूचे मळे. गावाचा उंबरा १०० ते १२०. प्रत्येक घरात शेळ्या, मेंढ्या, गाई,म्हशी. फुलांनी भरलेली जास्वंद, पानागणिक लागलेली सीताफळे लक्ष वेधून घेत होती. दारात छोटेखानी मांडव घातला… Continue reading गाव करी ते राव न करी
अभिवाचन भाग ८
ग्रंथाली प्रकाशित ‘मोरपिसं’ या अनुराधा गानू लिखित ललित लेखांच्या अभिवाचनाची शृंखला आपण सुरू केली आहे. लेखिकेचा परिचय… १९७८ सालापासून अमेरिकेत वास्तव्य होतं. टॅक्स आणि अकाउंटिंगचा स्वतःचा व्यवसाय. लॉस एंजेलिसच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सातत्यानं सक्रिय सहभाग. वाचन, लेखन, नाट्य, अभिनय यांची आवड. स्थानिक संगीतकार गोपाळ मराठे यांनी संगीतबद्ध केलेल्या व श्रीधर… Continue reading अभिवाचन भाग ८
प्रतिसाद : ऑक्टोबर २०२४
सप्रेम नमस्कार ‘शितावरून भाताची परीक्षा’ हा लेख वाचण्यात आला. तसे बघता माझा आणि साहेबाच्या देशाचा संबंध १९७०पासून जवळजवळ ३० वर्षे होता. मी ज्या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होतो त्याची एक शाखा लंडनजवळ होती; त्यामुळे अनेक वेळा जाण्याचा योग आला. आता २५ वर्षे झाली; पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले हे खरे.… Continue reading प्रतिसाद : ऑक्टोबर २०२४
प्रकाशन वृत्त
‘माझा (पण) बेहद्द नाममात्र घोडा’ विडंबन कविता-संग्रहाचे प्रकाशन संस्कृती प्रकाशनाच्या वतीने बुधवार २८ ऑगस्टच्या संध्याकाळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात अंतर्नादचे लेखक, कवी हेमंत जोगळेकर यांच्या ‘माझा (पण) बेहद्द नाममात्र घोडा’ या विडंबन संग्रहाचे प्रकाशन साक्षेपी समीक्षिका डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ कवयित्री, लेखिका डॉ. अरुणा… Continue reading प्रकाशन वृत्त
कूटकाव्य : उत्तरे
१)उत्तर : फुलातला/कमळातला मध प्यायला बसलेला भुंगा. पाकळ्या मिटल्याने ज्यात जेवत होता त्याच पात्राने त्याला गिळलं. २)पहिली ओळ : सह्याद्री पर्वताची कन्या म्हणजे नदी, तिचा पती समुद्र, त्याचा सुत म्हणजे चंद्र, त्याची ललना म्हणजे रात्र जेव्हां यौवनात येते, (म्हणजे मध्यरात्री ) दुसरी ओळ : रामाची स्त्री (सीता), तिच्या नावातला काना… Continue reading कूटकाव्य : उत्तरे
आगामी
इच्छामरण, सुखमरण, दयामरण; काही समानार्थी शब्दांची मालिका. वाढते आयुर्मान, विदेशांत होणारे तरुण सुशिक्षितांचे वाढते स्थलांतर, वैद्यक शास्त्रातील तंत्रज्ञानाने गाठलेले प्रगतीचे नवनवे टप्पे या सर्वांमुळे समाजापुढे काही वेगळेच प्रश्न उभे केले आहेत. दुर्धर आजाराने ग्रस्त, आसन्नमरण व प्राणांतिक वेदना सहन करणाऱ्या लोकांचे नक्की करायचे काय- हा त्यातला एक ठळक प्रश्न. या… Continue reading आगामी
महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.
श्रेयनामावली
मार्गदर्शक : भानू काळे
संपादक : अनिल जोशी
व्याकरण सल्लागार : सुषमा जोशी
तंत्र साहाय्य: मिहिर जोशी, स्नेहल आपटे

सुंदर वाचनीय अंक . Hard copy काढता का ?
अनिल फडके ,नाशिक .
धन्यवाद! हार्ड कॉपी काढत नाही.